
आयपीएल 2025 मधील साखळी फेरीतील शेवटचे सामने खेळवण्यात येत आहेत. प्लेऑफसाठी 4 संघ केव्हाच निश्चित झाले आहेत. मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, पंजाब किंग्स आणि गुजरात टायटन्स या 4 संघांनी प्लेऑफचं तिकीट मिळवण्यात यश मिळवलंय. आता या 4 संघांमध्ये पहिल्या 2 स्थानासाठी रस्सीखेच आहे. ते 2 संघ कोण असणार? हे अजून ठरायचं आहे. टॉप 2 मधील संघ क्वालिफायर-1 मध्ये आमनेसामने असणार आहेत. या संघांना अंतिम फेरीत पोहचण्याची आणखी एक संधी मिळते. त्यामुळे 18 व्या मोसमातील 69 वा सामना आणि आरसीबीची मॅच निर्णायक ठरणार आहे.
ताज्या आकडेवारीनुसार, गुजरात टायटन्स पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी आहे. गुजरातने 14 पैकी 9 सामने जिंकले आहेत. गुजरातच्या खात्यात 18 पॉइंट्स आहेत. पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यादोन्ही संघांचे 13 सामन्यानंतर 17-17 पॉइंट्स आहेत. पंजाबचा नेट रनरेट हा +0.327 इतका आहे. तर आरसीबीचा नेट रनरेट हा +0.255 असा आहे. तर मुंबई इंडियन्सने 13 सामन्यांपैकी 8 सामने जिंकले आहेत. तर 5 वेळा पराभवाचा सामना करावा लागलाय. मुंबई पॉइंट्स टेबलमध्ये चौथ्या स्थानी आहे.
आयपीएलच्या 18 व्या मोसमातील 69 व्या सामन्यात पंजाब किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स आमनेसामने आहेत. हा सामना जयपूरमधील सवाई मानसिंह स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. हा सामना टॉप 2 च्या हिशोबाने निर्णायक आहे. हा सामना रद्द झाल्यास दोन्ही संघांना प्रत्येकी 1-1 पॉइंट देण्यात येईल. त्यामुळे पंजाबचे 14 सामन्यानंतर 18 पॉइंट्स होतील. पंजाबकडून यासह गुजरातच्या 18 गुणांची बरोबरी होईल. मात्र गुजरातने पंजाबच्या तुलनेत जास्त सामने जिंकले. त्यामुळे गुजरात टॉप 2 मध्ये कायम राहिल. गुजरात यासह क्वालिफाय-1 साठी पात्र ठरेल. त्यामुळे गुजरातला फायनलमध्ये पोहचण्याची अतिरिक्त 1 संधी मिळेल.
तर पंजाबने हा सामना जिंकल्यास त्यांचे 14 सामन्यानंतर 19 पॉइंट्स होतील. पंजाबचं यासह टॉप 2 मधील निश्चित होईल. तसेच मुंबईसाठी टॉप 2 मध्ये पोहचण्यासाठी पंजाब विरुद्धचा सामना जिंकणं महत्त्वाचं आहे.
आरसीबीचा साखळी फेरीतील शेवटचा सामना बाकी आहे. त्यामुळे आरसीबीकडे टॉप 2 मध्ये पोहचण्याची शेवटची संधी आहे. आरसीबीने हा सामना जिंकल्यास त्यांच्या खात्यात 14 सामन्यानंतर एकूण 19 पॉइंट्स होतील. आरसीबी यासह टॉप 2 मध्ये पोहचेल. मात्र आरसीबीने हा सामना गमावला तर त्यांचे 17 पॉइंट्सच राहितील. त्यामुळे गुजरात दुसऱ्या स्थानी राहिल. तसेच पंजाबचा मुंबई विरुद्धचा सामना रद्द झाला तर ते 18 गुणांसह टॉप 2 मध्ये पोहचतील.