AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2025 KKR vs CSK Live Streaming : कोलकाता चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दुसऱ्यांदा विजयी होणार?

Kolkata Knight Riders vs Chennai Super Kings Live Streaming : गतविजेता कोलकाता नाईट रायडर्स 7 मे रोजी 5 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकणाऱ्या चेन्नई सुपर किंग्सस विरुद्ध भिडणार आहे. केकेआरसाठी हा सामना महत्त्वाचा आहे.

IPL 2025 KKR vs CSK Live Streaming : कोलकाता चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दुसऱ्यांदा विजयी होणार?
M S Dhoni and Sunil Narine KKR vs CSK Ipl 2025Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: May 06, 2025 | 10:58 PM
Share

आयपीएलच्या 18 व्या मोसमातील 57 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स आमनेसामने असणार आहेत. महेंद्रसिंह धोनी चेन्नईचं नेतृत्व करणार आहे. तर मराठमोळ्या अजिंक्य रहाणे याच्याकडे केकेआरच्या नेतृत्वाची जबाबदारी आहे. दोन्ही संघांचा हा या मोसमातील 12 वा सामना असणार आहे. चेन्नईचं या सिजनमधून आधीच पॅकअप झालं आहे. त्यामुळे चेन्नईकडे गमावण्यासाठी काहीच नाही. तर दुसऱ्या बाजूला केकेआरसाठी प्लेऑफच्या हिशोबाने प्रत्येक सामना अटीतटीचा आहे. त्यामुळे चेन्नई या सामन्यात विजय मिळवून केकेआरचं समीकरण बिघडवू शकते. त्यामुळे केकेआर या सामन्यात कशी कामगिरी करते? याकडे प्लेऑफच्या शर्यतीत असणाऱ्या इतर संघांचं लक्ष असणार आहे.

चेन्नई-केकेआर दुसऱ्यांदा आमनेसामने

चेन्नई आणि केकेआर या दोन्ही संघांची या मोसमात आमनेसामने येण्याची ही दुसरी वेळ ठरणार आहे. याआधी दोन्ही संघ 11 एप्रिलला मोसमातील 25 व्या सामन्यात भिडले होते. तेव्हा केकेआरने चेन्नईवर 8 विकेट्सने एकतर्फी विजय मिळवला होता. त्यामुळे चेन्नईकडे या पराभवाची परतफेड करण्याची संधी असणार आहे. त्यामुळे चेन्नई हा सामना जिंकत हिशोब चुकता करणार की केकेआर विजय मिळवून प्लेऑफच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामना केव्हा?

कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामना बुधवारी 7 मे रोजी खेळवण्यात येणार आहे.

कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामना कुठे?

कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामना ईडन गार्डन्स, कोलकाता येथे होणार आहे.

कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 7 वाजता टॉस होईल.

कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स मॅच टीव्हीवर कुठे पाहता येईल?

कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स मॅच टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.

कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स लाईव्ह मॅच मोबाईलवर कुठे पाहता येणार?

कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स लाईव्ह मॅच मोबाईलवर जिओहॉटस्टार एपवर पाहायला मिळेल.

पॉइंट्स टेबलमधील स्थिती

दरम्यान चेन्नई सुपर किंग्स पॉइंट्स टेबलमध्ये सर्वात शेवटची 10 व्या स्थानी आहे. चेन्नईला या मोसमात आतार्यंत 11 पैकी फक्त 2 सामन्यांतच विजय मिळवता आला आहेत. तर चेन्नईचा 9 वेळा पराभव झाला आहे. तसेच केकेआर 11 पैकी 5 सामने जिंकले आहेत. तर केकेआर 5 वेळा पराभूतही झाली आहे. तर केकेआरचा एक सामना पावसामुळे रद्द झालाय. त्यामुळे केकेआर 11 गुणांसह पॉइंट्स टेबलमध्ये सहाव्या स्थानी आहे.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.