कोलकाता नाईट रायडर्सच्या पराभवानंतर अजिंक्य रहाणे वैतागला, पंचांच्या निर्णयाबाबत म्हणाला..
आयपीएल 2025 स्पर्धेत एका चमत्कारासारखा पंजाब किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना झाला. हा सामना सहज कोलकाता जिंकेल असं वाटत होतं. कारण विजयासाठी फक्त 111 धावांचं आव्हान होतं. पण पंजाबच्या गोलंदाजांनी कमाल केली आणि कोलकात्याला 95 धावांवर रोखलं.

आयपीएल इतिहासात सर्वात कमी धावा करून विजय मिळवण्याचा मान आता पंजाब किंग्सला मिळाला आहे. पंजाब किंग्सने प्रथम फलंदाजी करताना फक्त 111 धावांचं आव्हान दिलं होतं. खरं तर आयपीएलमधील फलंदाजी पाहता हे आव्हान सोपं होतं. कोणाला वाटलं नव्हतं की हा सामना पंजाब किंग्स जिंकू शकते. पॉवर प्लेमध्ये केकेआरने 2 गडी गमवून 55 धावा केल्या होत्या. तर तिसरी विकेट ही 62 धावांवर पडली. मात्र त्यानंतर 33 धावांवर 7 विकेट पडल्या आणि सामना 16 धावांनी गमवण्याची वेळ आली. आयपीएल इतिहासात आतापर्यंत इतक्या कमी धावा कोणत्याही संघाला रोखता आलेल्या नाहीत. पण पंजाब किंग्सने ते करून दाखवलं आहे. यापूर्वी 2009 मध्ये चेन्नई सुपर किंग्सने पंजाब किंग्सला विजयासाठी दिलेल्या 116 धावा डिफेंड केल्या होत्या. मात्र हा विक्रम आता पंजाब किंग्सच्या नावावर झाला आहे. कारण पंजाबने 111 धावा डिफेंड केल्या आहेत.
केकेआरचा कर्णधार अजिंक्य रहाणे म्हणाला की, ‘समजावून सांगायला काहीच नाही, तिथे काय घडले ते आपण सर्वांनी पाहिले. प्रयत्नांमुळे खूपच निराशा झाली. मी दोष घेईन, चुकीचा शॉट खेळला, जरी तो गहाळ होता. त्याला फारशी खात्री नव्हती.’ एलबीडब्ल्यू आऊट झाल्यानंतर अंगकृषशी काय बोलणं झालं? तेव्हा अजिंक्य म्हणाला की, ‘तो म्हणाला की हा पंचांचा निर्णय असू शकतो. मला त्यावेळी संधी घ्यायची नव्हती, मलाही खात्री नव्हती. ती चर्चा होती.’
IMPACT OUTSIDE OFF!
Replay Shows AJINKYA RAHANE was NOT OUT!
But KKR Skipper hasn’t taken DRS!#yuzuvendrachahal #AjinkyaRahane #DRS #PBKSvsKKR #ipl2025 #cricketaddiction pic.twitter.com/LnFccyRejZ
— Cricket Addiction (@CricketAdd1ct) April 15, 2025
धावांचा पाठलाग करताना डोक्यात नेट रनरेट होता का? त्यावर अजिंक्य रहाणे म्हणाला की, ‘खरंच नाही. आम्ही फलंदाजी युनिट म्हणून खूप वाईट फलंदाजी केली, आम्ही पूर्ण जबाबदारी घेतो. गोलंदाजांनी या पृष्ठभागावर खरोखर चांगली कामगिरी केली, पंजाबच्या मजबूत फलंदाजीला 111 धावापर्यंत मर्यादित केले. एक व्यक्ती म्हणून, तुम्हाला अजूनही आत्मविश्वास आणि सकारात्मक राहावे लागेल. अर्धी स्पर्धा अजून बाकी आहे. यावर उपाय करून पुढे जावे लागते.’
या विजयासह कोलकाता नाईट रायडर्सला मोठा फटका बसला आहे. तर पंजाब किंग्सला फायदा झालं. पंजाब किंग्सने गुणतालिकेत मोठी झेप घेत चौथं स्थान गाठलं आहे. यापूर्वी पंजाब किंग्सचा संघ सहाव्या स्थानावर होता. पंजाब किंग्सने 8 गुण आणि +0.172 नेट रनरेट आहे. तर कोलकाता नाईट रायडर्सचा संघ सहाव्या स्थानावर गेला आहे. पण या पराभवामुळे पुढची स्पर्धा आणखी तीव्र होणार आहे. कोलकाता नाईट रायडर्स 6 गुण आणि +0.547 नेट रनरेटसह सहाव्या स्थानावर आहे.
