AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रीति झिंटाच्या संघाकडून पराभव होताच झहीर खानने असा काढला राग, म्हणाला…

पंजाब किंग्सने आयपीएल 2025 स्पर्धेत दमदार सुरुवात केली आहे. गुजरात टायटन्सनंतर लखनौ सुपर जायंट्सला पराभवाची धूळ चारली आहे. इकाना स्टेडियममध्ये पंजाब किंग्सने लखनौ सुपर जायंट्सला 8 विकेट राखून पराभूत केलं. या पराभवानंतर लखनौचा मेंटॉर झहीर खान चांगलाच संतापला आहे.

प्रीति झिंटाच्या संघाकडून पराभव होताच झहीर खानने असा काढला राग, म्हणाला...
पंजाब किंग्स आणि झहीर खानImage Credit source: PBKS Twitter/BCCI/Twitter
| Updated on: Apr 02, 2025 | 4:32 PM
Share

लखनौ सुपर जायंट्सने मेगा लिलावानंतर नव्याने टीम बांधली आहे. मात्र या फ्रेंचायझीला पहिल्या तीन सामन्यात हवा तसा रिझल्ट मिळालेला नाही. पहिल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने पराभूत केलं. त्यानंतर सनरायझर्स हैदराबादला पराभूत करून कमबॅक केलं. पण घरच्या मैदानावर खेळलेल्या सामन्यात पंजाब किंग्सकडून दारूण पराभव झाला. पंजाब किंग्सने 22 चेंडू आणि 8 विकेट राखून लखनौने विजयासाठी दिलेल्या 177 धावा केल्या. या पराभवानंतर लखनौ सुपर जायंट्सचा मेंटॉर झहीर संतापलेला दिसला. पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यात संघाला होम ग्राउंडचा हवा तसा फायदा मिळाला नाही, असा आरोप झहीर खानने केला. सामन्यानंतर झहीर खानने सांगितलं की, लखनौ सुपर जायंट्सने होमग्राउंडवर जशी खेळपट्टीची अपेक्षा केली होती तशी खेळपट्टी मिळाली नाही.

लखनौ सुपर जायंट्सचा मार्गदर्शक झहीर खानने सांगितलं की, ‘मी थोडा निराश झालो आहे कारण तो घरचा सामना होता आणि आयपीएलमध्ये तुम्ही पाहिले आहे की संघांना घरच्या मैदानावर खेळण्याचा फायदा मिळतो. त्या अर्थाने मला वाटतं की क्युरेटरला तो घरचा सामना वाटला नव्हता. जणू काही पंजाबचा क्युरेटर इथेच आहे असे वाटत होते. ही अशी गोष्ट आहे ज्याकडे आपण लक्ष दिले पाहिजे.’ दुसरीकडे, झहीर खानने ऋषभ पंतची पाठराखण केली आहे. इतकंच काय तर पुढच्या सामन्यात कमबॅक करेल असा विश्वासही व्यक्त केला आहे.

झहीर खानने पुढे सांगितलं की, ‘माझ्यासाठी हा एक नवीन संघ आहे, पण आशा आहे की भविष्यात कोणत्याही सामन्यात असे होणार नाही. कारण यामुळे तुमचे चाहतेही निराश होतात. चाहते घरच्या मैदानावरील पहिला सामना जिंकतील या आशेने येथे आले होते. हा हंगामातील तिसरा सामना आहे आणि आम्ही अनेकदा या हंगामात संघ कसा आहे याबद्दल बोललो आहोत. आम्ही निकालांवर नाही तर प्रक्रियेवर लक्ष केंद्रित करत आहोत. आपल्याला काही पैलूंवर काम करावे लागेल.’

Follow Us
नंदुरबार-मालेगाव मार्गावरील बस रस्त्यातच बंद, प्रवाशांचे हाल
नंदुरबार-मालेगाव मार्गावरील बस रस्त्यातच बंद, प्रवाशांचे हाल; एसटी महामंडळावर प्रश्नचिन्ह
महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यास फडणवीस सक्षम, शेलारांचे प्रत्युत्तर
शेलारांचे राऊतांना प्रत्युत्तर: महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यास फडणवीस सक्षम
पुणे रिंग रोडसाठी १०,५०२ कोटींची मान्यता, मेट्रो-१३ प्रकल्पही मंजूर
देवेंद्र फडणवीस: पुणे रिंग रोडसाठी १०,५०२ कोटींची मान्यता. मेट्रो-१३ प्रकल्पालाही मंजुरी.
अजितदादांच्या निधनानंतर बारामती पोरकी? पवारांना बारामतीकरांचं पत्र
अजित पवारांच्या निधनानंतर बारामती पोरकी? पवार कुटुंबीयांना बारामतीकरांचं खुलं पत्र
सिब्बलांच्या आरोपांवर राहुल नार्वेकरांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “निर्णय
सिब्बलांच्या आरोपांवर राहुल नार्वेकरांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “निर्णय शाश्वत”
मुंबई विद्यापीठाचा नवा नियम; परीक्षेसाठी 30 मिनिटं आधी पोहोचणं बंधनकार
मुंबई विद्यापीठाचा नवा नियम. परीक्षेसाठी 30 मिनिटे आधी उपस्थिती बंधनकारक
मराठी पाट्यांच्या मोहिमेचा महापालिकेकडून तिसरा टप्पा सुरू
१२ कोटींचा दंड वसूल: मुंबईत मराठी पाट्यांसाठी महापालिकेची धडक मोहीम
मराठा नेते आक्रमक; वाघमारेला मारणाऱ्याला 10 लाखांच्या बक्षिसाची घोषणा
मराठा नेत्यांकडून नवनाथ वाघमारे यांना थेट धमकी; माफी मागण्याची मागणी
पुण्यातील चूल मटण हॉटेलचा परवाना एफडीएने केला निलंबित
लोहगाव येथील चूल मटण हॉटेलवर अस्वच्छतेमुळे एफडीएची कारवाई
नाशिक पालकमंत्री गिरीश महाजन, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजनांची निवड, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन