
आयपीएलच्या 18 व्या मोसमात शु्क्रवारी 4 एप्रिलला लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स आमनेसामने असणार आहेत. हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्सचं नेतृत्व करणार आहे. तर ऋषभ पंतकडे लखनौ सुपर जायंट्सच्या कर्णधारपदाची धुरा आहे. दोन्ही संघांचा हा या मोसमातील चौथा सामना असणार आहे. तसेच दोन्ही संघांची या हंगामात सारखीच स्थिती आहे. मात्र घरच्या मैदानात सामना होणार असल्याने लखनौला क्रिकेट चाहत्यांचा पाठींबा असणार आहे. मुंबईने या हंगामात सलग 2 सामने गमावल्यानंतर केकेआरवर मात करत विजयाचं खातं उघडलं. तर लखनौची पराभवाने सुरुवात झाली. त्यानतंर दुसऱ्या सामन्यात विजय मिळवला. मात्र लखनौने पुन्हा सामना गमावला. त्यामुळे लखनौचा विजयी ट्रॅकवर परतण्याचा प्रयत्न असेल. तर मुंबई सलग दुसरा सामना जिंकण्यासाठी तयारीने मैदानात उतरणार आहे.
लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामना शुक्रवारी 4 एप्रिलला खेळवण्यात येणार आहे.
लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामना भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी एकाना क्रिेकट स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे.
लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 7 वाजता टॉस होईल.
लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल. तर लाईव्ह मॅच जिओहॉटस्टार एप पाहता येईल.
मुंबई इंडियन्स टीम : रोहित शर्मा, रायन रिकेल्टन (विकेटकीपर), विल जॅक्स, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या (कर्णधार), तिलक वर्मा, रॉबिन मिन्झ, नमन धीर, मिचेल सँटनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट, सत्यनारायण राजू, विघ्नेश पुथूर, राज बावा, अश्वनी कुमार, कॉर्बिन बॉश, कर्ण शर्मा, जसप्रीत बुमराह, रीस टोपले, मुजीब उर रहमान, बेव्हॉन जेकब्स, अर्जुन तेंडुलकर आणि कृष्णन श्रीजीथ.
लखनौ सुपर जायंट्स संघ: अर्शीन कुलकर्णी, मिचेल मार्श, ऋषभ पंत (कर्णधार आणि विकेटकीपर), निकोलस पूरन, आयुष बडोनी, डेव्हिड मिलर, अब्दुल समद, शार्दुल ठाकूर, आरएस हंगरगेकर, रवी बिश्नोई, शमर जोसेफ, आकाश दीप, शाहबाज अहमद, मणिमरन सिद्धार्थ, आकाश महाराज सिंग, एडन मार्कराम, आवेश खान, हिम्मत सिंग, मॅथ्यू ब्रेट्झके, आर्यन जुयाल, युवराज चौधरी, मयंक यादव, प्रिन्स यादव आणि दिग्वेश राठी.