MI vs CSK : “धन्यवाद भावा”, रोहितने अर्धशतकी खेळीनंतर कुणाचे आभार मानले? हिटमॅनची इंस्टा स्टोरी व्हायरल
Rohit Sharma Insta Stroy : मुंबई इंडियन्सचा अनुभवी फलंदाज आणि माजी कर्णधार रोहित शर्मा याने रविवारी 20 एप्रिलला चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध झंझावाती खेळी केली. रोहितने या सामन्यात 76 धावा केल्या. रोहितने या खेळीनंतर सोशल मीडियावरुन कुणाचे आभार मानले? जाणून घ्या.

रोहित शर्मा याने आयपीएल 2025 स्पर्धेत रविवारी 20 एप्रिलला चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध जोरदार कमबॅक केलं. रोहित या मोसमात मोठी खेळी करण्यात अपयशी ठरत होता. मात्र रोहितला घरच्या मैदानात वानखेडे स्टेडियममध्ये सूर गवसला. रोहितने चेन्नईविरुद्ध अर्धशतकी खेळी केली. रोहितने या खेळीसाठी टीम इंडियाच्या सपोर्ट स्टाफमधील माजी सदस्य अभिषेक नायर याचे आभार मानले. त्यानंतर अभिषेक नायर यावर रिएक्ट झाला. अभिषेक शर्मा याला काही दिवसांपूर्वीच टीम इंडियाच्या सपोर्ट स्टाफमधून डच्चू देण्यात आला. त्यानंतर लगेचच अभिषेक नायर आयपीएल गतविजेता कोलकाता नाईट रायडर्स टीममधील सपोर्ट स्टाफसह जोडला गेला.
रोहितच्या कमबॅकसाठी अभिषेक नायर हिटमॅनला मदत करत होता, असं म्हटलं जात आहे. क्रिकबजनुसार, रोहित आणि अभिषेक हे दोघेही कामगिरी सुधारण्यासाठी एकत्र वेळ घालवत आहेत. रोहितने वानखेडे स्टेडियममध्ये सनरायजर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात 17 एप्रिलला 26 धावांची खेळी केली. त्याआध रोहितने मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या बीकेसी सेंटर येथे अभिषेक नायरसह बॅटिंगवर मेहनत घेतली.
आऊट ऑफ फॉर्म रोहित
रोहितने रविवारी चेन्नईविरुद्ध 76 धावांची नाबाद खेळी केली. त्यानंतर रोहितने इंस्टाग्राम स्टोरीद्वारे अभिषेकचे जाहीर आभार मानले. त्याआधी रोहितला त्याच्या लौकीकाला साजेशी कामगिरी करता आली नव्हती. रोहितने 5 सामन्यात अनुक्रमे 0,8, 13, 17 आणि 18 अशा धावा केल्या होत्या. मात्र त्यानंतर रोहितला सूर गवसला आणि त्याने कमबॅक केलं.
रोहितचं मिशन वर्ल्ड कप 2027
रोहित आणि अभिषेक या दोघांमध्ये आयपीएल 2025 दरम्यान आणि त्याआधीही सराव सुरु होतो, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. याआधी रोहित शर्माचं 2027 वर्ल्ड कपपर्यंत खेळण्यावर फोकस असल्याची चर्चा होती. त्यासाठी रोहित अभिषेकसह फिटनेस आणि बॅटिंग सुधारण्यासाठी सराव करत असल्याचं म्हटलं गेलं.
रोहितकडून अभिषेक नायरचे आभार
Rohit Sharma thanked Abhishek Nayar for last night’s knock against Chennai 🤍
– Ro, A lovely gesture. pic.twitter.com/G2ecrb4KOe
— Johns. (@CricCrazyJohns) April 21, 2025
केएल राहुलकडूनही श्रेय
टीम इंडियाच्या फलंदाजांची बॉर्डर गावसकर ट्रॉफीत निराशाजनक कामगिरी राहिली. त्यासाठी अभिषेक नायरला जबाबदार ठरवण्यात आलं. बीसीसीआयने त्यानंतर सीतांशु कोटक यांची बॅटिंग कोच म्हणून नियुक्ती केली. तसेच अभिषेकने फक्त रोहितलाच मदत केली आहे, असं नाही. केएल राहुल यानेही रोहितप्रमाणे अभिषेकला श्रेय दिलं होतं. टी 20 क्रिकेटमध्ये बॅटिंगमध्ये सुधारण्यासाठी अभिषेकने मदत केली होती, असं केएलने म्हटलं होतं.
