MI vs CSK : रोहित शर्मा एक असा.., हार्दिक हिटमॅनबाबत सर्वकाही बोलून गेला, जाणून घ्या
Hardik Pandya On Rohit Sharma Post Match Presentation : मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या 18 व्या मोसमात घरच्या मैदानात अर्थात वानखेडे स्टेडियममध्ये चेन्नई सुपर किंग्सचा धुव्वा उडवत सलग तिसरा आणि एकूण चौथा विजय मिळवला. रोहितने मुंबईच्या विजयात प्रमूख भूमिका बजावली.

मुंबई इंडियन्सने रविवारी 20 एप्रिलला वानखेडे स्टेडियममध्ये कट्टर प्रतिस्पर्धी चेन्नई सुपर किंग्सवर 9 विकेट्सने एकतर्फी मात करत आयपीएलच्या 18 व्या मोसमातील चौथा विजय मिळवला. मुंबईच्या विजयानंतर कर्णधार हार्दिक पंड्या याने आम्ही सोपं क्रिकेट खेळण्याकडे लक्ष देतोय. तसेच रणनितीनुसार खेळण्यावर लक्ष केंद्रीत करत असल्याचं सांगितलं. मुंबई इंडियन्सने रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव या दोघांनी केलेल्या नाबाद शतकी खेळीच्या जोरावर विजय मिळवला.
चेन्नईने विजयासाठी 177 धावांचं आव्हान दिलं होतं. मुंबईकडून या धावांचा पाठलाग करताना सूर्यकुमार यादव आणि रोहित शर्मा या दोघांनी नाबाद अर्धशतकी खेळी केली. रोहितने नाबाद 76 तर सूर्याने नॉट आऊट 68 रन्स केल्या. तसेच या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 54 चेंडूत नाबाद 114 धावांची भागीदारी केली. रोहितला या कामगिरीसाठी मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात आलं.
हार्दिक पंड्या काय म्हणाला?
“आम्ही ज्या पद्धतीने क्रिकेट खेळतोय, ज्या पद्धतीने हाय स्कोअरिंग पिचवर आम्ही बॉलिंग आणि त्यानंतर बॅटिंग केलं ते फार चांगलं होतं. रोहित शर्मा असा एक खेळाडू आहे जो फॉर्म असल्यावर प्रतिस्पर्धी संघाच्या तोंडातील विजयाचा घास हिसकावून देतो. प्रत्येक खेळाडू आपलं योगदान देत आहे. आम्ही फक्त सोपं क्रिकेट आणि प्लानिंगनुसार खेळण्याकडे लक्ष देत आहोत”, असं हार्दिकने सामन्यानंतर म्हटलं.
मुंबईला फायदा तर चेन्नईची दुर्दशा
दरम्यान मुंबई इंडियन्स टीमला या विजयानंतर पॉइंट्स टेबलमध्ये फायदा झाला आहे. तर दुसऱ्या बाजूला चेन्नईची स्थिती आणखी बिकट झाली आहे. मुंबईला विजयासह पॉइंट्स टेबलमध्ये एका स्थानाचा फायदा झाला आहे. मुंबईने कोलकाता नाईट रायडर्सला मागे टाकलं आहे. मुंबईने सातव्या स्थानावरुन सहाव्या स्थानी झेप घेतली आहे. तसेच नेट रनरेटमध्ये चांगला फायदा झाला आहे.
“रोहितबाबत चिंता करण्याची गरज नाही”
Hardik Pandya said “You don’t have to worry about Rohit Sharma’s form, when he comes back to form, the opposition will be out of the game”. pic.twitter.com/4a5EjhGJhI
— Johns. (@CricCrazyJohns) April 20, 2025
तर दुसऱ्या बाजूला चेन्नईचा हा या मोमसातील सहावा पराभव ठरला. त्यामुळे चेन्नईला इथून पुढे प्लेऑफमध्ये पोहचायचं असेल तर उर्वरित प्रत्येक सामन्यात जिंकावं लागणार आहे. चेन्नईने आतापर्यंत एकूण 8 सामने झाले आहेत. तर उर्वरित 6 सामने जिंकले तरच यलो आर्मीचं आव्हान कायम राहिलं.
