AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MI vs CSK : मुंबई इंडियन्ससाठी विजयानंतर गूड न्यूज, चेन्नईला लोळवल्यानंतर तगडा फायदा, काय झालं?

Mumbai Indians VS Chennai Super Kings Ipl 2025 : हार्दिक पंड्या याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने वानखेडे स्टेडियममध्ये चेन्नई सुपर किंग्सचा 9 विकेट्सने धुव्वा उडवला. मुंबईला या विजयानंतर आणखी एक आनंदाची बातमी मिळाली आहे.

MI vs CSK : मुंबई इंडियन्ससाठी विजयानंतर गूड न्यूज, चेन्नईला लोळवल्यानंतर तगडा फायदा, काय झालं?
Ipl 2025 Mumbai Indians vs Chennai Super KingsImage Credit source: IPL/BCCI
| Updated on: Apr 20, 2025 | 11:53 PM
Share

मुंबई इंडियन्सला आयपीएलच्या 18 व्या मोसमात आपल्या पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सकडून पराभूत व्हावं लागलं होतं. मात्र मुंबईने 23 मार्चच्या पराभवाचा 20 एप्रिलला वचपा काढला आहे. मुंबईने चेन्नईला आपल्या घरात अर्थात वानखेडे स्टेडियममध्ये 9 विकेट्सने लोळवलं आहे. मुंबईने चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध 177 धावांचं आव्हान हे 26 बॉलआधी 1 विकेटच्या मोबदल्यात सहज पूर्ण केलं. मुंबईने 15.4 ओव्हरमध्ये विजयी धावांचा टप्पा पूर्ण केला. मुंबईचा हा या मोसमातील एकूण चौथा तर सलग तिसरा विजय ठरला. मुंबईला या विजयानंतर आणखी एक गूड न्यूज मिळाली आहे.

मुंबई पॉइंट्स टेबलमध्ये सहाव्या स्थानी

चेन्नईवर एकतर्फी विजय मिळवल्यानंतर मुंबईला तगडा फायदा झाला आहे. मुंबईने पॉइंट्स टेबलमधील आपलं स्थान सुधारलं आहे. मुंबईने पॉइंट्स टेबलमध्ये एका स्थानाची उडी घेतली आहे. मुंबईने केकेआरला मागे टाकत सहाव्या स्थानी झेप घेतली आहे. तर मुंबईमुळे केकेआरची सातव्या स्थानी घसरण झाली आहे.

चेन्नई दहाव्या स्थानी कायम

चेन्नई विरुद्ध 26 बॉलआधी विजय मिळवल्याने मुंबईच्या नेट रनरेटमध्ये कमालीची वाढ झाली आहे. मुंबईचा नेट रनरेट हा सामन्याआधी +0.239 असा होता. तो नेट रनरेट विजयानंतर +0.483 असा झाला आहे. तर दुसऱ्या बाजूला चेन्नईची पराभवानंतर आणखी वाईट स्थिती झाली आहे. चेन्नईचा हा या मोसमातील एकूण सहावा पराभव ठरला. चेन्नई या पराभवानंतरही दहाव्याच स्थानी कायम आहे. चेन्नईचा नेट रनरेट हा -1.392 असा आहे.

मुंबईची अप्रतिम सुरुवात

दरम्यान रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव हे दोघे मुंबईच्या विजयाचे हिरो ठरले. मुंबईच्या गोलंदाजांनी चेन्नईला 176 धावांपर्यंतच पोहचू दिलं. त्यानंतर मुंबईकडून 177 धावांचं आव्हान हे तिघांनीच पूर्ण केलं. रायन रिकेल्टन रोहित शर्माला चांगली साथ देत अर्धशतकी सलामी भागीदारी केली. मात्र त्यानंतर रायन आऊट झाला. रायनने 19 बॉलमध्ये 1 सिक्स आणि 3 फोरसह 24 रन्स केल्या.

पलटणमुळे केकेआरला झटका

रोहित आणि सूर्याची नाबाद विजयी खेळी

रायन आऊट झाल्यानंतर रोहित आणि सूर्यकुमार यादव या जोडीने मुंबईला विजयापर्यंत नेलं. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 114 धावांची नाबाद भागीदारी केली. रोहितने नॉट आऊट 76 रन्स केल्या. तर सूर्यकुमार यादव 68 धावांवर नाबाद परतला.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.