AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2025 PBKS vs KKR : नाणेफेकीचा कौल पंजाब किंग्सच्या बाजूने, श्रेयस अय्यरने घेतला असा निर्णय

आयपीएल 2025 स्पर्धेतील 31वा सामना पंजाब किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होत आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा पंजाब किंग्सच्या बाजूने लागला. कर्णधार श्रेयस अय्यरने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

IPL 2025 PBKS vs KKR : नाणेफेकीचा कौल पंजाब किंग्सच्या बाजूने, श्रेयस अय्यरने घेतला असा निर्णय
| Updated on: Apr 15, 2025 | 7:40 PM
Share

चंदीगडच्या महाराजा यादविंदर सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्स हे संघ आमनेसामने आले आहेत. पंजाब किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या स्पर्धेत 33 वेळा भिडले आहेत. यात कोलकात्याचा संघ वरचढ ठरला आहे. कोलकात्याने 21 सामन्यात विजय मिळवला आहे. तर पंजाब किंग्सने 12 सामन्यात विजय मिळवला आहे. मागच्या पर्वात पंजाब किंग्सने कोलकाता नाईट रायडर्सला 8 गडी राखून पराभूत केलं होतं. चंदीगडच्या मैदानात पंजाब किंग्स संघ आतापर्यंत सात सामने खेळला आहेत. त्यात 2 सामन्यात विजय, तर पाच सामन्यात पराभवाचं तोंड पाहीलं आहे.  श्रेयस अय्यरने या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय कोलकाता नाईट रायडर्सच्या पथ्यावर पडला. अजिंक्य रहाणेला प्रथम गोलंदाजी करायची होती.

पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने सांगितलं की, ‘आम्ही प्रथम फलंदाजी करणार आहोत. गेल्या काही सामन्यांमध्ये विकेट खरोखरच चांगली आहे असे वाटते, दव येते पण आउटफील्ड सरकत नाही. संघात बदल झाल्याचे आठवत नाही, मी नंतर सांगेन. आपल्याला क्षेत्ररक्षणात जास्तीत जास्त झेल घ्यावे लागतील आणि काही प्रकारची चमक निर्माण करावी लागेल.’

कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार अजिंक्य रहाणे म्हणाले की, ‘आम्ही या विकेटवर प्रथम गोलंदाजी करण्याचा विचार करत होतो. माझ्या मते, नाणेफेक ही अशी गोष्ट आहे जी तुम्ही नियंत्रित करू शकत नाही. आमच्याकडे अशी फलंदाजी आहे जी लक्ष्याचा पाठलाग करू शकते. फक्त एक बदल आहे. मोईन अलीच्या जागी नोर्टजे आला आहे . तो त्याच्या खेळावर कठोर परिश्रम करत आहे आणि मी आज रात्री त्याला गोलंदाजी करताना पाहण्यास उत्सुक आहे.’

दोन्ही संघांची प्लेइंग 11

पंजाब किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): प्रियांश आर्य, प्रभसिमरन सिंग (विकेटकीपर), श्रेयस अय्यर (कर्णधार), नेहल वढेरा, जोश इंग्लिस, शशांक सिंग, ग्लेन मॅक्सवेल, मार्को जॅन्सन, झेवियर बार्टलेट, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल.

कोलकाता नाईट रायडर्स (प्लेइंग इलेव्हन): क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), सुनील नरेन, अजिंक्य रहाणे (कर्णधार), वेंकटेश अय्यर, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, हर्षित राणा, वैभव अरोरा, एनरिक नॉर्टजे, वरुण चक्रवर्ती.

फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.