Video: पडिक्कलने चौकाराच्या दिशेने मारलेला फटका अडवला, पण कोहलीमुळे…
आयपीएल 2025 स्पर्धेत पंजाब किंग्सच्या विरूद्धच्या सामन्यात विराट कोहलीने जबरदस्त फिटनेसचं दर्शन घडवून दिलं. वयाच्या 36 व्या वर्षी काढलेल्या चार धावा पाहून उपस्थितांनी तोंडात बोटं टाकली. नेमकं काय झालं ते जाणून घ्या.

आयपीएल 2025 स्पर्धेतील 37वा सामना पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात पार पडला. या सामन्यात पंजाब किंग्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 5 गडी गमवून 156 धावा केल्या. तसेच विजयासाठी 157 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने 18.5 षटकात 3 गडी गमवून पूर्ण केलं. या विजयासह आरसीबीला गुणतालिकेत जबरदस्त फायदा झाला आहे. खरं तर 157 धावांचा पाठलाग करणं वाटतं तितकं सोपं नव्हतं. चेंडू नीट बॅटवर येत नव्हता. त्यामुळे सावध खेळी करणं गरजेचं होतं. विराट कोहलीला याची जाणीव होती. फिलीप सॉल्टची विकेट पहिल्याच षटकात गेल्यानंतर आरसीबीवर दडपण वाढलं होतं. पण विराट कोहलीला उगाच चेस मास्टर बोलत नाही. त्याने शेवटपर्यंत उभा राहून सामना जिंकवला. त्याने 54 चेंडूत 7 चौकार आणि 1 षटकार मारून नाबाद 73 धावांची खेळी केली आणि विजय मिळवला. त्याच्या या खेळीसोबत त्याच्या फिटनेसची चर्चा होत आहे. त्याने चार धावा धावून काढल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. वयाच्या 36व्या वर्षी त्याचा फिटनेस पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
पंजाब किंग्सकडून तिसरं षटक टाकण्यासाठी अर्शदीप सिंग आला होता. या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर देवदत्त पडिक्कल स्ट्राईकला होता. त्यान मिडविकेटच्या दिशेने गॅपमध्ये चेंडू मारला. पण क्षेत्ररक्षक चेंडू थांबवण्यासाठी धावत गेला. शेवटच्या क्षणी, त्याने चेंडू त्याच्या पायाने सीमारेषेच्या दोरीवर आदळण्यापासून रोखला आणि चार धावा वाचवल्या. पण इतकी मेहनत करूनही चार धावा गेल्याच. झालं असं की 36 वर्षांच्या विराट कोहलीने वेगाने चार धावा काढल्या. विराट कोहली वेगाने धावत असताना देवदत्त पडिक्कलचा मात्र घाम निघाला. पडिक्कल व्यतिरिक्त, इतर कोणत्याही फलंदाजाने तीन धावा केल्या असत्या. पण, कोहलीच्या वेगामुळे चौथी धावही मिळाली.
KOHLI & PADIKKAL RUNNING FOUR IN A AFTERNOON MATCH 🥶 pic.twitter.com/L786SgO4yQ
— Johns. (@CricCrazyJohns) April 20, 2025
देवदत्त पडिक्कल म्हणाला की, ‘मी जेव्हा विराटसोबत भागीदारी करणे महत्त्वाचे होते तेव्हा हे महत्त्वाचे होते. हे छोटे धावसंख्या कठीण असू शकते आणि मला चांगली सुरुवात करायची होती. गेल्या काही महिन्यांत खूप मेहनत घेतली आहे. दिनेश कार्तिक आणि अँडीसोबत मी काही पैलूंवर काम केले आहे आणि ते आता चांगले दिसून येत आहे. जेव्हा तुमच्याकडे दुसऱ्या बाजूला इतका आत्मविश्वास आणि शांतता असलेला खेळाडू असतो तेव्हा तुमचे काम सोपे होते.’
