AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पंजाब किंग्स फ्रेंचायझीने लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार ऋषभ पंतला असा हाणला टोला, ट्वीट करत लिहिलं की…

आयपीएल 2025 स्पर्धेत पंजाब किंग्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात वेगळंच द्वंद्व आहे. खऱ्या अर्थाने ही स्पर्धा सुरु होण्यापूर्वी ऋषभ पंतने केलेल्या वक्तव्यानंतर या वादाला सुरुवात झाली होती. तेव्हा पंजाब किंग्स फ्रेंचायझी व्यक्त झाली नव्हती. पण पहिल्याच सामन्यात पराभूत केल्यानंतर अप्रत्यक्षरित्या डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.

पंजाब किंग्स फ्रेंचायझीने लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार ऋषभ पंतला असा हाणला टोला, ट्वीट करत लिहिलं की...
श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंतImage Credit source: Twitter
| Updated on: Apr 02, 2025 | 5:26 PM
Share

आयपीएल 2025 स्पर्धेत पंजाब किंग्स श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात चांगली कामगिरी करत आहे. सलग दोन सामन्यात विजय मिळवून गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहेत. स्पर्धेत सकारात्मक सुरुवात झाल्याने प्लेऑफच्या आशाही वाढल्या आहेत. असं असताना दुसऱ्याच सामन्यात लखनौ सुपर जायंट्सला पराभूत केल्याने पंजाब किंग्स फ्रेंचायझी भलतीच खूश आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर श्रेयस अय्यरने प्रथम गोलंदाजी स्वीकारली. लखनौ सुपर जायंट्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 गडी गमवून 171 धावा केल्या आणि विजयासाठी 172 धावांचं आव्हान दिलं. 172 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाब किंग्जकडून प्रभसिमरन सिंगने आक्रमक खेळी केली. त्याने 69 धावा केल्या तर कर्णधार श्रेयस अय्यरने नाबाद 52 धावा केल्या. यासह, पंजाब किंग्सने फक्त 16.2 षटकांत 177 धावा करत 8 विकेट्सने विजय मिळवला.

या विजयानंतर पंजाब किंग्सने सोशल मीडियाच्या माध्यमातून लखनौ सुपरजायंट्सचा कर्णधार ऋषभ पंतला अप्रत्यक्षरित्या डिवचलं आहे. सोशल मीडियावर, पंजाब किंग्सने मेगा लिलावाचा उल्लेख करत लिहिलं की, आयपीएल लिलावात आमचा तणाव दूर झाला होता. खरं तर या पोस्टमधून पंतला डिवचलं असं काही दिसत नाही. पण स्पर्धा सुरु होण्यापूर्वी पंतने केलेलं वक्तव्य याला कारणीभूत ठरलं आहे. लखनौ सुपर जायंट्सने 27 कोटींची बोली लावून संघात घेतलं. यानंतर झालेल्या एका मुलाखतीत पंत म्हणाला होता की, “आयपीएल लिलावात मला फक्त एकच टेन्शन होते.” यानंतर हसत म्हणला की, “पंजाब किंग्स.. मला भीती होती की पंजाब किंग्ज फ्रँचायझी मला खरेदी करेल.”

पंजाब किंग्सने आता लखनौ सुपरजायंट्सला त्यांच्याच घरच्या मैदानावर पराभूत करून विजय मिळवला आहे. यानंतर पंजाब किंग्सला लखनौचा कर्णधार ऋषभ पंतला डिवचण्याची आयती संधी मिळाली. सोशल मीडियावर श्रेयस अय्यरचा व्हिडिओ शेअर करत एक पोस्ट लिहिलं की, आयपीएल लिलावात आमचा तणाव संपला होता. लखनौ सुपरजायंट्स संघाचा कर्णधार झाल्यानंतर ऋषभ पंतच्या विधानावर पंजाब किंग्सने ही प्रतिक्रिया दिली आहे.

Follow Us
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke : खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
Abhijeet Dipke : मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; अभिजीत दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं तोंडभरून कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा