IPL 2025 : सहा सामने गमावूनही राजस्थान रॉयल्स प्लेऑफमध्ये मिळवणार स्थान! कसं ते समजून घ्या

आयपीएल 2025 स्पर्धा आता रंजक वळणावर येऊन ठेपली आहे. पहिल्या सात सामन्यांचा खेळ संपला असून आता प्रत्येक सामन्यानंतर प्लेऑफचं गणित बदलणार आहे. अजूनही दहा संघ प्लेऑफमध्ये स्थान मिळवू शकतात. राजस्थान रॉयल्सचं गणित कसं आहे ते समजून घ्या

IPL 2025 : सहा सामने गमावूनही राजस्थान रॉयल्स प्लेऑफमध्ये मिळवणार स्थान! कसं ते समजून घ्या
राजस्थान रॉयल्स
Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: Apr 20, 2025 | 5:24 PM

आयपीएल 2025 स्पर्धेतील प्रत्येक सामन्यानंतर प्लेऑफचं चित्र बदलताना दिसत आहे. साखळी फेरीचे सामने आता आता दुसऱ्या टप्प्यात आले आहे. म्हणजेच प्रत्येक संघाने 14 पैकी 7 सामने खेळले आहेत. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यात प्लेऑफचं गणित सोडवण्यासाठी करो या मरोची लढाई सुरु आहे. आयपीएल स्पर्धेत पहिल्या टप्प्यात सर्वाधिक पराभवाचं तोंड पाहणारा संघ हा राजस्थान रॉयल्स आहे. गुणतालिकेत राजस्थान रॉयल्स हा संघ आठव्या स्थानावर आहे. संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्स संघाने 8 सामन्यापैकी फक्त दोन सामन्यात विजय नोंदवले आहेत. राजस्थान रॉयल्स संघाचे फक्त 4 गुण आहेत आणि त्याचा नेट रन रेट -0.633 आहे. या पर्वात राजस्थान रॉयल्स हा एकमेव संघ आहे, त्याने आतापर्यंत सर्वाधिक सहा पराभवांचा सामना केला आहे. तसेच राजस्थानला रॉयल्सला अजून 6 सामने खेळायचे आहेत. या सहा सामन्यांवर राजस्थान रॉयल्स प्लेऑफचं गणित अवलंबून आहे. जर त्यांनी ते सर्व सामने जिंकले तर ते प्लेऑफमध्ये पोहोचू शकतात. कसं काय ते गणित समजून घ्या

आयपीएल स्पर्धेत प्लेऑफमध्ये पात्र व्हायचं तर किमान 16 गुणांची गरज असते. कारण चौथ्या क्रमांकावरील संघ आरामात 16 गुणांसह प्लेऑफमध्ये पात्र ठरू शकतो. अजून तरी चौथ्या क्रमांकासाठी हेच गणित आहे. टॉप 4 संघात गुणांवरून काही गडबड झाली तर गणित बदलू शकतं. पण सध्या तरी 16 गुणांचं गणित आहे. त्यामुळे राजस्थान रॉयल्सला पुढील प्रत्येक सामना करो या मरोची लढाई आहे. म्हणजे उर्वरित सहा पैकी सहा सामन्यात विजय मिळवावा लागेल. त्यामुळे 12 गुणांची कमाई होईल आणि आधीचे 4 गुण पकडता 16 गुण होतील.

राजस्थान रॉयल्स संघ या स्पर्धेत कमनशिबी ठरला आहे. दोन सामने अगदी थोडक्या फरकाने गमावले आहेत. दिल्ली कॅपिटल्स विरुद्धचा सामना बरोबरीत सुटला होता. मात्र सुपर ओव्हरमध्ये दिल्ली कॅपिटल्सने बाजी मारली. त्यानंतर लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध शेवटच्या षटकात 9 धावांची गरज होती. पण आवेश खाने भेदक गोलंदाजी केली. आणि तीन विकेट्स घेतल्या आणि राजस्थानला हा सामना 2 धावांना गमवावा लागला.