चेन्नई का सुपर किंग कौन? आयुष म्हात्रे..! आरसीबीच्या गोलंदाजांना धुतलं
आयपीएल 2025 स्पर्धेतून चेन्नई सुपर किंग्सचं आव्हान संपुष्टात आलं आहे. पण संघातील खेळाडूंना पारखण्याची चांगली संधी चालून आहे. ऋतुराज गायकवाडच्या जागी संघात स्थान मिळालेला आयुष म्हात्रेही त्यापैकी एक आहे. त्याने भुवनेश्वर कुमार धुतला.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने चेन्नई सुपर किंग्ससमोर विजयासाठी 213 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान गाठणं कठीण असल्याने पहिल्या चेंडूपासून आक्रमक खेळीची अपेक्षा होती. पॉवर प्लेमध्ये सर्वाधिक धावांची गरज होती. त्यामुळे आयुष म्हात्रे आणि शाइक रशीदने आक्रमक सुरुवात करून दिली. आयुष म्हात्रेने आक्रमक पवित्रा धारण केला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून चौथं षटक टाकण्यासाठी भुवनेश्वर कुमार आला होता. यावेळी आयुष म्हात्रेने धु धु धुतला. त्याला चेंडू कुठे टाकायचा हेच कळालं नाही. आयुष म्हात्रे त्याने एका षटकात 26 धावा मारल्या. पहिल्या तीन चेंडूवर तीन चौकार, चौथ्या चेंडूवर षटकार आणि शेवटच्या दोन चेंडूंवर दोन चौकार मारले. त्यानंतरही आयुष म्हात्रेने आपला आक्रमक पवित्रा काय ठेवला. आयुष म्हात्रेने 25 चेंडूत 7 चौकार आणि दोन षटकार मारत 50 धावा पूर्ण केल्या. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट हा 200 चा होता. आयुष म्हात्रेचं आयपीएलमधील हे पहिलं अर्धशतक ठरलं. आयुष म्हात्रेने रवींद्र जडेजासोबत शतकी भागीदारी केली.
आयपीएल स्पर्धेत ऋतुराज गायकवाड जखमी झाल्यानंतर त्याचा जागी आयुष म्हात्रेला संधी मिळाली होती. पदार्पणाचा सामना त्याने मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळला. आयुष म्हात्रेने 15 चेंडत 32 धावांची खेळी केली. त्यानंतर सनरायझर्स हैदराबादविरुद्ध 19 चेंडूत 30 धावा केल्या. तर पंजाब किंग्सविरुद्ध 7 धावांवर खेळ आटोपला होता. पण त्यानंतर आयुष म्हात्रेने कमबॅक केलं. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुविरुद्ध अर्धशतकी खेळी केली. आयुष म्हात्रेने 48 चेंडूत 9 चौकार आणि 5 षटकार मारून 94 धावा करून बाद झाला. आयुष म्हात्रेचं शतक अवघ्या 6 धावांनी हुकलं. लुंगी एनगिडीच्या गोलंदाजीवर उत्तुंग फटका मारताना बाद झाला. कृणाल पांड्याने त्याचा अप्रतिम झेल पकडला. मोक्याच्या क्षणी आयुषची विकेट पडल्याने चेन्नईवर दडपण वाढलं.
आयपीएलमध्ये अर्धशतक ठोकणारा तिसरा तरूण फलंदाज ठरला आहे. 17 वर्षे आणि 291 दिवसाचा असताना त्याने अर्धशतक ठोकलं आहे. यासह त्याने सुरेश रैनाचा 17 वर्षे जुना विक्रम मोडीत काढला आहे. 2008 मध्ये 21 वर्षे आणि 148 दिवसांचा असताना सुरेश रैनाने मुंबई इंडियन्सविरुद्ध अर्धशतक ठोकलं होतं.
