AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2025 RCB vs GT Live Streaming : आरसीबी विजयी हॅटट्रिकसाठी सज्ज, गुजरातसमोर रोखण्याचं आव्हान

Royal Challengers Bengaluru vs Gujarat Titans Live Streaming : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आपल्या घरच्या मैदानात गुजरात टायटन्सविरुद्ध भिडणार आहे. आरसीबीचा हा या मोसमातील घरच्या मैदानातील पहिलाच सामना असणार आहे.

IPL 2025 RCB vs GT Live Streaming : आरसीबी विजयी हॅटट्रिकसाठी सज्ज, गुजरातसमोर रोखण्याचं आव्हान
RCB vs GT Ipl 2025 Live Streaming Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: Apr 01, 2025 | 10:05 PM
Share

आयपीएलच्या 18 व्या मोसमातील 14 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध गुजरात टायटन्स आमनेसामने असणार आहेत. रजत पाटीदार आरसीबीचं नेतृत्व करणार आहे. शुबमन गिल गुजरात टायटन्सची कॅप्टन्सी करणार आहे. दोन्ही संघांचा हा या मोसमातील तिसरा सामना असणार आहे. गुजरातने 2 पैकी 1 सामना जिंकला आहे. तर एका सामन्यात गुजरातचा पराभव झाला आहे. तर दुसऱ्या बाजूला आरसीबीने सलग दोन्ही सामने जिंकले आहेत. त्यामुळे आरसीबीकडे या सामन्यात विजयी हॅटट्रिक करण्याची संधी आहे. तर गुजरात टायटन्ससमोर आरसीबीची विजयी घोडदौड रोखण्याचं आव्हान असणार आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध गुजरात टायटन्स सामना केव्हा?

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध गुजरात टायटन्स सामना बुधवारी 2 एप्रिलला खेळवण्यात येणार आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध गुजरात टायटन्स सामना कुठे?

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध गुजरात टायटन्स सामना एमए चिदंबरम स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध गुजरात टायटन्स सामन्याला किती वाजता सुरुवात होईल?

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध गुजरात टायटन्स सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 7 वाजता टॉस होईल.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध गुजरात टायटन्स सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध गुजरात टायटन्स सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध गुजरात टायटन्स सामना मोबाईलवर कुठे पाहता येईल?

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध गुजरात टायटन्स सामना मोबाईलवर जिओ-हॉटस्टार एपवर लाईव्ह पाहता येईल.

गुजरात टायटन्स टीम: साई सुदर्शन, शुबमन गिल (कर्णधार), जोस बटलर (विकेटकीपर), राहुल तेवतिया, शाहरुख खान, अर्शद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, रशीद खान, कागिसो रबाडा, मोहम्मद सिराज, प्रसीद कृष्णा, शेरफेन रदरफोर्ड, ग्लेन फिलिप्स, इशांत शर्मा, अनुज रावत, वॉशिंग्टन सुंदर, महिपाल लोमरोर, जयंत यादव, निशांत सिंधू, कुलवंत खेजरोलिया, करीम जनात, जेराल्ड कोएत्झी, मानव सुथार, कुमार कुशाग्रा आणि गुरनूर ब्रार.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू टीम: फिलिप सॉल्ट, विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), टिम डेव्हिड, क्रुणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, जोश हेजलवुड, यश दयाल, सुयश शर्मा, रसिक दार सलाम, मनोज भंडागे, जेकब बेथेल, स्वप्नील सिंग, अभिनंदन सिंग, रोमॅरियो शेफर्ड, लुंगी एनगिडी, नुवान तुषारा, मोहित राठी आणि स्वस्तिक चिकारा.

Follow Us
नंदुरबार-मालेगाव मार्गावरील बस रस्त्यातच बंद, प्रवाशांचे हाल
नंदुरबार-मालेगाव मार्गावरील बस रस्त्यातच बंद, प्रवाशांचे हाल; एसटी महामंडळावर प्रश्नचिन्ह
महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यास फडणवीस सक्षम, शेलारांचे प्रत्युत्तर
शेलारांचे राऊतांना प्रत्युत्तर: महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यास फडणवीस सक्षम
पुणे रिंग रोडसाठी १०,५०२ कोटींची मान्यता, मेट्रो-१३ प्रकल्पही मंजूर
देवेंद्र फडणवीस: पुणे रिंग रोडसाठी १०,५०२ कोटींची मान्यता. मेट्रो-१३ प्रकल्पालाही मंजुरी.
अजितदादांच्या निधनानंतर बारामती पोरकी? पवारांना बारामतीकरांचं पत्र
अजित पवारांच्या निधनानंतर बारामती पोरकी? पवार कुटुंबीयांना बारामतीकरांचं खुलं पत्र
सिब्बलांच्या आरोपांवर राहुल नार्वेकरांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “निर्णय
सिब्बलांच्या आरोपांवर राहुल नार्वेकरांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “निर्णय शाश्वत”
मुंबई विद्यापीठाचा नवा नियम; परीक्षेसाठी 30 मिनिटं आधी पोहोचणं बंधनकार
मुंबई विद्यापीठाचा नवा नियम. परीक्षेसाठी 30 मिनिटे आधी उपस्थिती बंधनकारक
मराठी पाट्यांच्या मोहिमेचा महापालिकेकडून तिसरा टप्पा सुरू
१२ कोटींचा दंड वसूल: मुंबईत मराठी पाट्यांसाठी महापालिकेची धडक मोहीम
मराठा नेते आक्रमक; वाघमारेला मारणाऱ्याला 10 लाखांच्या बक्षिसाची घोषणा
मराठा नेत्यांकडून नवनाथ वाघमारे यांना थेट धमकी; माफी मागण्याची मागणी
पुण्यातील चूल मटण हॉटेलचा परवाना एफडीएने केला निलंबित
लोहगाव येथील चूल मटण हॉटेलवर अस्वच्छतेमुळे एफडीएची कारवाई
नाशिक पालकमंत्री गिरीश महाजन, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजनांची निवड, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन