AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2025 RCB vs PBKS Live Streaming : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यात कडवी झुंज, कोण होणार विजयी?

Royal Challengers Bengaluru vs Punjab Kings Live Streaming: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि पंजाब किंग्स दोन्ही संघांची 18 व्या मोसमात आतापर्यंत सारखीच कामगिरी राहिली आहे. त्यामुळे उभयसंघात चुरस पाहायला मिळणार आहे.

IPL 2025 RCB vs PBKS Live Streaming : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यात कडवी झुंज, कोण होणार विजयी?
RCB vs PBKS Preview Ipl 2025Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: Apr 17, 2025 | 10:42 PM
Share

आयपीएलच्या 18 व्या मोसमातील 34 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध पंजाब किंग्स आमनेसामने असणार आहेत. रजत पाटीदार आरसीबीचं नेतृत्व करणार आहे. तर श्रेयस अय्यर याच्याकडे पंजाब किंग्सच्या कर्णधारपदाची धुरा आहे. पंजाब आणि आरसीबीचा हा या मोसमातील सातवा सामना असणार आहे. दोन्ही संघांची या हंगामात सारखीच कामगिरी राहिली आहे. पंजाब आणि बंगळुरुने प्रत्येकी 4 सामने जिंकेल आहेत. तसेच दोन्ही संघांनी आपला शेवटचा सामना जिंकला आहे. त्यामुळे या दोन्ही संघामधील सामना अत्यंत चुरशीचा होण्याची शक्यता आहे.

कोण जिंकणार पाचवा सामना?

आरसीबी आणि पंजाब दोन्ही संघांनी 4 सामने जिंकलेत. मात्र ते सातत्य ठेवण्यात अपयशी ठरले आहेत. आरसीबीने पहिले 2 सामने सलग जिंकले. त्यानंतर तिसरा सामना गमावला. आरसीबीने पुन्हा कमबॅक केलं. मात्र पाचवा सामना गमवावा लागला. तर सहाव्या सामन्यात प्रतिस्पर्धी संघावर मात करत आरसीबीने चौथा विजय मिळवला. पंजाबचाही असाच प्रवास राहिला आहे. त्यामुळे आता सलग दुसरा आणि एकूण पाचवा विजय मिळवण्यासाठी पंजाब आणि आरसीबीमध्ये रस्सीखेच असणार आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध पंजाब किंग्स सामना केव्हा?

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध पंजाब किंग्स सामना शुक्रवारी 18 एप्रिलला खेळवण्यात येणार आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध पंजाब किंग्स कुठे?

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध पंजाब किंग्स सामना एम चिन्नास्वामी स्टेडियम,बंगळुरु येथे होणार आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध पंजाब किंग्स सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध पंजाब किंग्स सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 7 वाजता टॉस होईल.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध पंजाब किंग्स सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध पंजाब किंग्स सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध पंजाब किंग्स लाईव्ह मॅच मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध पंजाब किंग्स लाईव्ह मॅच मोबाईलवर जिओ-हॉटस्टार एपवर पाहायला मिळेल.

पॉइंट्स टेबलमध्ये कोण कुठे?

दरम्यान आरसीबीचा नेट रनरेट हा पंजाबपेक्षा चांगला आहे. त्यामुळे आरसीबी पॉइंट्स टेबलमध्ये पंजाबपेक्षा पुढे आहे. आरसीबी +0.672 नेट रनरेटसह तिसऱ्या स्थानी आहे. तर पंजाब +0.172 नेट रनरेटसह चौथ्या क्रमांकावर आहे.

शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत....
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप.
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं.
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा.
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का.
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल.
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी.
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ.
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट.