RR vs CSK Toss : चेन्नईने टॉस जिंकला, राजस्थानविरुद्ध 2 मोठे बदल, कुणाचा पत्ता कट? पाहा प्लेइंग ईलेव्हन

Rajasthan Royals vs Chennai Super Kings Toss: राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्स या दोन्ही संघांचा हा आयपीएलच्या 18 व्या मोसमातील तिसरा सामना आहे.

RR vs CSK Toss : चेन्नईने टॉस जिंकला, राजस्थानविरुद्ध 2 मोठे बदल, कुणाचा पत्ता कट? पाहा प्लेइंग ईलेव्हन
RR vs CSK Toss Ipl 2025
Image Credit source: IPL X Account
| Updated on: Mar 30, 2025 | 7:57 PM

आयपीएलच्या 18 व्या मोसमातील (IPL 2025) 11 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) आमनेसामने आहेत. या सामन्याचं आयोजन हे गुवाहाटीतील बारसपारा क्रिकेट स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजता टॉस झाला आहे. राजस्थानच्या होम ग्राउंडमध्ये चेन्नईने टॉस (Toss) जिंकला आहे. कर्णधार ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) याने फिल्डिंगचा निर्णय घेतला आणि राजस्थानला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. चेन्नई आणि राजस्थान यो दोन्ही संघांचा हा या मोसमातील तिसरा सामना आहे.

चेन्नईकडून 2 बदल, कुणाचा पत्ता कट?

चेन्नईने राजस्थानविरुद्धच्या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये मोठे बदल केले आहेत. कॅप्टन ऋतुराजने 2 बदल केले आहेत. जेमी ओव्हरटन याला ऑलराउंडर सॅम करन याच्या जागी संधी देण्यात आली आहे. तर दीपक हुड्डा याला बाहेरचा रस्ता दाखवत विजय शंकर याचा समावेश करण्यात आला आहे. तर दुसऱ्या बाजूला सलग 2 पराभवानंतरही रियान पराग याने प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही.

दोघांसाठी महत्त्वाचा सामना

राजस्थानने या हंगामातील पहिले 2 सामने गमावले आहेत. त्यामुळे राजस्थानचा कोणत्या स्थितीत विजय मिळवून पराभवाची मालिका खंडीत करण्याचा प्रयत्न असणार आहे. तर दुसऱ्या बाजूला विजयी सुरुवात केल्यानंतर चेन्नईला घरच्या मैदानात आरसीबीकडून पराभूत व्हावं लागलं होतं. त्यामुळे चेन्नईचा हा सामना जिंकून विजयी ट्रॅकवर परतण्याचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे दोन्ही संघाच चढाओढ पाहायला मिळणार आहे.

अनचेंज राजस्थान

चेन्नई सुपर किंग्ज प्लेइंग इलेव्हन : रचिन रवींद्र, राहुल त्रिपाठी, रुतुराज गायकवाड (कर्णधार), विजय शंकर, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (विकेटकीपर), जेमी ओव्हरटन, रविचंद्रन अश्विन, नूर अहमद, मथीशा पाथिराना आणि खलील अहमद.

राजस्थान रॉयल्स प्लेइंग इलेव्हन : यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन, नितीश राणा, रियान पराग (कर्णधार), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), शिमरोन हेटमायर, वानिंदू हसरंगा, जोफ्रा आर्चर, महीश तीक्षाना, संदीप शर्मा आणि तुषार देशपांडे.