RR vs LSG : एडन मारक्रम-आयुष बदोनीचं अर्धशतक, अब्दुल समदचा फिनीशिंग टच, राजस्थानसमोर 181 धावांचं आव्हान

Rajasthan Royals vs Lucknow Super Giants 1st Innings Highlights In Marathi : एडन मारक्रम, आयुष बदोनी आणि अब्दुल समद या त्रिकुटाने केलेल्या खेळीच्या जोरावर लखनौ सुपर जायंट्सने 180 धावा केल्या आहेत.

RR vs LSG : एडन मारक्रम-आयुष बदोनीचं अर्धशतक, अब्दुल समदचा फिनीशिंग टच, राजस्थानसमोर 181 धावांचं आव्हान
Aiden Markram and Ayush Badoni LSG vs RR Ipl 2025
Image Credit source: IPL X Account
| Updated on: Apr 19, 2025 | 9:48 PM

एडम मारक्रम-आयुष बदोनी या जोडीने केलेली अर्धशतकी खेळी आणि अब्दुल समद याने शेवटच्या षटकात केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर लखनौ सुपर जायंट्सने राजस्थान रॉयल्ससमोर आयपीएलच्या 18 व्या मोसमातील 36 व्या सामन्यात 181 धावांचं आव्हान ठेवलं आहे. लखनौने 20 ओव्हरमध्ये सवाई मानसिंह स्टेडियममध्ये 5 विकेट्स गमावून 180 धावा केल्या. अब्दुल समद याने शेवटच्या ओव्हरमध्ये 27 धावा ठोकल्या. त्यामुळे राजस्थान काही प्रमाणात बॅकफुटवर गेली. आता राजस्थानला या शेवटच्या ओव्हरमध्ये लुटवलेल्या 27 धावा किती महागात पडतात? हे निकालानंतरच स्पष्ट होईल.

लखनौ सुपर जायंट्सची बॅटिंग

लखनौ सुपर जायंट्सने टॉस जिंकला. कर्णधार ऋषभ पंत याने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. मात्र पंत पुन्हा एकदा फ्लॉप झाला. पंत 3 आणि ओपनर मिचेल मार्श 4 धावांवर आऊट झाले. निकोलस पूरन यानेही निराशा केली. पूरन याने 8 बॉलमध्ये 11 रन्स करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. पूरनच्या या खेळीत 2 चौकारांचा समावेश होता. मात्र एडन मारक्रम आणि आयुष बदोनी या जोडीने लखनौला खऱ्या अर्थाने तारलं. तर अखेरच्या क्षणी अब्दुल समद याने कमाल केली.

मार्श, पूरन आणि पंत हे त्रिकुट झटपट आऊट झाल्याने लखनौची 7.4 ओव्हरमध्ये 3 आऊट 54 अशी स्थिती झाली. मात्र त्यानंतर आयुष आणि मारक्रम या दोघांनी लखनौसाठी संकटमोचकाची भूमिका बजावली. आयुष आणि मारक्रम या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 76 धावांची भागीदारी केली. त्यानंतर मारक्रम आऊट झाला आणि सेट जोडी फुटली. मारक्रमने 45 बॉलमध्ये 5 फोर आणि 3 सिक्ससह 66 रन्स केल्या. त्यानंतर आयुष बदोनी 34 चेंडूत 50 धावा करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. मारक्रमनंतर आयुषही काही चेंडूंनंतर आऊट झाला. त्यामुळे लखनौच्या जेमतेम 160 धावा होतील, असं चित्र होतं. मात्र अब्दुल समद याने 20 व्या ओव्हरमध्ये 4 सिक्ससह एकूण 27 धावा केल्या. त्यामुळे लखनौ 180 धावांपर्यंत पोहचली.

राजस्थानसमोर 181 धावांचं आव्हान

अब्दुलने 10 बॉलमध्ये 300 च्या स्ट्राईक रेटने आणि 4 सिक्सच्या मदतीने नॉट आऊट 30 रन्स केल्या. तर डेव्हिड मिलर नाबाद 7 धावा करुन परतला. राजस्थानकडून वानिंदू हसरंगा याने सर्वाधिक 2 विकेट्स मिळवल्या. तर जोफ्रा आर्चर, संदीप शर्मा आणि तुषार देशपांडे या तिघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.