AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2025 : आरसीबी अंतिम फेरी गाठणार? 38 दिवसांपूर्वी असंच काही घडलं होतं की..

आयपीएल 2025 स्पर्धेतील अंतिम फेरीचा पहिला संघ ठरण्यासाठी अवघ्या काही तासांचा अवधी शिल्लक आहेत. 29 मे रोजी पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात लढत होणार आहे. यापैकी विजेता संघ अंतिम फेरी गाठेल. असं असताना 38 दिवसांपूर्वीची चर्चा रंगली आहे.

IPL 2025 : आरसीबी अंतिम फेरी गाठणार? 38 दिवसांपूर्वी असंच काही घडलं होतं की..
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अंतिम फेरीत स्थान पक्कं करणार?Image Credit source: PTI
| Updated on: May 28, 2025 | 4:16 PM
Share

आयपीएल 2025 स्पर्धेच्या क्वॉलिफायर 1 फेरीतील पहिला सामना पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात होत आहे. हा सामना 29 मे रोजी मुल्लांपूरमध्ये होणार आहे. या सामन्यातील विजेता संघ थेट अंतिम फेरी गाठणार आहे. त्यामुळे या सामन्याचं महत्त्व अधिक आहे. या सामन्यात पंजाब किंग्सच्या तुलनेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचं पारडं जड वाटत आहे. त्यामुळे आरसीबीचं अंतिम फेरी गाठणं जवळपास निश्चित असल्याचं बोललं जात आहे. पंजाब किंग्ससोबत 38 दिवसांपूर्वी असंच काहीसं घडलं होतं. त्यामुळे पंजाब किंग्सच्या चाहत्यांची धाकधूक वाढली आहे. नेमकं 38 दिवसांपूर्वी काय झालं होतं? असा प्रश्न पडला असेल तर त्याचं उत्तर जाणून घ्या. 20 एप्रिल 2025 रोजी मुल्लांपूरमध्ये पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु हे संघ भिडले होते. या सामन्यात आरसीबीने पंजाब किंग्सला 7 विकेट्सने पराभूत केलं होतं.

आयपीएल स्पर्धेतील 37व्या सामन्यात पंजाब किंग्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 गडी गमवून 157 धावा केल्या. तसेच विजयासाठी 158 धावांचं आव्हान ठेवलं. हे आव्हान रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने 18.5 षटकात फक्त 3 गडी गमवून पूर्ण केलं. विराट कोहलीने या सामन्यात 54 चेंडूत 7 चौकार आणि 1 षटकार मारत नाबाद 73 धावा केल्या. सामन्यानंतर विराट कोहलीला सामनावीराचा पुरस्कार मिळाला. यावेळी विराट कोहलीने श्रेयस अय्यरला मजेशीर अंदाजात डिवचलं होतं. खरं तर क्वॉलिफायर 1 फेरीत पंजाब किंग्सकडे आरसीबीची हिशेब चुकता करण्याची संधी आहे. पण त्याची शक्यता कमीच दिसत आहे. कारण मुल्लांपूरचं मैदान हे पंजाब किंग्सला तितकं भावलं नाही.

पंजाब किंग्सने आयपीएल 2025 साखळी फेरीतील 4 सामने मुल्लांपूरमध्ये खेळले आहेत. त्यापैकी 2 सामन्यात विजय, तर 2 सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. त्यामुळे जय पराजयाचं गणित हे 50-50 आहे. त्यामुळे आरसीबी पंजाब किंग्सच्या कमकुवत बाजूचा लाभ घेत अंतिम फेरी गाठू शकते. दुसरीकडे, लखनौ सुपर जायंट्सला पराभूत केल्यानंतर जितेश शर्माने सांगितलं की, ‘ हेझलवुड तंदुरुस्त आहे आणि आमच्या संघातील विश्वास प्रणाली खूप मजबूत आहे आणि तुम्ही जे काही खेळाडू पहाल, ते सर्वजण सामना जिंकणारे आहेत आणि जरी आम्ही 3-4 विकेट गमावल्या तरी, आमच्यात नेहमीच विश्वास होता.’

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.