AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026 : 19 व्या मोसमातील पहिला डबर हेडर केव्हा? पलटणसह हे 4 संघ भिडणार

IPL 2026 1st Double Header Schedule : आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या हंगामात यंदा एकूण 8 डबल हेडर खेळवण्यात येणार आहेत. या डबल हेडरमधील पहिला सामना कधी आणि कुठे होणार? जाणून घेऊयात.

IPL 2026 : 19 व्या मोसमातील पहिला डबर हेडर केव्हा? पलटणसह हे 4 संघ भिडणार
IPL TrophyImage Credit source: IPL
| Updated on: Mar 31, 2026 | 5:58 AM
Share

आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या हंगामात (IPL 2026) 30 मार्चपर्यंत 3 सामन्यांचं यशस्वीरित्या आयोजन करण्यात आलं आहे. स्पर्धेला शनिवार 28 मार्चपासून सुरुवात झाली. आयपीएल स्पर्धेत शनिवारी आणि रविवारी साधारणपणे 2 सामने अर्थात डबल हेडरच आयोजन करण्यात येतं. मात्र 19 व्या मोसमाची सुरुवातच शनिवारपासून झाल्याने डबल हेडरचं आयोजन करण्यात आलं नाही. या निमित्ताने या मोसमातील पहिल्या डबल हेडरचा थरार कधी रंगणार? तसेच या डबल हेडरमध्ये कोणते 4 संघ आमनेसामने असणार? हे जाणून घेऊयात.

पहिला डबल हडेर केव्हा?

आयपीएल स्पर्धेतील 19 व्या मोसमातील पहिल्या डबल हेडरचा थरार हा शनिवारी 4 एप्रिलला रंगणार आहे. या डबल हेडरमध्ये दिल्ली कॅपिट्ल्स, मुंबई इंडियन्स, गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स सहभागी होणार आहेत. या चारही संघांचा हा या मोसमातील प्रत्येकी दुसरा सामना असणार आहे. स्पर्धेत 30 मार्चपर्यंत मुंबई आणि राजस्थानने आपला 1 सामना खेळला आहे.  बई आणि राजस्थान या दोन्ही संघांनी मोसमात विजयी सलामी दिली आहे. मुंबईने केकेआरला तर राजस्थानने चेन्नईला पराभूत केलं आहे.

तर दिल्ली आणि गुजरात टायटन्सचा अद्याप पहिला सामना झालेला नाही. त्यामुळे दिल्ली आणि गुजरात आपल्या सलामीच्या सामन्यात कशी कामगिरी करतात हे त्यांच्यासाठी महत्त्वाचं असणार आहे.

डबल हेडरमधील पहिला सामन्यात कोण भिडणार?

दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध मुंबई इडियन्स यांच्यात डबल हेडरमधील पहिला सामना होणार आहे. या सामन्याचं आयोजन हे नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. सामन्याला दुपारी 3 वाजता सुरुवात होणार आहे. मुंबईचा दिल्लीला पराभूत करुन सलग दुसरा सामना जिंकण्याचा प्रयत्न असणार आहे. तर दिल्ली मुंबईला सलग दुसरा सामना जिंकण्यापासून रोखण्यात यशस्वी ठरणार का? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स आमनेसामने

तसेच डबल हेडरमधील दुसऱ्या 19 व्या पर्वातील नवव्या सामन्यात गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स 2 हात करणार आहेत. दोन्ही संघांचा हा या पर्वातील एकूण दुसरा सामना असणार आहे. सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 7 वाजता टॉस होईल.

Follow Us
साडेतीन वर्षांच्या मुलीने आजीला सांगितलं अन् धक्कादायक प्रकार उघडकीस!
साडेतीन वर्षांच्या मुलीने आजीला सांगितलं अन् धक्कादायक प्रकार उघडकीस! स्कूल व्हॅनमध्ये...
मुंबईच्या गणेशोत्सवात DJ-लेझरला कायमची नो एन्ट्री! पोलीस आयुक्त देवेन
Mumbai DJ Ban | मुंबईच्या गणेशोत्सवात DJ-लेझरला कायमची नो एन्ट्री! पोलीस आयुक्त देवेन भारतींची मोठी घोषणा
मनसे नेत्याच्या दहीहंडीला पोलिसांनी परवानगी नाकारली
Dahi Handi in Mumbai | कालपर्यंत परवानगी, रात्री अचानक नकार! मनसे नेत्याच्या दहीहंडीला पोलिसांनी परवानगी नाकारली
परदेशात शिकण्याचं स्वप्न पाहणाऱ्या मराठा कुणबी विद्यार्थ्यांना दिलासा!
परदेशात शिकण्याचं स्वप्न पाहणाऱ्या मराठा कुणबी विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! सारथी शिष्यवृत्तीवरील खर्च मर्यादेवर मोठा निर्णय
मुंबईत ठाकरे गटाची भव्य दहीहंडी! शिवसेना भवनासमोर गोविंदांचा जल्लोष
Thackeray Group Dahihandi | मुंबईत ठाकरे गटाची भव्य दहीहंडी! शिवसेना भवनासमोर गोविंदांचा जल्लोष बघाच
जरांगेंच्या उपोषणाचा 8वा दिवस! अंतरवली सराटीत आंदोलकांची मोठी गर्दी
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या उपोषणाचा 8वा दिवस! अंतरवली सराटीत मराठा आंदोलकांची मोठी गर्दी
कृष्ण जन्मला गं बाई! देशभर कृष्णजन्माष्टमीचा उत्साह बघाच
कृष्ण जन्मला गं बाई! देशभर कृष्णजन्माष्टमीचा उत्साह; मध्यरात्री बाळकृष्णाचा जन्मसोहळा, मंदिरांमध्ये भाविकांची अलोट गर्दी
मोठी बातमी, ठाकरे गटाला मुंबईत धक्का, विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द
मोठी बातमी, ठाकरे गटाला मुंबईत धक्का, विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द
मतदार यादीतील फेरफारवरून उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर साधला निशाणा
उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप: महाराष्ट्रातून दोन कोटी मतदार वगळले, भविष्यात बनावट मतदारांचा धोका
डीजे परवानगीशिवाय वाजवला, पुण्यातील मंडळाला कोर्टाकडून दोषी ठरवून दंड
पुण्यात जुलूसदरम्यान अनधिकृत डीजे; अल मदिना यंग बॉईज सर्कलला कोर्टाचा दणका