रवि शास्त्रींनी Live सामन्यात लखनौ सुपर जायंट्सच्या गोलंदाजाचे कान टोचले, जिममध्ये जाण्यापेक्षा…
आयपीएल 2026 स्पर्धेत लखनौ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात लढत सुरू आहे. या सामन्यात रवि शास्त्री यांनी समालोचन करताना वेगवान गोलंदाज मयंक यादवची खरडपट्टी काढली. त्याला जिमच्या बाहेर राहण्याचा सल्ला दिला. असं का ते जाणून घ्या

आयपीएल 2026 स्पर्धेतील 59व्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. या सामन्यात प्लेइंग 11 मध्ये मयंक यादवला स्थान दिलं होतं. त्याने चार षटकं टाकली आणि 26 धावा दिल्या. पण त्याला एकही विकेट मिळाली नाही. असं असलं तरी धावगती रोखण्यास मदत केली. त्याने या सामन्यात 150 किमी प्रति तासाने गोलंदाजी केली. त्याची गोलंदाजी पाहून रवि शास्त्री यांना गप्प बसवलं नाही. त्यांनी त्याच्यावर टिपणी करताना कान टोचले. त्यांचं हे विधान आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रवि शास्त्री यांनी सांगितलं की, या खेळाडूमध्ये खूप टॅलेंट आहे. पण त्याला आपल्या आपल्या फिटनेसवर काम करावं लागेल. मयंक यादवला जास्तीत जास्त सामने खेळावे लागली. रवि शास्त्री यांनी पुढे सांगितलं की, मयंका यादवला जिममध्ये पाहू इच्छित नाही.
मयंक यादववर टिपणी करताना रवि शास्त्री म्हणाले…
स्टार स्पोर्ट्सवर समालोचन करताना रवि शास्त्री यांनी मयंक यादवबाबत सांगितलं की, ‘या गोलंदाजाला सामने खेळावे लागतील. मी या खेळाडूला जिममध्ये पाहून इच्छित नाही. गोलंदाजी करणार तरच फिट होणार.’ रवि शास्त्री यांनी मयंकला सल्ला देताना सांगितलं की, ‘जिम नाही तर मॅच खेळा. युवा गोलंदाज आहेस तर गोलंदाजी करून मसल्स करणं आवश्यक आहे. जर जिममध्ये मसल्स करण्याचा प्रयत्न करेल तर जखमी होणार. कपिल देवला मी कधीच जिममध्ये पाहिलं नाही. श्रीनाथलाही कमी पाहिलं आहे.’
मयंक यादव आता फक्त 23 वर्षांचा आहे आणि इतक्या कमी वयात त्याला दुखापतीने ग्रासलं आहे. दिल्लीसाठी जेव्हा लोअर एज क्रिकेट खेळायचा तेव्हा त्याला घोट्याला आणि हॅमस्ट्रिंगला दुखापत झाली. आयपीएल 2023 मध्ये हॅमस्ट्रिंग फाटल्याने संपूर्ण स्पर्धेला मुकला होता. त्यानंतर 2024 मध्ये बरगडीला ताण आल्याने एक षटक टाकून मैदान सोडलं. 2024 मध्ये टीम इंडियात पदार्पण केलं. पण तीन सामने खेळल्यानंतर दुखापत झाली. त्यानंतर संपूर्ण देशांतर्ग हंगाम खेळला नाही. 2025 मध्ये पाठीवर शस्त्रक्रिया झाली. त्यानंतर आयपीएल 2026 स्पर्धेत पुनरागमन केलं. पण त्याच्या गोलंदाजीचा सरासरी वेग कमी झाला आहे. पूर्वी सरासरी 145 किमी प्रतितास वेगाने चेंडू टाकत होता. पण आता हा वेग 136 वर आला आहे.