Virat Kohli ची ऐतिहासिक कामगिरी, IPL स्पर्धेत 9 हजार धावा, अशी कामगिरी करणारा पहिलाच फलंदाज
Virat Kohli Milestone : विराट कोहली याने नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये इतिहास घडवला. विराटने दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध नॉट आऊट 23 रन्स केल्या. मात्र विराटच्या या खेळीतील 11 वी धाव ही त्याच्यासाठी ऐतिहासिक ठरली.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने 27 एप्रिलला धमाका केला. गतविजेता आरसीबीने आयपीएल 2026 स्पर्धेतील 39 व्या सामन्यात होम टीम दिल्ली कॅपिट्ल्सचा त्यांच्याच घरच्या मैदानात 9 विकेट्सने धुव्वा उडवला. आरसीबीने दिल्लीला 75 धावांवर गुंडाळलं. त्यामुळे आरसीबीला 76 धावांचं माफक आव्हान मिळालं. आरसीबीने 6.3 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून विजयी आव्हान पूर्ण केलं. आरसीबीचा हा या मोसमातील सहावा विजय ठरला. आरसीबीने या विजयासह प्लेऑफच्या दिशेने वाटचाल सुरु केली आहे. तसेच या सामन्यादरम्यान आरसीबीचा सर्वात अनुभवी फलंदाज विराट कोहली याने इतिहास घडवला.
आरसीबीने जेकब बेथल याच्या रुपात पहिली आणि एकमेव विकेट गमावली. जेकबने 20 धावा केल्या. त्यानंतर विराटने देवदत्त पडीक्कल याच्यासह दुसऱ्या विकेटसाठी 22 बॉलमध्ये 51 रन्सची नॉट आऊट पार्टनरशीप केली आणि आरसीबीला विजयी केलं. विराटने दिल्ली विरुद्ध 15 बॉलमध्ये 153.33 च्या स्ट्राईक रेटने नॉट आऊट 23 रन्स केल्या. विराटने या खेळीत 2 षटकार आणि 1 चौकार लगावला. विराटने या दरम्यान कोणत्याच फलंदाजाला न जमलेली कामगिरी करुन दाखवली. तसेच विराटही अशी कामगिरी करणारा पहिलाच फलंदाज ठरला.
9 हजारी विराट
विराटने आयपीएल कारकीर्दीत 9 हजार धावा पूर्ण केल्या. विराट एका टीमकडून तसेच कारकीर्दीत 9 हजार धावा करणारा एकमेवाद्वीतिय फलंदाज ठरला. विराटला या सामन्याआधी 11 धावांची गरज होती. विराटने सहाव्या ओव्हरमधील शेवटच्या बॉलवर 1 रन घेतली. विराटने यासह आयपीएलमध्ये 9 हजार धावा पूर्ण केल्या.
विराटने यासह आयपीएल स्पर्धेत वेगवान 1 हजारच्या टप्प्यात धावा करण्याची मालिका यशस्वीरित्या कायम ठेवली आहे. विराटने याआधीही आयपीएल स्पर्धेत वेगवान 4 हजार, 6 हजार, 7 हजार आणि 8 हजार वेगवान धावा करण्याचा कारनामा केला आहे.
आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
Miles ahead of the pack! 🏃♂️
Virat Kohli operating on a different level 🫡#TATAIPL | #KhelBindaas | #DCvRCB | @RCBTweets pic.twitter.com/HkdKh8NKD1
— IndianPremierLeague (@IPL) April 27, 2026
आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या पहिल्या 5 फलंदाजांमध्ये 4 भारतीय आणि एक विदेशी खेळाडू आहे. या यादीत विराट कोहली पहिल्या स्थानी आहे. विराटनंतर रोहित शर्मा दुसऱ्या स्थानी आहे. माजी फलंदाज शिखर धवन तिसऱ्या स्थानी विराजमान आहे. डेव्हिड वॉर्नर चौथ्या आणि केएल राहुल पाचव्या स्थानी आहे.
कुणाच्या नावावर किती धावा?
- विराट कोहली : 9 हजार 12 धावा
- रोहित शर्मा : 7 हजार 183 धावा
- शिखर धवन : 6 हजार 769 धावा
- डेव्हिड वॉर्नर : 6 हजार 565 धावा
- केएल राहुल : 5 हजार 580 धावा
विराटची 19 व्या मोसमातील कामगिरी
दरम्यान विराटने आतापर्यंत 19 व्या हंगामात आरसीबीकडून आठही सामने खेळला आहे. विराटने या दरम्यान 58.5 च्या सरासरीने 351 धावा केल्या आहेत. विराटने या दरम्यान 3 अर्धशतकं लगावली आहेत. तसेच विराट आरसीबीसाठी या 19 व्या मोसमात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे.