GT vs RCB Toss : गुजरातचा आरसीबी विरुद्ध बॉलिंगचा निर्णय, विराट प्लेइंग ईलेव्हनमध्ये की इम्पॅक्ट प्लेअर?

Gujarat Titans vs Royal Challengers Bengaluru Toss and Playing 11 : गुजरात टायटन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु दोन्ही संघांचा 19 व्या मोसमातील हा एकूण नववा तसेच एकमेकांविरुद्धचा दुसरा सामना आहे.

GT vs RCB Toss : गुजरातचा आरसीबी विरुद्ध बॉलिंगचा निर्णय, विराट प्लेइंग ईलेव्हनमध्ये की इम्पॅक्ट प्लेअर?
GT vs RCB Toss IPL 2026
Image Credit source: Bcci
| Updated on: Apr 30, 2026 | 8:13 PM

आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील (IPL 2026) 42 वा सामना गुजरात टायटन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात होणार आहे. उभयसंघातील सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजता टॉस झाला. गुजरातच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला आहे. कर्णधार शुबमन गिल याने बॉलिंगचा निर्णय घेत आरसीबीला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. दोन्ही संघांनी प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. दोन्ही संघ गेल्या सामन्यातील प्लेइंग ईलेव्हनसह मैदानात उतरणार आहे.

नरेंद्र मोदी स्टेडियममधील आकडेवारी

आयपीएलच्या 19 व्या मोसमात आतापर्यंत अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमध्ये एकूण 10 सामने खेळवण्यात आले आहेत. या 10 पैकी 6 सामन्यात पहिले बॅटिंग करणारी टीम जिंकली आहे. तर 3 वेळा चेजिंग करणाऱ्या संघाचा विजय झाला आहे. तसेच 1 सामना टाय झाला आहे. त्यामुळे अहमदाबादमध्ये होणाऱ्या आयपीएल 2026 मधील 11 व्या सामन्यात कोणता संघ जिंकणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

आरसीबी-गुजरात दुसऱ्यांदा आमनेसामने

बंगळुरु-गुजरात दोन्ही संघांची 19 व्या मोसामात आमनेसामने येण्याची आठवड्याभरातील एकूण दुसरी वेळ आहे. याआधी उभयसंघात 24 एप्रिलला सामना झाला होता. त्या सामन्यात आरसीबीने गुजरातवर 5 विकेट्सने मात केली होती. त्यामुळे गुजरातचा आरसीबी विरुद्ध गेल्या पराभवाची परतफेड करण्याचा प्रयत्न असणार आहे.

दोन्ही संघांची आतापर्यंतची कामगिरी

दरम्यान आरसीबीने 19 व्या मोसमात खेळलेल्या 8 पैकी 6 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. आरसीबीच्या खात्यात 12 गुण आहेत. आरसीबीचा नेट रनरेट +1.919 असा आहे. आरसीबी पॉइंट्स टेबलमध्ये दुसर्‍या स्थानी आहे. तर गुजरातने 8 पैकी 4 सामने जिंकलेत. तसेच गुजरातला 4 सामने गमवावे लागले आहेत. गुजरातच्या खात्यात 8 गुण आहेत. गुजरात पॉइंट्स टेबलमध्ये पाचव्या स्थानी विराजमान आहे.

गुजरात टायटन्स प्लेइंग ईलेव्हन : शुबमन गिल (कॅप्टन), साई सुदर्शन, जोस बटलर (विकेटकीपर), जेसन होल्डर, शाहरुख खान, वॉशिंग्टन सुंदर, अर्शद खान, रशीद खान, कागिसो रबाडा, मोहम्मद सिराज आणि मानव सुथार.

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू प्लेइंग ईलेव्हन : विराट कोहली, जेकब बेथेल, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार (कॅप्टन), जितेश शर्मा (विकेटकीपर), टीम डेव्हीड, रोमारियो शेफर्ड, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, सुयश शर्मा आणि जोश हेजलवुड.

Follow Us