AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

GT vs RR, Qualifier 2 : कॅप्टन गिलचं शतक, गुजरातची फायनलमध्ये धडक, राजस्थानचा 7 विकेट्सने धुव्वा

Gujarat Titans vs Rajasthan Royals Qualifier 2 Match Result : राजस्थान रॉयल्सने गुजरात टायटन्ससमोर विजयासाठी 215 धावांचं आव्हान ठेवलं होतं. गुजरातन हे आवहान सुरक्षित अंतराने पूर्ण करत अंतिम फेरीत धडक दिली आहे. गुजरातचा प्लेऑफ्समधील राजस्थान विरुद्धचा सलग आणि एकूण तिसरा विजय ठरला.

GT vs RR, Qualifier 2 : कॅप्टन गिलचं शतक, गुजरातची फायनलमध्ये धडक, राजस्थानचा 7 विकेट्सने धुव्वा
Gujarat Titans IPL 2026Image Credit source: Bcci
| Updated on: May 29, 2026 | 11:47 PM
Share

कॅप्टन शुबमन गिल याने केलेलं शतक आणि साई सुदर्शन याच्या अर्धशतकाच्या जोरावर गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सवर दणदणीत विजय मिळवून आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील अंतिम फेरीत धडक दिली आहे. राजस्थान रॉयल्सने वैभव सूर्यवंशी याने केलेल्या 96 रन्सच्या जोरावर गुजरातसमोर 215 धावांचं आव्हान ठेवलं होतं. गुजरातने हे आव्हान एकतर्फी फरकाने पूर्ण करुन 7 विकेट्सने विजय मिळवला आहे. गुजरातने विजयी आव्हान 8 बॉलआधी पूर्ण केलं. गुजरातने 18.4 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून 219 धावा केल्या. गुजरातने अशाप्रकारे अंतिम फेरीचं तिकीट मिळवलं. तर राजस्थानचं पराभवासह 19 व्या हंगामातून पॅकअप झालं आहे.

सामन्याचा धावता आढावा

राजस्थानने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. ओपनर वैभव सूर्यवंशी, रवींद्र जडेजा आणि डोनोव्हन फरेरा या तिघांनी केलेल्या खेळीच्या जोरावर राजस्थान द्विशतक पूर्ण केलं. राजस्थानने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 214 धावा केल्या. राजस्थानसाठी वैभव सूर्यवंशी याने सर्वाधिक धावा केल्या. वैभवने 47 बॉलमध्ये 7 सिक्स आणि 8 फोरसह 96 रन्स केल्या. रवींद्र जडेजा याने 35 चेंडूत नाबाद 45 धावा केल्या. तर फरेरा याने 11 बॉलमध्ये नॉट आऊट 38 रन्स जोडल्या. गुजरातसाठी कगिसो रबाडा आणि जेसन होल्डर या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. तर मोहम्मद सिराज आणि प्रसिध कृष्णा या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.

गुजरातची विक्रमी सुरुवात

साई सुदर्शन आणि शुबमन गिल या सलामी जोडीने अफलातून सुरुवात करुन गुजरातच्या विजयाचा पाया रचला. या दोघांनी सर्वाधिक 11 व्यांदा 100 पेक्षा अधिक धावांची भागीदारी केली. साई आणि शुबमनने 12.5 ओव्हरमध्ये 167 रन्सची पार्टनरशीप केली. साई आऊट होताच ही जोडी फुटली. साई सलग दुसऱ्या सामन्यात हिट विकेट झाला. साईने 32 बॉलमध्ये 58 रन्स केल्या.

त्यानंतर कॅप्टन शुबमन गिल याने शतक झळकावलं. मात्र शुबमन शतकानंतर आऊट झाला. शुबमनने 53 बॉलमध्ये 3 सिक्स आणि 15 फोरसह 104 रन्स जोडल्या. वॉशिंग्टन सुंदर 16 धावा करुन माघारी परतला. तर जोस बटलर आणि राहुल तेवतिया या दोघांनी नाबाद राहत गुजरातला विजयी केलं. जोस बटलर याने 9 तर राहुल तेवतिया याने 17 धावांचं योगदान दिलं. तसेच राजस्थानसाठी जोफ्रा आर्चर, नांद्रे बर्गर आणि ब्रिजेश शर्मा या तिघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.

स्कोअरकार्ड

गुजरातची तिसरी वेळ

दरम्यान गुजरात टायटन्सची अंतिम फेरीत पोहचण्याची तिसरी वेळ ठरली. याआधी गुजरातने 2022 आणि 2023 साली फायनलमध्ये धडक दिली होती. आता ट्रॉफीसाठी आरसीबी विरुद्ध गुजरात टायटन्स असा सामना होणार आहे. हा सामना रविवारी 31 मे रोजी अहमदाबादमध्ये होणार आहे.

Follow Us
जमत नसेल तर मी उपोषणाला बसतो; जरांगेंचा सरकारला थेट अल्टिमेटम
जमत नसेल तर मी उपोषणाला बसतो; जरांगेंचा सरकारला थेट अल्टिमेटम.
मान्सूनचे आगमन लांबणीवर?; हवामान खात्याने सांगितला धक्कादायक अंदाज
मान्सूनचे आगमन लांबणीवर?; हवामान खात्याने सांगितला धक्कादायक अंदाज.
नफ्याच्या हव्यासाने घेतले 14 जीव! विषारी दारूकांडामागचं काळं सत्य समोर
नफ्याच्या हव्यासाने घेतले 14 जीव! विषारी दारूकांडामागचं काळं सत्य समोर.
तुळजापुरात खुलेआम मटक्याचा बाजार!; सोशल मीडियावर VIDEO तुफान व्हायरल
तुळजापुरात खुलेआम मटक्याचा बाजार!; सोशल मीडियावर VIDEO तुफान व्हायरल.
NEET घोटाळ्यावर सुप्रीम कोर्टाचे NTA ला थेट प्रश्न.....
NEET घोटाळ्यावर सुप्रीम कोर्टाचे NTA ला थेट प्रश्न......
मनोज जरांगे पाटलांच्या भेटीपूर्वी विखे पाटलांचं मोठं विधान, उपोषणावर..
मनोज जरांगे पाटलांच्या भेटीपूर्वी विखे पाटलांचं मोठं विधान, उपोषणावर...
मोठी बातमी! मविआत जागावाटपावर शिक्कामोर्तब कोणता पक्ष किती जागा लढवणार
मोठी बातमी! मविआत जागावाटपावर शिक्कामोर्तब कोणता पक्ष किती जागा लढवणार.
14 जणांच्या मृत्यूनंतर रोहित पवार आक्रमक!; दारू अड्ड्यावर थेट धडक
14 जणांच्या मृत्यूनंतर रोहित पवार आक्रमक!; दारू अड्ड्यावर थेट धडक.
महायुतीचा जागावाटप फॉर्म्युला फायनल; कोणाच्या वाट्याला किती जागा?
महायुतीचा जागावाटप फॉर्म्युला फायनल; कोणाच्या वाट्याला किती जागा?.
राज्यसभेवर भुजबळांची नजर?; तिकीटासाठी पडद्यामागे जोरदार हालचाली
राज्यसभेवर भुजबळांची नजर?; तिकीटासाठी पडद्यामागे जोरदार हालचाली.