AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026 Points Table: हैदराबादला पहिल्याच विजयासह मोठा फायदा, पॉइंट्स टेबलमध्ये कितव्या स्थानी झेप?

IPL 2026 Points Table Ranking : सनरायजर्स हैदराबाद आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात विजयाचं खातं उघडणारी सहावी टीम ठरली. हैदराबाद या विजयासह पॉइंट्स टेबलमध्ये कितव्या स्थानी पोहचलीय? जाणून घ्या.

IPL 2026 Points Table: हैदराबादला पहिल्याच विजयासह मोठा फायदा, पॉइंट्स टेबलमध्ये कितव्या स्थानी झेप?
Sunrisers Hyderabad IPL 2026Image Credit source: PTI
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Apr 03, 2026 | 6:43 PM
Share

सनरायजर्स हैदराबादने अखेर गुरुवारी 2 एप्रिलला आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात विजयाचं खातं उघडलं. नियमित कर्णधार पॅट कमिन्स याच्या अनुपस्थितीत खेळणाऱ्या हैदराबादची या हंगामात पराभवाने सुरुवात झाली. त्यामुळे हैदराबादसाठी कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धचा सामना महत्त्वाचा होता. हैदराबादने कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध मोठ्या फरकाने मात करत विजय मिळवला. हैदराबादने 227 धावांचा पाठलाग करणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्सला 16 ओव्हरमध्ये 161 रन्सवर गुंडाळलं. हैदराबादने अशाप्रकारे 65 धावांनी हा सामना आपल्या नावावर केला. तर केकेआरला सलग दुसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला. हैदराबादला या विजयानंतर मोठा फायदा झाला आहे. हैदराबादच्या विजयानंतर पॉइंट्स टेबलमध्ये कोण कुठे आहे? हे आपण सविस्तर जाणून घेऊयात.

केकेआर सहाव्या स्थानी

केकेआर विरूद्धच्या विजयानंतर हैदराबादला 3 स्थानांचा फायदा झाला आहे. हैदराबाद केकेआर विरूद्धच्या सामन्याआधी पॉइंट्स टेबलमध्ये शेवटून दुसऱ्या अर्थात नवव्या स्थानी होती. मात्र हैदराबाद एका विजयासह थेट सहाव्या स्थानी पोहचली आहे.

ताज्या आकडेवारीनुसार, हैदराबादच्या खात्यात 2 सामन्यानंतर 2 गुण आहेत. तर हैदराबादचा नेट रनरेट हा +0.469 असा झाला आहे. हैदराबादला त्याआधी आपल्या मोहिमेतील पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध 6 विकेट्सने पराभूत व्हावं लागलं होतं.

केकेआरचा सलग दुसरा पराभव

कोलकाताचा हा हैदराबाद विरुद्धचा या मोसमातील पहिला आणि सलग दुसरा पराभव ठरला. केकेआरने यासह पहिल्यांदाच 2012 नंतर आपले पहिले सलग 2 सामने गमावले. केकेआरची या पराभवामुळे 2 स्थानांनी घसरण झाली. केकेआर या सामन्याआधी सातव्या स्थानी होती. मात्र केकेआरची पराभवानंतर नवव्या स्थानी घसरण झाली आहे.  केकेआरचा नेट रनरेट हा -1.964 असा झाला आहे. त्यामुळे आता केकेआरला आपलं आव्हान कायम ठेवायचं असेल तर येत्या काही सामन्यांमध्ये मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागणार आहे.

पहिल्या स्थानी कोण?

राजस्थान रॉयल्स पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी कायम आहे. दुसऱ्या क्रमांकावर गतविजेता आरसीबी आहे. तसेच तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर अनुक्रमे दिल्ली, मुंबई आणि पंजाब विराजमान आहे.

4 अपयशी संघ कोणते?

दरम्यान दुसऱ्या बाजुला कोलकाता नाईट रायडर्स व्यतिरिक्त चेन्नई सुपर किंग्स, लखनौ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स हे 3 संघ देखील अजूनही आपल्या पहिल्या विजयाच्या प्रतिक्षेत आहेत. अशात आता हे 3 संघ आपल्या मोहिमेतील दु्सऱ्या सामन्यात विजयाचं खातं उघडण्यात यशस्वी ठरणार की केकेआरप्रमाणे सलग दुसरा सामना गमावणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा