LSG vs CSK : मिचेल मार्शची तडाखेदार खेळी, चेन्नईचा 7 विकेट्सने धुव्वा, लखनौकडून हिशोब
Lucknow Super Giants vs Chennai Super Kings Match Result, IPL 2026 : लखनौ सुपर जायंट्सच्या सलामी जोडीने विस्फोटक बॅटिंग करुन पावरप्लेमध्येच चेन्नई सुपर किंग्सकडून सामना हिसकावून घेतला होता.

Mitchell Marsh and Josh Inglis LSG vs CSK
Image Credit source: Bcci
मिचेल मार्श आणि जॉश इंग्लिस या सलामी जोडीने केलेल्या शतकी भागीदारीच्या जोरावर लखनौ सुपर जायंट्सचा आयपीएल 2026 स्पर्धेतील (IPL 2026) 59 व्या सामन्यात 7 विकेट्सने धुव्वा उडवला आहे. चेन्नईने कार्तिक शर्मा याच्या 71 धावांच्या खेळीच्या जोरावर लखनौसमोर 188 धावांचं आव्हान ठेवलं होतं. लखनौने हे आव्हान 20 बॉलआधी 3 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. लखनौने 3 विकेट्स गमावून 16.4 बॉलमध्ये सामना जिंकला. लखनौचा हा या मोसमातील एकूण चौथा आणि चेन्नई सुपर किंग्स विरुद्धचा पहिला विजय ठरला. लखनौने या विजयासह चेन्नई विरूद्धच्या गेल्या पराभवाची परतफेड केली.
Follow Us