AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MI vs LSG : रोहित-रिकेल्टनचा झंझावात, मुंबईचा वानखेडेत जबरदस्त विजय, लखनौचा 6 विकेट्सने धुव्वा

Mumbai Indians vs Lucknow Super Giants IPL 2026, Match Result : मुंबई इंडियन्सने लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध आयपीएल इतिहासातील आपल्या सर्वोच्च धावसंख्येचा यशस्वीरित्या पाठलाग केला. यासह या 19 व्या मोसमात 200 पेक्षा अधिक धावांचा यशस्वी पाठलाग करण्याची ही 12 वी वेळ ठरली.

MI vs LSG : रोहित-रिकेल्टनचा झंझावात, मुंबईचा वानखेडेत जबरदस्त विजय, लखनौचा 6 विकेट्सने धुव्वा
Rohit Sharma and Ryan RickeltonImage Credit source: Bcci
| Updated on: May 05, 2026 | 7:21 AM
Share

रोहित शर्मा आणि रायन रिकेल्टन या सलामी जोडीने केलेल्या शतकी भागीदारीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील 47 व्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सवर 4 मे रोजी 6 विकेट्सने विजय मिळवला आहे. निकोलस पूरन याने केलेल्या वादळी खेळीच्या जोरावर लखनौने मुंबईसमोर 229 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मुंबईने हे आव्हान 8 बॉलआधी 4 विकेट्सच्या मोबदल्यात सहज पूर्ण केलं. मुंबईने 18.4 ओव्हरमध्ये 229 धावा केल्या. मुंबईने अशाप्रकारे आयपीएल इतिहासातील आपल्या सर्वोच्च धावसंख्येचा यशस्वी पाठलाग केला. मुंबईचा हा या मोसमातील वानखेडे स्टेडियममधील दुसरा तर एकूण तिसरा विजय ठरला. तर लखनौ पुन्हा एकदा अपयशी ठरली.

मुंबईची चाबूक सुरुवात

मुंबईने विजयी धावांचा पाठलाग करताना ज्या पद्धतीने सुरुवात केली ते पाहून पलटणच जिंकणार, असा विश्वास चाहत्यांना होता. रायन रिकेल्टन आणि रोहित शर्मा (इमपॅक्ट प्लेअर) या सलामी जोडीने चाबूक सुरुवात केली. दोघांनी पावरप्लेमध्ये 71 धावा जोडल्या. दोघांनी दोन्ही बाजूंनी फटकेबाजी सुरुच ठेवली. रोहित रायनने चौफेर फटकेबाजी करुन मुंबईच्या विजयाचा पाया मजबूत केला. सलामी जोडीला फार मोठी भागीदारी करण्याची संधी होती. मात्र मोहसिन खान याने ही जोडी फोडली.

रायननंतर रोहितही आऊट

मोहसिनने 11 व्या ओव्हरमधील पाचव्या बॉलवर रायनला आऊट केलं. रायनने 32 बॉलमध्ये 8 सिक्स आणि 6 फोरसह 83 रन्स केल्या. रोहित आणि रायनने 65 बॉलमध्ये केलेली 143 रन्सची पार्टनरशीप मोडीत निघाली. रायननंतर काही अंतराने रोहित आऊट झाला. रोहितने मुंबईसाठी सर्वाधिक धावा केल्या. रोहितने 44 चेंडूत 7 सिक्स आणि 6 फोरसह 84 धावा केल्या.

तिलक-सूर्या अपयशी

तिलक वर्मा आणि कॅप्टन सूर्यकुमार यादव या दोघांनी काही खास करता आलं नाही. तिलतने 11 आणि सूर्याने 12 धावा केल्या. त्यानंतर नमन धीर आणि विल जॅक्स या दोघांनी उर्वरित धावा पूर्ण केल्या आणि मुंबईला विजयी केलं. नमनने नाबाद 23 धावा केल्या. तर विलने नॉट आऊट 10 रन्सचं योगदान दिलं. लखनौसाठी मनीमरण सिंह याने 2 विकेट्स मिळवल्या. तर मोहम्मद शमी आणि मोहसिन खान या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.

पहिल्या डावात काय झालं?

त्याआधी मुंबईने टॉस जिंकला. कॅप्टन सूर्यकुमार यादव याने लखनौला बॅटिंगसाठी भाग पाडलं. लखनौने 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 228 धावांपर्यंत मजल मारली. लखनौसाठी निकोलस पूरन याने सर्वाधिक 63 धावा केल्या. मिचेल मार्श याने 44 धावा जोडल्या. हिंमत सिंग याने नाबाद 40 तर एडन मार्करम याने नॉट आऊट 31 रन्स केल्या.

स्कोअरकार्ड

अक्षत रघुवंशी याने 11, जोश इंग्लिसने 13 आणि कॅप्टन ऋषभ पंत याने 15 धावा जोडल्या. तर मुंबईसाठी कॉर्बिन बॉश याने एकाच ओव्हरमध्ये 2 विकेट्स मिळवल्या. तसेच अल्लाह गजनफर, विल जॅक्स आणि रघु शर्मा या तिघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.

Follow Us
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे...
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे दृश्य पाहाच!
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं....
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं बरळण्यापेक्षा...
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया...
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया समोर, एका वाक्यातच...
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी अखेर Metaने मागितली माफी, पहा व्हिडीओ
वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळ
Walmik Karad | वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळबळ
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत?
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत? सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut On SC Hearing | शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर संजय राऊतांचा मोठा दावा
शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात...
शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात नेमकं काय घडलं?
कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून...
Kunbi Certficate | कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून मोठी अपडेट समोर!