AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

6 बॉल, 6 सिक्स, द्विशतक करत विराटचा रेकॉर्ड ब्रेक, आता मुंबईसाठी डेब्यू, कोण आहे मयंक रावत?

Mayank Rawat Ipl Debut : मयंक रावत याला अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर अखेर आयपीएल पदार्पणाची संधी मिळाली आहे. मयंकने लीग स्पर्धेत आपली प्रतिभा दाखवून दिली आहे. त्यामुळे मयंक या मोसमात कशी कामगिरी करतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

6 बॉल, 6 सिक्स, द्विशतक करत विराटचा रेकॉर्ड ब्रेक, आता मुंबईसाठी डेब्यू, कोण आहे मयंक रावत?
Allrounder Mayank RawatImage Credit source: Instagram
| Updated on: Apr 16, 2026 | 9:32 PM
Share

मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यात आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील (IPL 2026) 24 व्या सामन्यात आमनेसामने आहेत. उभयसंघातील सामना वानखेडे स्टेडियममध्ये खेळवण्यात येत आहे. 4 पैकी 3 सामने जिंकलेल्या आणि अजिंक्य असलेल्या पंजाबने या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोणताच बदल केलेला नाही. मात्र दुसऱ्या बाजूला मुंबईकडून 3 बदल करण्यात आले आहेत. या बदलामुळे एका युवा आणि स्टार खेळाडूला पदार्पणाची संधी मिळाली आहे. मयंक रावत असं या खेळाडूचं नाव आहे. मयंक ऑलराउंडर आहे. मयंकच्या आयपीएल पदार्पणानिमित्ताने त्याने आतापर्यंत क्रिकेटमध्ये केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबाबत जाणून घेऊयात.

6 बॉलमध्ये 6 सिक्स

मयंकने आयपीएल ट्रायलमध्ये आपली छाप सोडली होती. मंयकने ट्रायलमध्ये 6 बॉलमध्ये 6 सिक्स ठोकले होते. मात्र त्यानंतरही मयंकला संधी मिळाली नव्हती. मात्र मंयकला आता संधी मिळाली. मयंकने दिल्ली प्रीमियर लीग (DPL) मध्येही आपला ठसा उमटवला होता. विविध स्पर्धेत आपला तडाखा दाखवणाऱ्या मयंकला अद्याप प्रतिष्ठेच्या रणजी ट्रॉफी स्पर्धेत खेळण्याची संधी मिळालेली नाही. मात्र मयंकचा आयपीएल स्पर्धेत श्रीगणेशा झाला आहे. त्यामुळे मंयक या संधीचा किती फायदा घेतो याकडे टीम मॅनेजमेंटचं लक्ष असणार आहे.

ऑलराउंडर मयंक

मंयक दिल्लीत विविध वयोगटातील स्पर्धेत खेळला आहे. मंयकने या दरम्यान अविस्मरणीय खेळी साकारली होती. मयंकने हरयाणा विरुद्ध द्विशतक केलं होतं. मंयकने यासह विराटचा विक्रम मोडीत काढला होता. मंयकला त्या कामगिरीसाठी 5 हजार रुपयांचं रोखं बक्षिस देण्यात आलं होतं.

2022 साली धमाका

मयंकने 2022 साली आयपीएल ट्रायल दरम्यान 6 बॉलमध्ये 6 सिक्स खेचले होते. मात्र त्यानंतरही दिल्ली कॅपिट्ल्सने मयंकला घेतलं नव्हतं. तसेच मंयकने 2024 साली डीपीएल स्पर्धेतील क्रिकेट सामन्यांमध्ये खोऱ्याने धावा केल्या होत्या. मयंकने इस्ट दिल्लीला चॅम्पियन करण्यात योगदान दिलं होतं. मयंकने डीपीएलच्या फायनलमध्ये चाबूक खेळी केली होती. मयंकने 39 चेंडूत 78 रन्स केल्या होत्या. मयंकने या दरम्यान 6 सिक्स आणि 7 फोर ठोकले होते.

मयंक रावतने या दरम्यान आयुष बडोनी याची धुलाई केली होती. मयंकने आयुषच्या बॉलिंगवर सलग 5 सिक्स लगावले होते. ईस्ट दिल्लीने हा सामना 3 धावांनी जिंकला होता. त्यामुळे आता मयंक आयपीएल स्पर्धेत काय करतो आणि कसा खेळतो? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
गिरीश महाजनांची बदनामी करणारा अखेर अटकेत! बनावट फोटो व्हायरल...
Girish Mahajan | गिरीश महाजनांची बदनामी करणारा अखेर अटकेत! बनावट फोटो व्हायरल प्रकरणात मोठा खुलासा
ठाकरे गटाला जबर धक्का! आंदोलन सुरु असतानाच जिल्हाप्रमुखांचा भाजपमध्ये
ठाकरे गटाला जबर धक्का! आंदोलन सुरु असतानाच जिल्हाप्रमुखांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
वडिलांच्या प्रश्नावर राजुल पाटील गप्प! पण सोनम वांगचुकांच्या लढ्याला..
Rajool Patil | वडिलांच्या प्रश्नावर राजुल पाटील गप्प! पण सोनम वांगचुक यांच्या लढ्याला जाहीर पाठिंबा
शिवाजी पार्कवर ठाकरेंची सभा संपली, पण आंदोलक हटले नाहीत
Uddhav Thackeray | शिवाजी पार्कवर ठाकरेंची सभा संपली, पण आंदोलक हटले नाहीत; पोलिसांची धावपळ वाढली!
वांगचुकांशी संवाद टाळणाऱ्या सरकारवर उद्धव ठाकरेंचा संताप, म्हणाले...
Uddhav Thackeray | वांगचुकांशी संवाद टाळणाऱ्या सरकारवर उद्धव ठाकरेंचा संताप; पाकिस्तानचा दाखला देत घेरलं!
ठाकरेंचे किती आमदार संपर्कात? फुटीर खासदाराने दिली मोठी माहिती
ठाकरेंचे किती आमदार संपर्कात? फुटीर खासदाराने दिली मोठी माहिती
खासदार सुप्रिया सुळे अचानक पुढे गेल्या अन् भाजप नेत्याच्या पाया...
खासदार सुप्रिया सुळे अचानक पुढे गेल्या अन् भाजप नेत्याच्या पाया का पडल्या? त्या व्हिडीओने रोखल्या नजरा
जो देश भारतात दहशतवादी पाठवतो, त्याच्याशी... ठकारेंची सरकारवर टीका
जो देश भारतात दहशतवादी पाठवतो, त्याच्याशी...वांगचूक यांच्या आंदोनाला पाठिंबा देताना ठाकरेंची केंद्रावर सडकून टीका!
वांगचुक यांना मोठा धक्का! त्या याचिकेवर कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल;
वांगचुक यांना मोठा धक्का! त्या याचिकेवर कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल; आता उपचार...
हायकोर्टाचा मोठा झटका! रमेश म्हात्रेंना 5 वाजेपर्यंत शरण येण्याचे आदेश
Dombivli Hospital Case | हायकोर्टाचा मोठा झटका! रमेश म्हात्रेंना 5 वाजेपर्यंत शरण येण्याचे आदेश; पोलिसांचा ॲक्शन मोड!
मी आमरण उपोषण मागे घेण्यास आजच तयार, पण.. सोनम वांगचुक यांनी थेट ठेवल्या या 3 अटी...

मी आमरण उपोषण मागे घेण्यास आजच तयार, पण.. सोनम वांगचुक यांनी थेट ठेवल्या या 3 अटी..

Kalyan Crime : अनेक दिवसांपासून घरातून येत होती दुर्गंधी, बंद फ्लॅटचं दार उघडताच अंगावर शहारा; कल्याणच्या सोसायटीत काय घडलं?.

Kalyan Crime : अनेक दिवसांपासून घरातून येत होती दुर्गंधी, बंद फ्लॅटचं दार उघडताच अंगावर शहारा; कल्याणच्या सोसायटीत काय घडलं?

Fifa World Cup 2026: भरगच्च स्टेडियममध्ये ट्रम्प यांची फजिती, फिफा विश्वचषकाच्या ट्रॉफी प्रदान सोहळ्याचा Video Viral.

Fifa World Cup 2026: भरगच्च स्टेडियममध्ये ट्रम्प यांची फजिती, फिफा विश्वचषकाच्या ट्रॉफी प्रदान सोहळ्याचा Video Viral

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, ट्रक-कारची धडक; 5 जणांचा जागीच मृत्यू.

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, ट्रक-कारची धडक; 5 जणांचा जागीच मृत्यू

Dhananjay Munde : ‘घटना घडली की पावती माझ्याच नावावर’, बऱ्याच दिवसांपासून मनात साचलेलं सगळं धनंजय मुंडेंनी बोलून दाखवलं.

Dhananjay Munde : ‘घटना घडली की पावती माझ्याच नावावर’, बऱ्याच दिवसांपासून मनात साचलेलं सगळं धनंजय मुंडेंनी बोलून दाखवलं

Rohit Sharma : रोहितने शतकी खेळी खेळून सर्वांची बोलती केली बंद, तरीही गिल हिटमॅनच्या रिटारयमेंटवर म्हणाला की….

Rohit Sharma : रोहितने शतकी खेळी खेळून सर्वांची बोलती केली बंद, तरीही गिल हिटमॅनच्या रिटारयमेंटवर म्हणाला की…