MI vs SRH : पराभवाची मालिका रोखण्यासाठी पलटणमध्ये बदल निश्चित, ओपनरचा पत्ता कट! प्लेइंग 11 मध्ये कुणाला संधी?
Mumbai Indians Playing 11 Against Sunrisers Hyderabad : मुंबई इंडियन्स तिसरा विजय मिळवण्यासाठी बुधवारी 29 एप्रिलला बदलांसह उतरणार असल्याचं निश्चित समजलं जात आहे. जाणून घ्या पलटणची संभाव्य प्लेइंग ईलेव्हन कशी असेल.

आयपीएल स्पर्धेत एकूण 5 वेळा ट्रॉफी जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्सची 19 व्या मोसमात आतापर्यंत वाईट स्थिती झाली आहे. मुंबईला आतापर्यंत 7 पैकी फक्त 2 सामनेच जिंकता आले आहेत. त्यामुळे आता मुंबईला प्लेऑफच्या शर्यतीत कायम रहायचं असेल तर कोणत्याही स्थितीत उर्वरित सामने जिंकावे लागणार आहेत. मुंबईसमोर मोहिमेतील आठव्या सामन्यात सनरायजर्स हैदराबादचं आव्हान असणार आहे. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये होणार आहे. मुंबई सातत्यपूर्ण कामगिरी करण्यात अपयशी ठरतेय. त्यामुळे वानखेडेत पराभवाची मालिका खंडीत करण्यासाठी पलटण मैदानात उतरणार आहे. या सामन्यासाठी मुंबईच्या प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल निश्चित समजले जात आहेत. या निमित्ताने मुंबईची संभाव्य प्लेइंग ईलेव्हन कशी असेल हे जाणून घेऊयात.
मुंबईचा स्टार आणि अनुभवी फलंदाज रोहित शर्मा दुखापतीमुळे प्लेइंग ईलेव्हनमधून बाहेर आहे. रोहितला हॅमस्ट्रिंगमुळे 3 सामन्यांना मुकावं लागलं आहे. त्यामुळे आता रोहित हैदराबाद विरुद्ध परतल्यास मुंबईसाठी मोठा दिलासा असेल. तसेच रोहित न परतल्यास मुंबईची अडचण कायम राहिल. रोहितच्या अनुपस्थितीत क्विंटन डी कॉक याने आतापर्यंत समाधानकारक कामगिरी आहे. मात्र युवा फलंदाज दानिश मालेवार याला काही खास करता आलेलं नाही. त्यामुळे दानिशला हटवून नमन धीर याचा समावेश करण्यात आला. मात्र नमन चेन्नई विरुद्ध झिरोवर आऊट झाला. त्यामुळे टीम मॅनेजमेंट नमनवर पुन्हा विश्वास दाखवणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
केशव महाराज की विल जॅक्स?
आधीच रोहित नसल्याने मुंबई बॅकफुटवर आहे. त्यात चेन्नई विरूद्धच्या सामन्यात कॅच घेताना बॉलिंग ऑलराउंडर मिचेल सँटनर याला दुखापत झाली. सँटनरला या दुखापतीमुळे उर्वरित हंगामातून बाहेर व्हावं लागलं. त्यामुळे सँटनरच्या 1 जागेसाठी दोघांमध्ये चुरस असणार आहे. सँटनरच्या जागी दक्षिण आफ्रिकेचा फिरकीपटू केशव महाराज याला उर्वरित हंगामासाठी संधी देण्यात आली आहे. मात्र टीम मॅनेजमेंट विल जॅक्स याला संधी देणार की केशवचा समावेश करणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
मुंबईची संभाव्य प्लेइंग ईलेव्हन : क्विंटन डीकॉक (विकेटकीपर), नमन धीर, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या (कॅप्टन), तिलक वर्मा, शेरफेन रदरफोर्ड, विल जॅक्स, जसप्रीत बुमराह, कृष भगत, अल्लाह गजनफर आणि अश्विनी कुमार.