IPL 2026: मुंबई-लखनौचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात, पण या संघांसाठी ठरताहेत डोकेदुखी
आयपीएल 2026 स्पर्धेतील प्लेऑफची शर्यत आता शेवटच्या टप्प्यात आली आहे. असं असताना मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांचं आव्हान संपुष्टात आलं आहे. पण या संघांनी दुसऱ्या संघांचा प्लेऑफचा मार्ग अडवला आहे.

आयपीएल 2026 स्पर्धेत पहिल्या टप्प्यापासून मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांची सुमार कामगिरी राहिली आहे. या दोन्ही संघांचा निकालही तसाच लागला आहे. साखळी फेरीचे सामने संपायचे असूनही मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स स्पर्धेतून आऊट झाले आहे. आता हे दोन्ही संघ प्लेऑफच्या शर्यतीत असलेल्या संघांसाटी डोकेदुखी ठरत आहेत. या दोन संघांमुळे काही संघांचं प्लेऑफचं गणित चुकण्याची शक्यता आहे. या दोन्ही संघांनी प्लेऑफच्या शर्यतीतून बाद झाल्यानंतर हे काम सुरू केल्याचं दिसत आहे. कारण मागच्या सामन्यात दोन्ही संघांनी विजय मिळवला. प्लेऑफच्या शर्यतीत असलेल्या पंजाब किंग्सला पराभूत केलं. त्यामुळे या संघाची पुढची वाट बिकट झाली आहे. 13 गुण असल्याने पंजाब किंग्सला आता पुढचे दोन्ही सामने जिंकणं भाग आहे. तर लखनौ सुपर जायंट्सने चेन्नई सुपर किंग्ससोबत तसंच केलं. लखनौ सुपर जायंट्सने चेन्नई सुपर किंग्सला 7 विकेट राखून पराभूत केलं. त्यामुळे टॉप 4 मध्ये स्थान मिळवण्याचं गणित चुकलं आहे.
या दोन संघांचं भवितव्य धोक्यात
पंजाब किंग्सने या स्पर्धेत चांगली सुरूवात केली होती. मात्र अचानक गाडी विजयाच्या रूळावरून घसरली आणि वारंवार पराभवाचं तोंड पाहावं लागत आहे. त्यात आता शेवटचे सामने शिल्लक आहे. अशीच स्थिती चेन्नई सुपर किंग्सची आहेत. पण लखनौ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स यांची अडचण आहेच. या दोन्ही संघांचे प्रत्येकी दोन सामने शिल्लक आहेत. त्यामुळे प्लेऑफच्या शर्यतीत असलेल्या संघांसाठी अडचण होणार आहे. लखनौ सुपर जायंट्सचे उर्वरित दोन सामने राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्सविरुद्ध आहेत. या दोन्ही सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने विजय मिळवला तर दोन्ही संघांचा स्पर्धेतून पत्ता कट होऊ शकतो.
मुंबई इंडियन्सचे दोन सामने शिल्लक आहेत. कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्याविरुद्ध सामना होणार आहे. तसं पाहिलं तर कोलकाता नाईट रायडर्सचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. पण राजस्थान रॉयल्स अजूनही रेसमध्ये आहे. पण राजस्थान रॉयल्सला लखनौकडून पराभवाचं तोंड पाहावं लागलं. तर शेवटचा सामना मुंबईशी आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्सने पराभवाचं वचपा काढला तर प्लेऑफचं गणित चुकेल. दुसरीकडे, पंजाब किंग्सला लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध लढत करण्यापूर्वी आरसीबीशी सामना करायचा आहे. त्यामुळे या दोन्ही सामन्यात पराभव झाला तर स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येईल.