AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PBKS vs LSG: लखनौ सुपर जायंट्सच्या शेवटच्या सामन्यात अर्जुन तेंडुलकरला मिळाली संधी

आयपीएल 2026 स्पर्धेतील लखनौ सुपर जायंट्सचा शेवटचा सामना पंजाब किंग्सविरुद्ध होत आहे. तसं पाहिलं तर लखनौचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. असं असताना या सामन्यात अष्टपैलू अर्जुन तेंडुलकरला संधी मिळाली आहे.

PBKS vs LSG: लखनौ सुपर जायंट्सच्या शेवटच्या सामन्यात अर्जुन तेंडुलकरला मिळाली संधी
PBKS vs LSG: लखनौ सुपर जायंट्सच्या शेवटच्या सामन्यात अर्जुन तेंडुलकरला मिळाली संधीImage Credit source: PTI
| Updated on: May 23, 2026 | 7:30 PM
Share

आयपीएल 2026 स्पर्धेत लखनौ सुपर जायंट्सची स्थिती एकदम निराशाजनक राहिली. आतापर्यंत खेळलेल्या 13 पैकी फक्त 4 सामन्यात विजय मिळाला. तर 9 सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. त्यामुळे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. असं असताना या लीग स्पर्धेतील शेवटचा सामना लखनौ सुपर जायंट्स पंजाब किंगसविरुद्ध खेळत आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल झाला आणि कर्णधार ऋषभ पंतने अर्जुन तेंडुलकर प्लेइंग इलेव्हनमध्ये आहे याची घोषणा केली. त्यामुळे या स्पर्धेच्या शेवटच्या सामन्यात का होईना अर्जुन तेंडुलकरला खेळण्याची संधी मिळाली. अर्जुन तेंडुलकरने या स्पर्धेत 13 सामने बेंचवर बसून पाहिले. आता स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आल्यानंतर त्याला प्लेइंग 11 मध्ये संधी दिली आहे. लखनौ सुपर जायंट्ससाठी त्याचा डेब्यू सामना आहे. यापूर्वी आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळला होता.

लखनौ सुपर जायंट्सने आपल्या सोशल मिडिया खात्यावर अर्जुन तेंडुलकरची स्तुती करणारे व्हिडीओ टाकले होते. तसेच यॉर्कचा प्रचार करत होते. त्यामुळे त्याला संघात संधी मिळेल असं वाटलं होतं. पण त्याला काही संधी दिली नाही. पण लखनौ सुपर जायंट्सने शेवटच्या सामन्यात त्याला मैदानात उतरवलं आहे. आयपीएल 2026 च्या लिलावापूर्वी मुंबई इंडियन्सने अर्जुन तेंडुलकरला 30 लाख रुपयांना लखनौ सुपर जायंट्सकडे ट्रेड केले होते. आता या सामन्यात अर्जुन तेंडुलकरच्या कामगिरीकडे लक्ष लागून आहे. अर्जुन वेगवान गोलंदाज असून अष्टपैलू खेळाडू आहे. खालच्या फळीत फलंदाजाची भूमिका बजावेल अशी अपेक्षा आहे. त्याने संघात मयंक यादवची जागा घेतली आहे.

अर्जुन तेंडुलकर गोलंदाजी आणि फलंदाजीत कशी कामगिरी करतो याकडे त्याच्या चाहत्यांचं लक्ष लागून आहे. आतापर्यंत त्याला स्पर्धेत एकही संधी मिळाली नव्हती. पण जाता जाता या स्पर्धेत आपली छाप सोडून जाईल अशी अपेक्षा आहे. जेणेकरून पुढच्या पर्वात त्याला लखनौकडून प्लेइंग 11 मध्ये खेळण्याची संधी मिळेल. कारण या पर्वातील कामगिरीनंतर लखनौ सुपर जायंट्स संघ कात टाकणार हे निश्चित आहे. त्यामुळे कोण संघात राहतं आणि जातं हे पाहणंही औत्सुक्याचं ठरेल.

लखनौ सुपर जायंट्स (प्लेइंग इलेव्हन): जोश इंग्लिस, अर्शीन कुलकर्णी, निकोलस पूरन, आयुष बडोनी, ऋषभ पंत (विकेटकीपर/कर्णधार), अब्दुल समद, मुकुल चौधरी, अर्जुन तेंडुलकर, मोहम्मद शमी, प्रिन्स यादव, मोहसीन खान.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...