IPL 2026 Points Table : गुजरातचा विजयी पंच, आरसीबीचा तिसरा पराभव, पॉइंट्स टेबलमध्ये कोण सरस?

IPL 2026 Points Table : आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या हंगामात गुरुवारी गुजरातने आरसीबीला पराभूत करुन गेल्या पराभवाची परतफेड केली.

IPL 2026 Points Table : गुजरातचा विजयी पंच, आरसीबीचा तिसरा पराभव, पॉइंट्स टेबलमध्ये कोण सरस?
Rashid Khan and Rahul Tewatia
Image Credit source: Bcci
| Updated on: Apr 30, 2026 | 11:53 PM

गुजरात टायटन्सने आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील 42 व्या सामन्यात गतविजेच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला पराभूत केलं. गुजरातने 156 धावांचं आव्हान हे 6 विकेट्स गमावून पूर्ण केलं. गुजरातचा हा पाचवा विजय ठरला. गुजरात 19 व्या मोसमात 5 सामने जिंकणारी पाचवी टीम ठरली. तर आरसीबीला तिसर्‍या पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यानंतर पॉइंट्स टेबलमध्ये कोणती टीम कोणत्या स्थानी आहे हे जाणून घेऊयात.

Follow Us