AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL Points Table 2026: साखळी फेरीचा थरार संपला, लखनौ-मुंबईची सर्वात वाईट कामगिरी

IPL 2026 Points Table After League Stage : आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील साखळी फेरीत काही संघांनी जबरदस्त कामगिरी केली. तर स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी असणाऱ्या चेन्नई आणि मुंबईला एक एक विजयासाठी संघर्ष करावा लागला.

IPL Points Table 2026: साखळी फेरीचा थरार संपला, लखनौ-मुंबईची सर्वात वाईट कामगिरी
Mumbai Indians IPL 2026Image Credit source: Bcci
| Updated on: May 25, 2026 | 5:49 PM
Share

आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील (IPL 2026) 69 व्या सामन्याच्या निकालानंतर अखेर प्लेऑफमधील चौथा संघ निश्चित झाला. रविवारी 24 मे रोजी डबल हेडरमधील पहिल्या आणि 69 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने यजमान मुंबई इंडियन्सवर वानखेडे स्टेडियममध्ये विजय मिळवत प्लेऑफमध्ये धडक दिली. तर साखळी फेरीतील शेवटच्या अर्थात 70 व्या सामन्यात दिल्ली कॅपिट्ल्सने कोलकाता नाईट रायडर्सववर मात करत शेवट विजयाने केला. अशाप्रकारे 59 दिवसांनी आणि 70 सामन्यांनंतर साखळी फेरीची यशस्वी सांगता झाली. साखळी फेरीतील फक्त 1 सामना पावसामुळे रद्द करावा लागला. तर काही सामने पावसाने प्रभावित झाले. मात्र सामन्याचा निकाल लागला. साखळी फेरीची सांगता झाल्यानंतर आता कोणता संघ पॉइंट्स टेबलमध्ये कोणत्या स्थानी आहे? हे जाणून घेऊयात.

साखळी फेरीनंतर पॉइंट्स टेबलची स्थिती

गतविजेता आरसीबी अर्थात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी आहे. आरसीबी प्लेऑफमध्ये पोहचणारी पहिली टीम ठरली. तसेच आरसीबी साखळी फेरीच्या शेवटच्या सामन्यापर्यंत पॉइंट्स टेबलमधील आपलं पहिलं स्थान कायम राखण्यात यशस्वी ठरली. तसेच सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स या दोन्ही संघांनीही आरसीबीप्रमाणे प्रत्येकी 9-9 सामने जिंकून 18 गुणांची कमाई केली. मात्र नेट रनरेट तगडा असल्याने आरसीबी पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या, गुजरात दुसऱ्या आणि हैदराबाद तिसऱ्या स्थानी आहे.

तसेच प्लेऑफमधील एका जागेसाठी जोरदार चुरस होती. राजस्थानला रविवारी विजय मिळवून प्लेऑफचं तिकीट मिळवण्याची संधी होती. तसेच राजस्थानचा पराभव झाला असता आणि केकेआरने विजय मिळवला असता तर प्लेऑफमधील चौथ्या स्थानासाठी कोलकाता आणि पंजाब यांच्यातील एका संघांची नेट रनरेटच्या आधारे निवड झाली असती. मात्र राजस्थानने विजयासह प्लेऑफचं तिकीट मिळवल्याने इतर संघांचं जर तरचं समीकरण संपलं.

पंजाब आणि राजस्थान दोन्ही संघांनी साखळी फेरीत जबरदस्त सुरुवात केली. मात्र त्यानंतर दोन्ही संघ आपल्या कामगिरीत सातत्य ठेवण्यात अपयशी ठरले. त्याचा परिणाम साखळी फेरीतील शेवटच्या टप्प्यात पाहायला मिळाला. पंजाब किंग्स साखळी फेरीतील पहिल्या 7 सामन्यांत अजिंक्य राहण्यासह नंबर 1 होती. मात्र पंजाबने त्यानंतर सलग 6 सामने गमावले. पंजाबने साखळी फेरीतील आपला शेवटचा आणि करो या मरो सामना जिंकून आव्हान कायम ठेवलं. मात्र तोवर विलंब झालेला. त्यामुळे पंजाब टॉप 4 मधून बाहेर झाली. तर राजस्थानने मुंबईला पराभूत करुन प्लेऑफचं शेवटचं तिकीट मिळवलं. राजस्थानने यासह 16 गुणांसह पॉइंट्स टेबलमधील चौथं स्थान पटकावलं. तर पंजाबला 15 गुणांसह पाचव्या स्थानी समाधान मानावं लागलं.

पॉइंट्स टेबलमध्ये कोण कुठे?

चेन्नई-मुंबईची वाईट स्थिती

दिल्लीने आपला शेवटचा सामना जिंकून स्थिती सुधारली. दिल्ली 14 सामन्यानंतर 14 गुणांसह सहाव्या स्थानी राहिली. केकेआर 13 गुणांसह सातव्या क्रमांकावर राहिली.

चेन्नई आणि मुंबईची दुरावस्था झाली. चेन्नईने निराशाजनक सुरुवातीनंतर जोरदार कमबॅक केलं. मात्र चेन्नईला 12 गुणांसह आठव्या स्थानावरच समाधान मानावं लागलं. तर मुंबई आणि लखनौ दोन्ही संघांची अतिशय वाईट कामगिरी राहिली दोन्ही संघांनी 14 पैकी 10 सामने गमावले. तर दोन्ही संघांना फक्त 4-4 सामने जिंकण्यात यश आलं.

Follow Us
महायुतीत जागावाटपावरून महाभारत! मुख्यमंत्री फडणवीसांनीच सांगितलं कुठे
महायुतीत जागावाटपावरून महाभारत! मुख्यमंत्री फडणवीसांनीच सांगितलं कुठे.
महागाईने जनता हैराण; रोहित पवार म्हणाले शिंदे साहेब आता तरी नाराज व्हा
महागाईने जनता हैराण; रोहित पवार म्हणाले शिंदे साहेब आता तरी नाराज व्हा.
चार वेळा दरवाढ, आता पेट्रोलच गायब! इंधन टंचाईच्या झळा मुंबईपर्यंत 
चार वेळा दरवाढ, आता पेट्रोलच गायब! इंधन टंचाईच्या झळा मुंबईपर्यंत .
ही फक्त सुरुवात आहे, पिक्चर अभी बाकी है! पेट्रोल-डिझेल संकटावर.....
ही फक्त सुरुवात आहे, पिक्चर अभी बाकी है! पेट्रोल-डिझेल संकटावर......
RTO अधिकारी उतरले रस्त्यावर! रिक्षाचालकांना थेट मराठीत प्रश्न...
RTO अधिकारी उतरले रस्त्यावर! रिक्षाचालकांना थेट मराठीत प्रश्न....
देशावर मोठं आर्थिक संकट येणार; त्या नेत्याच्या वक्तव्याने राज्यत खळबळ
देशावर मोठं आर्थिक संकट येणार; त्या नेत्याच्या वक्तव्याने राज्यत खळबळ.
TCS धर्मांतर प्रकरणात ट्विस्ट; आरोपींच्या समर्थनार्थ मायनॉरिटी डिफेन्स
TCS धर्मांतर प्रकरणात ट्विस्ट; आरोपींच्या समर्थनार्थ मायनॉरिटी डिफेन्स.
100 कोटींची निवडणूक; विजय वडेट्टीवारांचा स्फोटक दावा, महायुतीवर निशाणा
100 कोटींची निवडणूक; विजय वडेट्टीवारांचा स्फोटक दावा, महायुतीवर निशाणा.
विधान परिषदेसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला! भाजपचा दबदबा कायम; शिंदे..
विधान परिषदेसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला! भाजपचा दबदबा कायम; शिंदे...
पुण्यात मध्यरात्री गोळीबाराचा थरार! श्रीनाथ हॉटेलवर हल्ला, वाहनांची...
पुण्यात मध्यरात्री गोळीबाराचा थरार! श्रीनाथ हॉटेलवर हल्ला, वाहनांची....