IPL 2026 Points Table : गुजरातचा विजयी पंच, 2 संघांना पछाडत पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी झेप

IPL 2026 Points Table After Match No 56 : गुजरात टायन्टसच्या गोलंदाजांनी धारदार बॉलिंग करुन ऑरेंज आर्मीवर दणदणीत विजय मिळवला आणि पॉइंट्स टेबलमधील पहिलं स्थान पटकावलं.

IPL 2026 Points Table : गुजरातचा विजयी पंच, 2 संघांना पछाडत पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी झेप
Jason Holder Rashid Khan GT
Image Credit source: Bcci
| Updated on: May 12, 2026 | 11:47 PM

गुजरात टायटन्सने आयपीएल स्पर्धेच्या 16 व्या सामन्यात 12 मे रोजी सनरायझर्स हैदराबादचा मोठ्या फरकाने धुव्वा उडवत सलग पाचवा आणि एकूण आठवा सामना जिंकला. गुजरातने हैदराबादसमोर 169 रन्सचं टार्गेट ठेवलं होतं. मात्र गुजरातच्या गोलंदाजांसमोर हैदराबादला 15 ओव्हरही खेळता आलं नाही. गुजरातने हैदराबादचा 14.5 ओव्हरमध्ये 86 रन्सवर बाजार उठवला. गुजरातचा हा धावांबाबत सर्वात मोठा विजय ठरला. तर हैदराबादचा धावांबाबत सर्वात मोठा पराभव ठरला. गुजरात या विजयासह पॉइंट्स टेबलमध्ये नंबर 1 टीम ठरली आहे.

 

Follow Us