IPL 2026 Points Table : पंजाबचं सलग 5 पराभवामुळे प्लेऑफचं समीकरण बिघडलं, आता असंय समीकरण
IPL 2026 Points Table : मुंबई इंडियन्सने पंजाब किंग्सचा धुव्वा उडवत प्लेऑफचं समीकरण बिघडवलं आहे. जाणून घ्या पंजाबला सलग 5 पराभवानंतर प्लेऑफची किती संधी? जाणून घ्या.

Punjab Kings Shreyas Iyer
Image Credit source: Bcci
जसप्रीत बुमराह याने त्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्स टीमला आयपीएल 2026 स्पर्धेत विजय मिळवून दिला. मुंबईने आयपीएलच्या 19 व्या मोसमात पंजाबचा 6 विकेट्सने धुव्वा उडवला. पंजाबने मुंबईसमोर 201 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मुंबईने हे आव्हान सुरक्षितपणे पूर्ण करत एकूण चौथा तर पंजाब विरुद्ध पहिला विजय ठरला. तर पंजाबने पराभवाचा पंच लगावला. पंजाबचा हा या मोसमातील सलग पाचवा पराभव ठरला. यामुळे पंजाबचं प्लेऑफचं समीकरण बिघडलं आहे. पंजाब विरुद्ध मुंबई सामन्याच्या निकालानंतर पॉइंट्स टेबलमधील स्थिती कशी आहे? तसेच पंजाबला प्लेऑफसाठी किती सामने जिंकावे लागणार? हे जाणून घेऊयात.
Follow Us