IPL 2026: पंजाब किंग्सने सलग चार सामने गमावल्याने प्लेऑफच्या शर्यतीतून आऊट होणार? जाणून घ्या गणित

आयपीएल 2026 पंजाब किंग्सने संघाला सलग विजयानंतर पराभवाची मालिका सुरू झाली आहे. सलग चार सामन्यानंतर पंजाब किंग्स संघ अडचणीत आला आहे. प्लेऑफच्या वेशीवर असताना पंजाब किंग्स संघ अडचणीत आला आहे. त्यामुळे प्लेऑफच्या शर्यतीतून बाद होऊ शकते.

IPL 2026: पंजाब किंग्सने सलग चार सामने गमावल्याने प्लेऑफच्या शर्यतीतून आऊट होणार? जाणून घ्या गणित
IPL 2026: पंजाब किंग्सने सलग चार सामने गमावल्याने प्लेऑफच्या शर्यतीतून आऊट होणार? जाणून घ्या गणित
Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: May 12, 2026 | 8:13 PM

आयपीएल 2026 स्पर्धेत आतापर्यंत 55 सामन्यांचा खेळ संपला असून प्लेऑफच्या शर्यतीतून दोन संघ बाद झाले आहेत. मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स हे संघ स्पर्धेतून बाद झाले आहे. त्यामुळे आता टॉप 4 मध्ये स्थान मिळवण्यासाठी 8 संघात चुरस आहे. अजून कोणत्याही संघांने प्लेऑफमध्ये स्थान पक्कं केलेलं नाही. एकंदरीत 16 गुणांचं गणित कोणत्याही संघाचं सुटलेलं नाही. असं असताना सुरुवातीला सहा सामन्यात विजय मिळवल्यानंतर पंजाब किंग्सची पराभवाची मालिका सुरू झाली आहे. पंजाब किंग्सने 11 सामने खेळले असून 6 सामन्यात विजय आणि 4 सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. त्यात एक सामना पावसामुळे रद्द झाल्याने एक गुण मिळाला. त्यामुळे पंजाब किंग्सने 13 गुण आणि नेट रनरेट हा +0.428 इतका आहे. सध्या पंजाब किंग्सचा संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. मात्र शेवटच्या टप्प्यात चुरशीची लढाई असून स्पर्धेतून आऊट होण्याची भीती आहे.

पंजाब किंग्सला उतरती कला

पंजाब किंग्सने या स्पर्धेतील पहिला पराभव 28 एप्रिलला पाहिला होता. राजस्थान रॉयल्सने पराभवाची धूळ चारली होती. पण त्यानंतर खेळलेल्या आणखी तीन सामन्यात पराभूत व्हावं लागलं. गुजरात टायटन्स, सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्सने पराभूत केलं. आता स्पर्धेत तीन सामन्यांचा खेळ शिल्लक आहे. या तीन पैकी दोन सामन्यात काहीही करून विजय मिळवावा लागणार आहे. पंजाब किंग्सचे पुढचे सामने मुंबई इंडियन्स, लखनौ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी होणार आहे. यापैकी दोन सामन्यात विजय मिळवला तर 17 गुण होतील आणि प्लेऑफचं गणित सुटेल. पण हा विजय वाटतो तितका सोपा नाही.

पंजाब किंग्सची कठीण परीक्षा

मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स या दोन्ही संघांचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. त्यामुळे या स्पर्धेचा शेवट गोड करण्याचा प्रयत्न असणार आहे. या दोन्ही संघांवर प्लेऑफचं दडपण नाही. त्यामुळे पंजाब किंग्सला शेवटच्या टप्प्यात अडचणीत आणू शकतात. या स्पर्धेत पंजाब किंग्सने मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्सला पराभूत केलं आहे. त्यामुळे पराभवाचा वचपा काढण्यासाठी दोन्ही संघ सज्ज असतील. तर आरसीबीविरुद्धची लढतही सोपी नसेल. मागच्या पर्वातील अंतिम फेरीत आरसीबीने पंजाब किंग्सला पराभूत केलं होतं. त्यानंतर दोन्ही संघ या स्पर्धेत भिडणार आहेत. त्यात आरसीबीही प्लेऑफच्या शर्यतीत आहे. त्यामुळे पंजाब किंग्ससाठी सलग चार पराभवानंतर पुढचा प्रवास थोडा कठीण असणार आहे.

Follow Us