AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026 Opening Ceremony : 19 व्या मोसमात ओपनिंग सेरेमनी होणार नाही! कारण…

IPL 2026 Opening Ceremony : आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या पर्वाला 28 मार्चपासून सुरुवात होणार आहे. प्रत्येक मोसमातील सलामीच्या सामन्याआधी रंगारंग कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं.

IPL 2026 Opening Ceremony : 19 व्या मोसमात ओपनिंग सेरेमनी होणार नाही! कारण...
IPL 2026 Opening CeremonyImage Credit source: PTI
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Mar 27, 2026 | 5:58 AM
Share

IPL 2026 Opening Ceremony : आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या पर्वाला 28 मार्चपासून सुरुवात होणार आहे. त्याआधी बीसीसीआयने या 19 व्या पर्वातील उर्वरित वेळापत्रक जाहीर केलंय. त्यामुळे या मोसमात एकूण किती सामने होणार? या प्रश्नाला पूर्णविराम मिळालं आहे. पहिल्या टप्प्यात 20 आणि दुसऱ्या टप्प्यात 50 असे एकूण 70 सामने 10 संघात 12 शहरात आयोजित करण्यात आले आहेत. प्रत्येक मोसमातील सलामीच्या सामन्याआधी रंगारंग कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. अनेक कलाकार या कार्यक्रमात आपल्या कलाकृतीने चाहत्यांचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे चाहत्यांना या रंगारंग कार्यक्रमाची प्रतिक्षा असते. मात्र यंदा आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमासाधी ओपनिंग सेरमेनी होणार नसल्याचं म्हटलं जात आहे.

बंगळुरु चेंगराचेंगरी

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, यंदा ओपनिंग सेरेमनी होणार नाहीय. बंगळुरुत गेल्या वर्षी आरसीबीच्या विजयी जल्लोषात 11 चाहत्यांचा चेंगराचेंगरीत मृत्यू झाला होता. त्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने हा संवेदनशील असा निर्णय घेतला आहे. मात्र याबाबत बीसीसीआय किंवा आयपीएलकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. आरसीबीने 2025 च्या आयपीएल फायनलमध्ये रजत पाटीदार याच्या नेतृत्वात पंजाब किंग्सला पराभूत करुन 18 वर्षांची ट्रॉफी जिंकण्याची प्रतिक्षा संपवली होती.

आरसीबीच्या या विजयाचं बंगळुरुतील एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये जंगी सेलिब्रेशन करण्यात आलं. स्टेडियममध्ये आरसीबीचे चॅम्पियन खेळाडूने उपस्थित होते. त्यामुळे चाहत्यांना आपल्या लाडक्या खेळाडूंना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये जायचं होतं. मात्र स्टेडियम खचाखच भरल्याने चाहत्यांना गेटवर अडवण्यात आलं. मात्र चाहत्यांसमोर स्टेडियम प्रशानसाचं एक चाललं नाही. चाहते ऐकायला तयार नव्हते. त्यामुळे या चाहत्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला. यात चाहते सैरावैरा पळु लागले. त्यामुळे चेंगराचेंगरी झाली. यात 11 जणांचा दुर्देवी शेवट झाला.

क्लोसिंग सेरेमनी केव्हा होणार?

तसेच या 19 व्या मोसमाची क्लोजिंग सेरेमनी केव्हा होणार? याबाबत टीओआयच्या रिपोर्टमध्ये काय म्हटलं? जाणून घेऊयात. या हंगामातील अंतिम सामना हा 31 मे रोजी होईल. त्याआधी क्लोजिंग सेरेमनी होईल.

2019 साली रंगारंग कार्यक्रम रद्द

दरम्यान आयपीएल स्पर्धेतील रंगारंग कार्यक्रम रद्द करण्याची ही पहिलीच वेळ ठरणार नाही. पुलवामा हल्ल्यात भारताने 40 जवान शहीद झाले होते. या 40 जवानांच्या स्मृतीत रंगारंग कार्यक्रम रद्द करण्यात आला होता.

Follow Us
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका...
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका बदलली? आता भारतात...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल महोत्सवाने किल्ला उजळला
मोठी बातमी! भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल
मोठी बातमी! भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...