AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तू तो देव माणूस निकला! गोंयका विजयानंतर भावूक, पंतला कडकडून मिठी मारली Video

आयपीएल 2026 स्पर्धेत लखनौ सुपर जायंट्सने पहिल्या विजयाची नोंद केली. पहिल्या सामन्यात पराभव झाल्यानंतर दुसऱ्या सामन्यात कमबॅक केलं. ऋषभ पंतने कर्णधारपदाला साजेशी कामगिरी केली आणि विजय मिळवून दिला. विजयानंतरचा एक व्हिडीओ आता व्हायरल होत आहे.

तू तो देव माणूस निकला! गोंयका विजयानंतर भावूक, पंतला कडकडून मिठी मारली Video
तु तो देव माणूस निकला! गोंयका विजयानंतर भावूक, पंतला कडकडून मिठी मारली Video Image Credit source: LSG Twitter
| Updated on: Apr 05, 2026 | 8:31 PM
Share

आयपीएल 2026 स्पर्धेत लखनौ सुपर जायंट्सने सनरायझर्स हैदराबादचा 5 गडी राखून पराभव केला. सनरायझर्स हैदराबादने विजयासाठी 156 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान लखनौ सुपर जायंट्सने 19.5 षटकात पूर्ण केलं. या विजयासह लखनौ सुपर जायंट्सने स्पर्धेतील पहिल्या विजयाची नोंद केली. या सामन्यात ऋषभ पंतने कर्णधारपदाला साजेशी कामगिरी केली. त्याच्या अर्धशतकी खेळी आणि शेवटपर्यंत दिलेल्या झुंजीमुळे विजय मिळाला. या सामन्यात एक वेळ अशी आली होती की सामना हैदराबादच्या बाजूने झुकला होता. 19व्या षटकात मुकूल चौधरीने तीन चेंडू निर्धाव घालवले. त्यामुळे हा सामना 6 चेंडूत 9 धावा असा आला. हा सामना आता हातून जातो की अशी स्थिती निर्माण झाली. लखनौ सुपर जायंट्सचे चाहते आणि खासकरून मालक संजीव गोयंका यांना ती भीती सतावत होती. पण सर्व काही लखनौच्या बाजूने घडलं.

काय झालं शेवटच्या षटकात?

लखनौ सुपर जायंट्सला शेवटच्या षटकात 9 धावांची गरज होती. त्यामुळे हा सामना कुठे झुकेल सांगता येत नव्हतं. स्ट्राईकला असलेल्या ऋषभ पंतने पहिल्या दोन चेंडूंवर चौकार मारला आणि विजय सोपा केला. त्यानंतर दोन चेंडू निर्धाव गेले आणि पाचव्या चेंडूवर विजयी चौकार मारत पहिल्या विजय मिळवून दिला. या विजयानंतर लखनौ सुपर जायंट्सचे मालक संजीव गोयंका यांना अश्रू अनावर झाले. त्यांनी या विजयानंतर मैदानात जाऊन पंतला मिठी मारली. त्यांच्या या कृतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मागच्या सामन्यात काय झालं होतं?

लखनौ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स सामन्यातील एक फोटो व्हायरल झाला होता. त्या फोटोवरून नेटकऱ्यांनी लखनौचे मालक संजीव गोयंका यांना ट्रोल केलं होतं. त्यानंतर लखनौ फ्रेंचायझीने आपल्या अधिकृत सोशल मीडियावरून एक व्हिडीओ पोस्ट केला होता. तसेच व्हायरल होत असलेला फोटो आणि त्यावरून रचल्या जाणाऱ्या कथा या भाकड असल्याचं सांगितलं. त्यानंतर अनेकांनी त्या व्हिडीओवरच शंका उपस्थित केली. हा व्हिडीओ नंतर शूट केल्याचं प्रतिक्रिया दिल्या. सोशल मीडियावरील या चर्चा थंड झाल्यानंतर आता पुन्हा एकदा या व्हिडीओने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...