AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026, SRH vs LSG: ऋषभ पंतची विजयी अर्धशतकी खेळी, सामना संपल्यानंतर सरळ म्हणाला…

आयपीएल 2026 स्पर्धेत लखनौ सुपर जायंट्सने पहिल्या विजयाची नोंद केली आहे. सनरायझर्स हैदराबादला 5 गडी राखून पराभूत केलं. या विजयात कर्णधार ऋषभ पंतची खेळी महत्त्वाची ठरली. या सामन्यानंतर ऋषभ पंतने आपलं मनोगत व्यक्त केलं.

IPL 2026, SRH vs LSG: ऋषभ पंतची विजयी अर्धशतकी खेळी, सामना संपल्यानंतर सरळ म्हणाला...
IPL 2026, SRH vs LSG: ऋषभ पंतची विजयी अर्धशतकी खेळी, सामना संपल्यानंतर सरळ म्हणाला...Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: Apr 05, 2026 | 8:05 PM
Share

आयपीएल 2026 स्पर्धेत लखनौ सुपर जायंट्स संघाने पहिल्या विजयाची नोंद केली. लखनौ सुपर जायंट्स या स्पर्धेतील दुसरा सामना खेळली. पहिल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सकडून पराभूत झाले. पण दुसऱ्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादला पराभूत केलं. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर लखनौ सुपर जायंट्सने प्रथम गोलंदाजी निवडली. तसेच सनरायझर्स हैदराबादला 156 धावांवर रोखलं. विजयासाठी दिलेल्या 157 धावांचं आव्हान लखनौ सुपर जायंट्सने 19.5 षटकात पूर्ण केलं. सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सात सामन्यांमधील लखनौ सुपर जायंट्सचा हा पाचवा विजय आहे. यात चार सामन्यांपैकी हैदराबादमध्ये तीन विजय मिळवले आहेत. लखनौचा कर्णधार ऋषभ पंतने या सामन्यात विजयी धावांचा पाठलाग करताना शानदार अर्धशतक झळकावले. या सामन्यात सलामी ऐवजी पंत तिसऱ्या क्रमांकावर आला. त्याने 43 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. शेवटच्या षटकात लखनौला विजयासाठी 9 धावांची गरज होती. तेव्हा ऋषभ पंतने जयदेव उनाडकटच्या पहिल्या दोन चेंडूंवर दोन चौकार मारून लखनौचा विजय सोपा. तसेच पाचव्या चेंडूवर आणखी एक चौकार मारला आणि विजय मिळवला.

काय म्हणाला ऋषभ पंत?

लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार ऋषभ पंत म्हणाला की, ‘मला वाटतं की गोलंदाजांचं कौतुक करायलाच हवं, कारण तेच लोक तुम्हाला सामन्यासाठी तयार करतात, विशेषतः जेव्हा तुम्ही प्रथम गोलंदाजी करता. मला वाटतं शमी भाई, आवेश, राठी, मला वाटतं प्रत्येकाने खूप चांगलं योगदान दिलं आहे, विशेषतः आज आलेल्या सिद्धार्थने. तुम्हाला माहिती आहे, आम्ही मैदानावर ठरवलं होतं की तो सामना जिंकून देईल आणि त्याने आमच्यासाठी खूप चांगलं काम केलं.

काय म्हणाला इशान किशन?

सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार इशान किशन म्हणाला की, ‘ मला वाटतं की गोलंदाजांनी आज खूपच चांगलं काम केलं. त्यांनी योजनेनुसार योग्य ठिकाणी गोलंदाजी केली, तसेच क्षेत्ररक्षकांनीही पूर्ण प्रयत्न केल्याबद्दल त्यांना श्रेय द्यायला हवं. पण तुम्हाला माहिती आहे, अशा स्पर्धांमध्ये एक-दोन चौकार मारून सामना हातातून निसटू शकतो. त्यामुळे हो, पण ज्या प्रकारे आम्ही हा सामना लढलो, त्याचा मला आनंद आहे.’

Follow Us
मीरा भाईंदरमध्ये मांस विक्री बंदीवरून राजकीय रणकंदन! 8 दिवस बंदी
मीरा भाईंदरमध्ये मांस विक्री बंदीवरून राजकीय रणकंदन! भाजपच्या नगरसेवकांची 8 दिवस बंदीची मागणी; मनसेचा तीव्र विरोध
जरांगे पाटील आणि सरकारची बोलणी पुन्हा फिस्कटली? 58 लाख कुणबी...
Manoj Jarange Patil | जरांगे पाटील आणि सरकारची बोलणी पुन्हा फिस्कटली? 58 लाख कुणबी प्रमाणपत्रांवर ठाम; GR झाल्याशिवाय माघार नाहीच
फडणवीस दिल्लीत जाणार; राऊतांचा मोठा दावा; भाजपच्या अंतर्गत घडामोडींवर
Sanjay Raut | फडणवीस दिल्लीत जाणार; संजय राऊतांचा मोठा दावा; भाजपच्या अंतर्गत घडामोडींवर सूचक विधान
मत व्यक्त केलं म्हणून हल्ला? बापटांवरील हल्ल्यावर पवारांचा संताप
Sharad Pawar | मत व्यक्त केलं म्हणून हल्ला? विद्यानंद बापटांवरील हल्ल्यावर शरद पवारांचा संताप; हा लोकशाही आणि मूलभूत अधिकारांवर हल्ला
मुंबईसाठी फडणवीसांचा मोठा प्लॅन! पुढील 10 वर्षांत मुंबई...
CM Fadnavis | मुंबईसाठी फडणवीसांचा मोठा प्लॅन! पुढील 10 वर्षांत मुंबई झोपडपट्टीमुक्त करणार; तिसऱ्या मुंबईचेही संकेत
जरांगेंचा सरकारला अंतिम इशारा, नेमकं काय म्हणाले?
Manoj Jarange Hunger Strike | जरांगेंचा सरकारला अंतिम इशारा, नेमकं काय म्हणाले?
धराशिवमध्ये राणा जगजितसिंह पाटील यांच्या निवासस्थानासमोर...
धराशिवमध्ये राणा जगजितसिंह पाटील यांच्या निवासस्थानासमोर तीव्र आंदोलन, असं काय घडलं?
मनोज जरांगे पाटील उपोषण सोडणार की नाही? शिष्टमंडळासोबतच्या चर्चेत...
मनोज जरांगे पाटील उपोषण सोडणार की नाही? शिष्टमंडळासोबतच्या चर्चेत नेमकं काय घडलं?
तोडगा निघणार? मनोज जरांगेंना भेटण्यापूर्वी शिष्टमंडळाची अभ्यासक...
तोडगा निघणार? मनोज जरांगेंना भेटण्यापूर्वी शिष्टमंडळाची अभ्यासकांसोबत सविस्तर चर्चा
भिवंडी पालिकेत महत्त्वाची बैठक, नगरसेविका कँडी क्रश खेळण्यात मग्न
भिवंडी पालिकेत महत्त्वाची बैठक, नगरसेविका कँडी क्रश खेळण्यात मग्न