AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

RR vs SRH Toss Eliminator : हैदराबादचा बॉलिंगचा निर्णय, वैभव सूर्यवंशीला रोखण्याचं आव्हान

Sunrisers Hyderabad vs Rajasthan Royals Eliminator Toss and Playing 11 : सनरायझर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्स विरुद्ध गेल्या 6 पैकी 6 सामन्यांत विजय मिळवला आहे. त्यामुळे राजस्थान गी पराभवाची साखळी तोडणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

RR vs SRH Toss Eliminator : हैदराबादचा बॉलिंगचा निर्णय, वैभव सूर्यवंशीला रोखण्याचं आव्हान
SRH vs RR Eliminator IPL 2026 TossImage Credit source: IPL X Account
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: May 28, 2026 | 1:58 AM
Share

गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने मंगळवारी 26 मे रोजी क्वालिफायर 1 सामन्यात गुजरात टायटन्सला पराभूत करुन फायनलमध्ये धडक दिली. त्यानंतर आता आज 27 मे रोजी एलिमिनेटर सामन्यात सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स आमनेसामने आहेत. हा सामना महाराजा यादवेंद्र सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, मुल्लानपूर, न्यू चंडीगड इथे आयोजित करण्यात आला आहे. पॅट कमिन्स याच्याकडे हैदराबादच्या नेतृत्वाची जबाबदारी आहे. तर युवा रियान पराग राजस्थानच्या कर्णधारपदाची सूत्र सांभाळणार आहे. सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजता टॉस झाला. हैदराबादच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. कॅप्टन पॅट कमिन्स याने राजस्थानला बॅटिंगसाठी भाग पाडलंय.

राजस्थान किती धावा करणार?

युवा फलंदाज वंडर बॉय वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जैस्वाल या सलामी जोडीने राजस्थानला या मोसमात अपवाद वगळता जबरदस्त आणि आक्रमक सुरुवात मिळवून दिली आहे. त्यामुळे आता या अतिशय महत्त्वाच्या आणि करो या मरो सामन्यात ही सलामी जोडी हैदराबाद विरुद्ध राजस्थानला कशी सुरुवात मिळवून देणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

हेड टु हेड रेकॉर्ड्स

सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात एकूण 23 सामने खेळवण्यात आले आहेत. हैदराबादने 23 पैकी 14 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर राजस्थानला फक्त 9 सामनेच जिंकता आले आहेत. त्यामुळे आता कोणता संघ सामना जिंकून आपलं आव्हान कायम राखण्यात यशस्वी ठरणार? याकडे चाहत्यांचं बारीक लक्ष लागून असणार आहे.

राजस्थान हैदराबादला रोखणार?

दरम्यान सनरायझर्स हैदराबादने गेल्या सलग 6 सामन्यांमध्ये राजस्थान रॉयल्सला पराभूत केलं आहे. त्यामुळे राजस्थान हैदराबादला पराभूत करुन गेल्या 6 सामन्यांच्या हिशोब चुकता करण्यासह क्वालिफायर 2 चं तिकीट मिळवणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सनरायझर्स हैदराबाद प्लेइंग ईलेव्हन : अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, इशान किशन (विकेटकीपर), हेनरिक क्लासेन, स्मरण रविचंद्रन, नितीश कुमार रेड्डी, पॅट कमिन्स (कर्णधार), शिवांग कुमार, एशान मलिंगा, साकिब हुसेन आणि प्रफुल हिंगे.

राजस्थान रॉयल्स प्लेइंग ईलेव्हन : यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशी, ध्रुव जुरेल, रियान पराग (कर्णधार), डोनोवन फरेरा, दासून शनाका, रवींद्र जडेजा, जोफ्रा आर्चर, नांद्रे बर्गर, ब्रिजेश शर्मा आणि यशराज पुंजा.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?