AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मी आधीच सांगितलं होतं की त्याला…! प्रफुल हिंगेने वैभव सूर्यवंशीची विकेट काढल्यानंतर प्लान सांगितला

आयपीएल स्पर्धेत सनरायझर्स हैदराबादच्या प्रफुल हिंगेने पदार्पणाच्या सामन्यात कहर केला. पहिल्याच षटकात तीन महत्त्वाचे विकेट घेतले. यात फॉर्मात असलेल्या वैभव सूर्यवंशीची विकेट खास होती. यासाठी काय प्लान होता त प्रफुलने सामन्यानंतर सांगितलं.

मी आधीच सांगितलं होतं की त्याला...! प्रफुल हिंगेने वैभव सूर्यवंशीची विकेट काढल्यानंतर प्लान सांगितला
मी आधीच सांगितलं होतं की त्याला...! प्रफुल हिंगेने वैभव सूर्यवंशीची विकेट काढल्यानंतर प्लान सांगितलाImage Credit source: Sunrisers Hydrabad Twitter
| Updated on: Apr 14, 2026 | 4:44 PM
Share

आयपीएल 2026 स्पर्धेत सनरायझर्स हैदराबादचा पाचवा सामना राजस्थान रॉयल्स संघाशी झाला. या सामन्यात हैदाराबादने राजस्थान रॉयल्सला 57 धावांनी पराभूत केलं. या विजयाचा शिल्पकार ठरला तो वेगवान गोलंदाज प्रफुल हिंगे… त्याने चार षटकात 34 धावा देत 4 विकेट काढल्या. यावेळी त्याचा इकोनॉमी रेट हा 8.50 चा होता. त्याच्या या कामगिरीसाठी सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आलं. त्याने पहिल्या षटकात फक्त 1 धाव देऊन तीन गडी बाद केले. त्याच्या या खेळीमुळे राजस्थान रॉयल्सचा प्लान पहिल्याच षटकात फेल गेला. प्रफुल हिंगेने पदार्पणाच्या सामन्यातच कहर करत राजस्थान रॉयल्सचा विजयी रथ रोखला. त्याच्या भेदक गोलंदाजीमागे बरीच मेहनत घेतली. तसेच वैभव सूर्यवंशीला पहिल्याच चेंडूवर बाद करण्यामागचं गणितही सांगितलं. त्याने यासाठी कसा प्लान आखला होता ते त्याने सामन्यानंतर सांगितलं.

प्रफुल हिंगेला राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यातील सर्वोत्तम विकेटबाबत विचारलं गेलं. तेव्हा प्रफुल हिंगेने सांगितलं की, ‘सर्वोत्तम विकेट सूर्यवंशीची पहिली विकेट होती, कारण तो फॉर्मात होता. मी काही लोकांना आधीच सांगितले होते की, मी त्याला पहिल्याच चेंडूवर, बाउन्सरने किंवा इतर कोणत्याही प्रकारे बाद करेन. मला फक्त पहिल्याच चेंडूवर त्याची विकेट हवी होती. हीच योजना होती. तसेच, आमचे गोलंदाजी प्रशिक्षक वरुण भाई यांनी मला खूप मदत केली. आणि ज्यांनी मला पाठिंबा दिला त्या सर्वांचा मी आभारी आहे.’

आयपीएल स्पर्धेपूर्वी प्रफुल हिंगेला दुखापतीला सामोरं जावं लागलं होतं. पण स्पर्धा सुरू होताच फिट अँड फाईन होत संघात परतला. याबाबत त्याने सांगितलं की, ‘आता सर्व काही ठीक आहे. माझी खूप चांगली काळजी घेतल्याबद्दल मला एमआरएफचे आभार मानायचे आहेत. मी तिथे असताना, फिजिओ नवीन सरांनी माझी खूप चांगली काळजी घेतली. आज मी या टप्प्यावर पोहोचलो आहे, यासाठीही मला त्यांचे आभार मानायचे आहेत.’ आयपीएल 2026 मिनी लिलावात सनरायझर्स हैदराबादने प्रफुल हिंगेवर डाव लावला. प्रफुल हिंगेची बेस प्राईस ही 30 लाख होती आणि हैदराबादने त्याच्यावर विश्वास दाखवला. हा विश्वास प्रफुल हिंगेने पहिल्याच सामन्यात सार्थकी लावला.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...