AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SRH vs RR: हैदराबादविरुद्धच्या सामन्यात रियान परागने एकही षटक रवींद्र जडेजाला दिलं नाही, कारण…

आयपीएल 2026 स्पर्धेत सलग चार विजयानंतर राजस्थान रॉयल्सला पाचव्या सामन्यात पराभवाचा धक्का बसला. सनरायझर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्सचा 57 धावांनी पराभव केला. या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान पराग याचे निर्णय आश्चर्यकारक होते. त्यावर त्याने सामन्यानंतर भाष्य केलं.

SRH vs RR: हैदराबादविरुद्धच्या सामन्यात रियान परागने एकही षटक रवींद्र जडेजाला दिलं नाही, कारण...
हैदराबादविरुद्धच्या सामन्यात रियान परागने एकही षटक रवींद्र जडेजाला दिलं नाही, कारण...Image Credit source: Rajasthan Royals Twitter
| Updated on: Apr 14, 2026 | 5:06 PM
Share

आयपीएल 2026 स्पर्धेच्या 21व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्सचा विजयी रथ रोखला. सलग चार सामन्यात विजय मिळवल्यानंतर राजस्थान रॉयल्सला पाचव्या सामन्यात पराभवाला सामोरं जावं लागलं. या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा राजस्थान रॉयल्सच्या बाजूने लागला आणि मनासारखा निर्णय घेता आला. कर्णधार रियान परागने धावांचा पाठलाग करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात अभिषेक शर्माची विकेटही पहिल्याच चेंडूवर मिळाली. त्यामुळे राजस्थानच्या गोटात आनंदाचं वातावरण होतं. पण हा आनंद फार काळ टिकू शकला नाही. इशान किशनने 91 आणि हेनरिक क्लासेनने 40 धावांची खेळी करून राजस्थानला बॅकफूटवर ढकललं. तिसऱ्या विकेटसाठी या जोडीने 88 धावांची भागीदारी केली होती. ही जोडी फोडण्यासाठी अनुभवी रवींद्र जडेजाला चेंडू सोपवलं अपेक्षित होतं. पण तसं केलं नाही. इतकंच काय तर कर्णधार रियान परागने संपूर्ण सामन्यात रवींद्र जडेजाला एकही षटक सोपवलं नाही.

आयपीएल स्पर्धेतील हैदराबादविरुद्धचा सामना संपल्यानंतर कर्णधार रियान परागने रवींद्र जडेजाला षटक न देण्याचं कारण सांगितलं. रियान पराग म्हणाला की, ‘मला वाटतं आमची सुरुवात खूप चांगली झाली. कदाचित इथे-तिथे काही गोष्टी करता आल्या असत्या. जड्डू भाई, मला माहीत नाही, तो अगदी क्षणार्धात घेतलेला निर्णय होता. ईशान खूप चांगली फलंदाजी करत होता, त्यामुळे मला ती जोखीम घ्यायची नव्हती. षटकांच्या बाबतीत बिश्नोईवर विश्वास ठेवला.’ रवींद्र जडेजाला षटक सोपवलं नाही. पण त्याने फलंदाजीत सावध कामगिरी केली. त्याने 32 चेंडूत 5 चौकारांच्या मदतीने 45 धावा केल्या.

रियान परागने पुढे सांगितलं की, ‘ ज्या प्रकारे खेळपट्टी खेळत होती, ते पाहता मला वाटलं की त्या षटकांमध्ये 30 धावांनी पुढे होते. जिथपर्यंत फलंदाजीचा प्रश्न आहे, मला वाटतं 9 धावांत पाच गडी गमावूनही 160 धावा करणे, हे आमच्या फलंदाजीच्या खोलीबद्दल बरंच काही सांगून जातं. या पराभवातून सावरून पुढे जायचं आहे. जसं मी म्हणालो, ही फक्त एक छोटीशी चूक आहे आणि आता आम्ही कोलकात्याला जाऊन काहीतरी चांगलं करू.’

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...