IPL 2026 स्पर्धेला उरले फक्त 10 दिवस! यावेळी दहा फ्रेंचायझींच्या या 10 खेळाडूंच्या कामगिरीवर असेल नजर
Image Credit source: TV9 Network
आयपीएल 2026 स्पर्धा 28 मार्चपासून सुरू होत आहे. या स्पर्धेचा विजेता कोण ठरणार हे दोन महिन्यांनी कळेल. पण त्यापूर्वी काही संघ प्रबळ दावेदार मानले जात आहे. असं असलं तरी कोण बाजी मारेल काहीच सांगता येत नाही. मागच्या पर्वात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्स या संघांनी चांगली कामगिरी करत अंतिम फेरी गाठली. पण अंतिम फेरीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचं नाणं खणखणीत वाजलं. तसेच 18 वर्षानंतर जेतेपदावर नाव कोरलं. आता या पर्वात कोण बाजी मारणार? याची उत्सुकता आहे. असं असताना दहा फ्रेंचायझीमध्ये एक असा खेळाडू हुकूमाचा एक्का ठरू शकतो. त्याच्या कामगिरीकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष असणार आहे.
- चेन्नई सुपर किंग्स हा या स्पर्धेतील पाचवेळा विजेता ठरलेला संघ आहे. पण मागच्या काही वर्षात संघाची कामगिरी सुमार राहिली आहे. मात्र यावेळी मिनी लिलावात आणि ट्रेंड विंडोच्या माध्यमातून काही बदल केले आहेत. एक हुकूमाचा एक्का चेन्नई सुपर किंग्सने घेतला आहे. हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून संजू सॅमसन आहे. संजू सॅमसन हा सध्या फॉर्मात असून सामन्याचं चित्र बदलू शकतो. टी20 वर्ल्डकप 2026 त्याचा हिसका प्रतिस्पर्धी संघांनी घेतला आहे.
- दिल्ली कॅपिटल्स संघाची जेतेपदाची झोळी अजूनही रितीच आहे. पण यावेळी संघात काही बदल केले आहेत. असं केएल राहुलच्या सांगण्यावरून फ्रेंचायझीने बेन डकेटवर बोली लावली. हा खेळाडू या स्पर्धेत काही चमत्कार करू शकतो. दिल्लीला चांगली सुरूवात करून देईल असा विश्वास चाहत्यांना वाटतो. इंग्लंडचा बेन डकेट पहिल्यांदाच आयपीएल खेळणार आहे. त्यामुळे पहिल्याच स्पर्धेत चांगली कामगिरी करू शकतो.
- गुजरात टायटन्स फ्रेंचायझी संघ बांधणीत कमकुवत पडल्याचं दिसत आहे. पण असं असलं तरी संघात दिग्गज खेळाडूंचा भरणा आहे. या संघात चांगले फलंदाज आहेत. पण गोलंदाजांच्या बाबतीत हा संघ ताकदवान वाटत आहे. या स्पर्धेत कागिसो रबाडा गुजरात टायटन्ससाठी ट्रम्प कार्ड ठरू शकतो. पावर प्ले आणि डेथ ओव्हरमध्ये धावगती रोखण्यात मदत करू शकतो.
- केकेआर संघाची गोलंदाजीची धार यावेळी कमी झाली आहे. हर्षित राणा नाही आणि मुस्तफिझुर रहमानला वगळल्याने अडचण झाली आहे. त्यामुळे या संघाची धुरा फलंदाजांवर अधिक अवलंबून असणार आहे. अशा स्थितीत अष्टपैलू सुनील नरीनकडून फार अपेक्षा असतील. हा खेळाडू चांगली सुरूवात करून देण्याची ताकद ठेवतो. जर तसं झालं तर प्रश्नच येत नाही.
- लखनौ सुपर जायंट्स हा संघ जेतेपदाच्या असणार आहे. या संघातही आक्रमक फलंदाजी करणाऱ्या संघांचा भरणा आहे. पण फॉर्मात असलेल्या एडन मार्करममुळे चांगली सुरूवात मिळू शकतो. एडन मार्करम या संघातील महत्त्वाचा खेळाडू ठरणार आहे. हा खेळाडू चालला तर संघही तरेल.
- मुंबई इंडियन्स संघात तर एका पेक्षा एक सरस खेळाडू आहेत. त्यामुळे या संघात कोण काय करेल ते सांगता येत नाही. फलंदाजीत तर एकापेक्षा एक दिग्गज फलंदाज आहे. पण असं असलं तरी जसप्रीत बुमराह हा सामना फिरवण्याची ताकद ठेवतो. त्यामुळे मुंबईसाठी जसप्रीत बुमराह हा हुकूमाचा एक्का ठरू शकतो.
- पंजाब किंग्सचं जेतेपद मागच्या वर्षी एका विजयाने हुकलं. पण पुन्हा एकदा हा संघ तयारीला लागला आहे. या संघात श्रेयस अय्यर हाच मुख्य भूमिका बजावू शकतो. कारण त्याच्याकडे कर्णधारपदाचा चांगला अनुभव आहे. तसेच दबावात कसं खेळायचं हे त्याला माहिती आहे. त्यामुळे श्रेयस अय्यर या संघाला जेतेपदाच्या वेशीपर्यंत नेऊ शकतो.
- राजस्थान रॉयल्स संघाची बांधणीही चांगली झाली आहे. आक्रमक फलंदाजी करून मोठी धावसंख्या उभारू शकतात. शिमरोन हेटमायर हा सामना पालटू शकतो. इतकंच काय तर फिनिशरची भूमिका बजावू शकतो. सध्या त्याचा फॉर्मही चांगला आहे. त्यामुळे त्याच्याकडून अपेक्षा असणार आहेत.
- रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु गतविजेता असून यंदा जेतेपद राखण्याचं आव्हान आहे. असं असताना अष्टपैलू रोमारिया शेफर्ड हा या संघाचा तारणहार ठरू शकतो. त्याच्याकडे फलंदाजी आणि गोलंदाजीने सामना फिरवण्याची ताकद आहे. त्यामुळे त्याच्या कामगिरीकडे लक्ष असेल.
- सनरायझर्स हैदराबादमधील फलंदाजीचा क्रम पाहिला तर गोलंदाजांना गोलंदाजी करताना घाम फुटेल. पण गोलंदाजीत हा संघ कमकुवत दिसत आहे. कारण पॅट कमिन्स सुरूवातीच्या सामन्यात खेळणार नाही. त्यामुळे इशान किशन कर्णधार आहे. त्याचा फॉर्मही जबरदस्त आहे. त्यामुळे इशान किशन हाच मुख्य आणि महत्त्वाचा खेळाडू ठरू शकतो.