AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rajvardhan hangargekar IPL Auction 2022: उस्मानबादच्या राजवर्धनसाठी तीन फ्रेंचायजी भिडल्या, अखेर धोनीच्या CSK ने मारली बाजी

Rajvardhan hangargekar IPL Auction 2022: अंडर 19 वर्ल्डकप संघातील (Under 19 world cup) स्टार खेळाडू राजवर्धन हंगरगेकर कोट्यधीश झाला आहे.

Rajvardhan hangargekar IPL Auction 2022: उस्मानबादच्या राजवर्धनसाठी तीन फ्रेंचायजी भिडल्या, अखेर धोनीच्या CSK ने मारली बाजी
| Updated on: Feb 13, 2022 | 4:04 PM
Share

बंगळुरु: भारताच्या अंडर 19 वर्ल्डकप संघातील (Under 19 world cup) स्टार खेळाडू राजवर्धन हंगरगेकर कोट्यधीश झाला आहे. आज IPL Mega Auction 2022 मध्ये त्याच्यावर मोठी बोली लागली. राजवर्धन मूळचा उस्मानाबादचा आहे. मध्यमगती गोलंदाजी करणाऱ्या राजवर्धन हंगरगेकरने (rajvardhan hangargekar) वर्ल्डकप गाजवला. त्याने गोलंदाजी आणि फलंदाजी दोघांमध्ये योगदान दिलं. महाराष्ट्राच्या या गुणी अष्टपैलू खेळाडूवर आयपीएल फ्रेंचायजींची नजर पडली नसती, तर नवलं वाटलं असतं.

उस्मानाबादच्या राजवर्धन हंगरगेकरसाठी मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्स आणि लखनऊ सुपर जायंट्समध्ये बिडींग वॉर पहायला मिळालं. अखेर चेन्नईने या बिडींग वॉरमध्ये बाजी मारली. 20 लाख बेस प्राइस असलेल्या राजवर्धनला CSK ने 1.50 कोटींची बोली लावून विकत घेतलं. राजवर्धन आता आपल्याला पिवळ्या जर्सीत खेळताना दिसणार आहे.

वर्ल्डकपमधील योगदान

राजवर्धन हंगरगेकर हा खेळाडू मूळचा उस्मानाबादचा आहे. मध्यमगती गोलंदाजी करणाऱ्या राजवर्धन हंगरगेकरने गोलंदाजी आणि फलंदाजीत दोघांमध्ये योगदान दिलं. वर्ल्डकपच्या सहा सामन्यांमध्ये खेळताना त्याने एकूण पाच विकेट काढल्या. दुसऱ्या आयर्लंड विरुद्धच्या सामन्यात तर त्याने 17 चेंडूत 39 धावा तडकावल्या. यात एक चौकार आणि पाच षटकार होते. उस्मानाबाद सारख्या छोट्या शहरातून आलेला हा एक गुणवान ऑलराऊंडर क्रिकेटपटू आहे. गोलंदाजी बरोबरच उपयुक्त फलंदाजी करण्याचं कौशल्य त्याच्याकडे आहे.

कोकाटेंची आमदारकी वाचली, शिक्षेला स्थगिती मिळाल्यानं 'सर्वोच्च' दिलासा
कोकाटेंची आमदारकी वाचली, शिक्षेला स्थगिती मिळाल्यानं 'सर्वोच्च' दिलासा.
जेजुरीत भंडाऱ्यानं आगीचा भडका उडाला, प्रत्यक्षदर्शीनं सांगितल घडल काय?
जेजुरीत भंडाऱ्यानं आगीचा भडका उडाला, प्रत्यक्षदर्शीनं सांगितल घडल काय?.
महायुतीत तिढा कायम,सामंत मध्यस्थीसाठी पुण्यात;शिवसेनेचा स्वबळाचा इशारा
महायुतीत तिढा कायम,सामंत मध्यस्थीसाठी पुण्यात;शिवसेनेचा स्वबळाचा इशारा.
दोन भावांची युती अन् मनोमिलन झालंय, 100 टक्के... राऊतांचं मोठं वक्तव्य
दोन भावांची युती अन् मनोमिलन झालंय, 100 टक्के... राऊतांचं मोठं वक्तव्य.
सिंदखेडराजा नगरपरिषदेत 21वर्षीय सौरभ तायडे विजयी, कमी वयाचा नगराध्यक्ष
सिंदखेडराजा नगरपरिषदेत 21वर्षीय सौरभ तायडे विजयी, कमी वयाचा नगराध्यक्ष.
मशालीला आईस्क्रीम कोनासारखं फेकलं...भाजपची टीका, राऊतांचं उत्तर काय?
मशालीला आईस्क्रीम कोनासारखं फेकलं...भाजपची टीका, राऊतांचं उत्तर काय?.
कल्याणमध्ये राजकीय भूंकप, भाजप अन् शिंदे सेनेला मोठा हादरा; एकनिष्ठ...
कल्याणमध्ये राजकीय भूंकप, भाजप अन् शिंदे सेनेला मोठा हादरा; एकनिष्ठ....
हे विजयी कसे झाले? महायुतीच्या विजयानंतर 'समाना'तून जोरदार टीकास्त्र
हे विजयी कसे झाले? महायुतीच्या विजयानंतर 'समाना'तून जोरदार टीकास्त्र.
...म्हणून गप्प होतो, पण आता ती वेळ आलीये, नितेश राणेंचा रोख कुणाकडे?
...म्हणून गप्प होतो, पण आता ती वेळ आलीये, नितेश राणेंचा रोख कुणाकडे?.
जागा वाटपाची रस्सीखेच फार ताणू नका... राज ठाकरे यांच्याकडून सूचना
जागा वाटपाची रस्सीखेच फार ताणू नका... राज ठाकरे यांच्याकडून सूचना.