IPL 2026: कर्णधार ऋतुराज गायकवाडने केलेली चूक गुर्जपनीत सिंगने सुधारली, अन्यथा..

आयपीएल 2026 स्पर्धेतील 22व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्स हे संघ आमनेसामने आले आहेत. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने चूक केली. त्याचा फटका संघाला बसला असता पण...

IPL 2026: कर्णधार ऋतुराज गायकवाडने केलेली चूक गुर्जपनीत सिंगने सुधारली, अन्यथा..
IPL 2026: कर्णधार ऋतुराज गायकवाडने केलेली चूक गुर्जपनीत सिंगने सुधारली, अन्यथा..
Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: Apr 14, 2026 | 10:56 PM

आयपीएल 2026 स्पर्धेतील 22व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स हे संघ एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. चेन्नई सुपर किंग्सच्या वाटेला फलंदाजी आली आणि त्यांनी 20 षटकात 5 गडी गमवून 192 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी कोलकाता नाईट रायडर्स आपल्या फलंदाजी बदल केला. मागच्या काही सामन्यात सलग पराभवाचं तोंड पाहावं लागत असल्याने हा बदल केला होता. फिन एलनला इम्पॅक्ट प्लेयर म्हणून उतरवलं आणि सोबतीला सुनील नरीन होता. मागच्या काही सामन्यात अजिंक्य रहाणे आणि फिन एलन ही जोडी उतरत होती. मात्र या सामन्यात हा बदल करण्यात आला. पण फिन एलनने दुसऱ्या षटकात विकेट टाकली. त्याने 3 चेंडूत 1 धााव केली आणि अंशुल कंबोजच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर सुनील नसरीनच्या सोबतीला अजिंक्य रहाणे आला. तेव्हा संघाची धावसंख्या 13 होती.

आयपीएल स्पर्धेतील या सामन्यात अजिंक्य रहाणे आणि सुनील नरीन या जोडीकडून फार अपेक्षा होत्या. खासकरून सलामीला आलेल्या सुनील नरीन काही खास करेल असं वाटलं. त्याने 2 षटकार आणि 2 चौकार मारत आपला हेतू स्पष्ट केला. त्याने 17 चेंडूत 24 धावा केल्या आणि बाद झाला. खरं तर त्याचा डाव हा 18 धावांवर आटोपला असता. पण कर्णधार ऋतुराज गायकवाडच्या चुकीमुळे 6 धावांचा फटका बसला. संघाकडून चौथं षटक टाकताना अंशुल कंबोजने त्याची दुसऱ्या चेंडूवरच विकेट काढली होती. पण कर्णधार ऋतुराज गायकवाडने त्याचा सोपा झेल सोडला. त्यानंतर याच षटकात सुनील नरीनने चौकार आणि दोन धावा काढल्या.


सुनील नरीनला जीवदान मिळाल्याने त्याचा मोठा फटका संघाला बसेल असं क्रीडाप्रेमींनी अंदाज बांधला होता. पण खलील अहमदच्या गोलंदाजीवर ही चूक गुर्जपनीत सिंगने सुधारली. कारण त्याने नरीनचा झेल पकडण्यात कोणतीच चूक केली नाही. तसेच ऋतुराज गायकवाडने केलेल्या चुकीमुळे झालेलं 6 धावांचं नुकसान रोखलं.

Follow Us