AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL, Mumbai Indians | मुंबई इंडियन्स आणि ‘पलटण’ यंदा तरी अशक्य ते शक्य करणार का?

मुंबई इंडियन्स आयपीएल इतिहासातली यशस्वी टीम आहे. 'पलटण'ने 2013 पासून विविध हंगामात एकूण 5 वेळा रोहित शर्मा याच्या नेतृत्वात ट्रॉफी जिंकण्याचा पराक्रम केला आहे. मात्र मुंबईला 2013 पासून एक कामगिरी जमलेली नाही. त्यामुळे यंदा मुंबई ही कामगिरी करणार का?

IPL, Mumbai Indians | मुंबई इंडियन्स आणि 'पलटण' यंदा तरी अशक्य ते शक्य करणार का?
| Updated on: Apr 02, 2023 | 4:56 PM
Share

बंगळुरु | आयपीएल 16 व्या मोसमाला सुरुवात झाली आहे. मुंबई इंडियन्स या मोसमातील आपला सलामीचा सामना हा रॉयल चँलेजर्स बंगळुरु विरुद्ध 2 एप्रिल रोजी खेळणार आहे. मुंबई इंडियन्स आणि रोहित शर्मा आयपीएलच्या इतिहासातील यशस्वी टीम आणि कर्णधार आहे. मुंबई इंडियन्सने 2013 पासून रोहित शर्मा याच्या नेतृत्वात 2022 पर्यंत एकूण 5 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकण्याची कामगिरी केली आहे. विशेष बाब म्हणजे रोहितनेच मुंबईला आपल्या कॅप्टन्सीत ही कामगिरी केली. मात्र मुंबईला 2013 पासून ते 2022 पर्यंत एकदाही एक गोष्ट जमलेली नाही. मुंबईवर हा डाग लागलेला आहे. त्यामुळे यंदा तरी ‘पलटण’ आरसीबी विरुद्धच्या सामन्यात हा डाग पुसणार का, असा सवाल क्रिकेट चाहत्यांना पडला आहे.

मुंबई इंडियन्सचा खराब कामगिरी

आयपीएलमध्ये 2013 पासून 2022 पर्यंत एकदाही मुंबई इंडियन्सला आपला पहिला सामना जिंकता आलेला नाही. मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या मोसमातील आपला अखेरचा सलामीचा सामना हा 2012 मध्ये चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध जिंकला होता. मात्र त्यानंतर सलग 10 मोसमांमध्ये मुंबईची पराभवाने सुरुवात झाली आहे.

प्रत्येक मोसमातील सुरुवात ही विजयाने व्हावी, अशी इच्छा प्रत्येक संघाची असते. मात्र मुंबईला गेल्या 10 वर्षात मात्र विजयी सलामी देता आलेली नाही. त्यामुळे मुंबई यंदा आरसीबीवर विजय मिळवत आपल्यावर लागलेला डाग पुसणार काढणार का, याबाबत क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

मुंबई इंडियन्सची मोसमनिहाय सलामी सामन्यातील कामगिरी

मुंबई इंडियन्स टीम | रोहित शर्मा (कॅप्टन), कॅमरुन ग्रीन, झाय रिचर्डसन, पियूष चावला, ड्वेन यानसन, शम्स मुलानी, राघव गोयल, विष्णु विनोद, नेहल वढेरा, टीम डेविड, रमनदीप सिंह, टिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, अरशद खान, कुमार कार्तिकेय, ऋतिक शौकीन, बेहरनडॉर्फ, अर्जुन तेंडुलकर, आकाश मधवाल, इशान किशन, ट्रिस्टन स्टब्स, ब्रेविस, जोफ्रा आर्चर आणि जसप्रीत बुमराह.

आरसीबी टीम | फॉफ डुप्लेसी (कर्णधार), विराट कोहली, हिमांशु शर्मा, विल जॅक्स, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक, सुयश प्रभुदेसाई, रजत पाटीदार, अनुज रावत, वानिंदु हसरंगा, शाहबाज अहमद, हर्षल पटेल, कर्ण शर्मा, महिपाल लोमरोर , मोहम्मद सिराज, जोश हेजलवुड, सिद्धार्थ कौल, रीस टॉपले, मनोज वानखेडे, राजन कुमार, अविनाश सिंह, सोनू यादव, आकाश वशिष्ठ आणि आकाश दीप।

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.