AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2024 Orange Cap : ऑरेंज कॅपच्या शर्यतीत केएल राहुलची एन्ट्री, कोण कोणत्या स्थानावर ते वाचा

IPL 2024 Orange Cap, Highest run scorer : आयपीएल 2024 स्पर्धेतील 34 सामना चेन्नई सुपर किंग्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात रंगला. या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुलने जबरदस्त फलंदाजी केली. यासह ऑरेंज कॅपच्या शर्यतीत उडी घेतली आहे.

IPL 2024 Orange Cap : ऑरेंज कॅपच्या शर्यतीत केएल राहुलची एन्ट्री, कोण कोणत्या स्थानावर ते वाचा
| Updated on: Apr 19, 2024 | 11:38 PM
Share

आयपीएल स्पर्धेतील 34 वा सामना चेन्नई सुपर किंग्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात पार पडला. या सामन्यात नाणेफेकीचा कौल लखनौ सुपर जायंट्सच्या बाजूने लागला. कर्णधार केएल राहुलने क्षणाचाही विलंब न करता गोलंदाजी स्वीकारली.  लखनौच्या गोलंदाजांनी साजेशी कामगिरी केली. 20 षटकात 6 गडी घेऊन चेन्नई सुपर किंग्सला 176 धावांवर रोखलं. विजयासाठी मिळालं 177 धावांचं आव्हान पाहता केएल राहुल आणि क्विंटन डीकॉक यांनी सावध सुरुवात केली. दोघांनी पहिल्या गड्यासाठी 134 धावांची भागीदारी केली. यात क्विंटन डीकॉकने 43 चेंडूत 54 धावा केल्या. यात 5 चौकार आणि 1 षटकार मारला. तर कर्णधार केएल राहुलने 53 चेंडूत 83 धावांची खेळी केली. यात 9 चौकार आणि 3 षटकार मारले. त्यानंतर निकोलस पूरन आणि मार्कस स्टोइनिसने विजयी भागीदारी करून संघाला जिंकून दिलं. केएल राहुलने ठोकलेल्या 82 धावांमुळे ऑरेंज कॅपची शर्यत रंगतदार झाली आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विराट कोहलीचं ऑरेंज कॅपमधील स्थान अबाधित आहे. विराट कोहलीने 7 सामन्यात 361 धावा केल्या आहेत. दुसऱ्या स्थानावर राजस्थान रॉयल्सचा रियान पराग असून त्याने 7 सामन्यात 318 धावा केल्या. तिसऱ्या स्थानावर मुंबई इंडियन्सचा रोहित शर्मा असून 297 धावा केल्या आहेत. चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध चमकदार कामगिरी करून केएल राहुलने टॉप 5 मध्ये एन्ट्री मारली आहे. केएल राहुल चौथ्या स्थानी पोहोचला असून 7 सामन्यात 281 धावा केल्या आहेत. पाचव्या स्थानी कोलकाता नाईट रायडर्सचा सुनील नरीन असून त्याने 6 सामन्यात 276 धावा केल्या आहेत. टॉप 5 मध्ये एन्ट्री घेण्यासाठी संजू सॅमसन, शुबमन गिल, हेन्रिक क्लासेन आणि जोस बटलरही वेशीवर आहेत. आता पुढच्या सामन्यात ही शर्यत रंगतदार होणार आहे.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): ऋतुराज गायकवाड (कर्णधार), रचिन रवींद्र, अजिंक्य रहाणे, मोईन अली, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (विकेटकीपर), दीपक चहर, तुषार देशपांडे, मुस्तफिजुर रहमान, मथीशा पाथीराना.

लखनौ सुपर जायंट्स (प्लेइंग इलेव्हन): क्विंटन डी कॉक, केएल राहुल (विकेटकीपर/कर्णधार), दीपक हुडा, मार्कस स्टोइनिस, निकोलस पूरन, आयुष बडोनी, कृणाल पंड्या, मॅट हेन्री, रवी बिश्नोई, मोहसिन खान, यश ठाकूर.

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली