AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2024 Orange Cap : ऑरेंज कॅपसाठी रोहितकडून विराटला कडवी टक्कर, इतक्या धावांची गरज

IPL 2024 Orange Cap, Highest run scorer : रोहित शर्माने पंजाब विरुद्धच्या 36 धावांच्या खेळीसह ऑरेंज कॅपच्या शर्यतीत मोठी झेप घेतली आहे. रोहित शर्मा कितव्या स्थानी आहे? पाहा.

IPL 2024 Orange Cap : ऑरेंज कॅपसाठी रोहितकडून विराटला कडवी टक्कर, इतक्या धावांची गरज
suryakumar yadav and rohit sharma,Image Credit source: BCCI/IPL
| Updated on: Apr 19, 2024 | 1:05 AM
Share

हार्दिक पंड्या याच्या नेतृत्वात मंबई इंडियन्सने आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 33 व्या सामन्यात पंजाब किग्सवर 9 धावांनी मात केली. पंजाबसमोर मुंबईने विजयासाठी 193 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पंजाबला हे आव्हान झेपावलं नाही. मुंबईने पंजाबचा बाजार 19.1 ओव्हरमध्ये गुंडाळला. पंजाबकडून शशांक सिंह याने 41 आणि आशुतोष शर्मा याने 61 धावांची झुंज दिली. मात्र दुसऱ्या बाजूने या दोघांना कुणालाच साथ देता आली नाही. पंजाबचा हा पाचवा पराभव ठरला. त्याआधी मुंबईकडून सूर्यकुमार यादव याने 78 धावा केल्या. तर रोहित शर्मा याने 25 बॉलमध्ये 2 चौकार आणि 3 सिक्ससह 36 धावांची खेळी केली.

रोहित शर्माचा पंजाब विरुद्धचा हा आयपीएल कारकीर्दीतील 250 वा सामना होता. रोहितने या सामन्यात आयपीएलमध्ये एकूण 6 हजार 500 धावांचा टप्पा पार केला. तसेच रोहित मुंबईकडून सर्वाधिक सिक्स ठोकणारा पहिलाच फलंदाज ठरला. रोहितने याबाबतीत किरॉन पोलार्डचा रेकॉर्ड ब्रेक केला. रोहितने यासह ऑरेंज कॅपच्या शर्यतीतील आपलं आव्हान कायम ठेवलं आहे. रोहितने 36 धावांच्या मदतीने ऑरेंज कॅपच्या शर्यतीत थेट तिसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. रोहितला आता ऑरेंज कॅपसाठी आणखी एका मजबूत खेळीची गरज आहे.

विराट कोहली ऑरेंज कॅपचा मानकरी

ऑरेंज कॅपच्या शर्यतीत टॉप 5 मध्ये विराट कोहली अव्वल स्थानी आहे. विराटने 7 सामन्यात 361 धावा केल्या आहेत. दुसऱ्या स्थानी राजस्थान रॉयल्सचा रियान पराग आहे. रियानने 7 सामन्यात 318 धावा केल्या आहेत. रोहित शर्माच्या नावावर 7 मॅचेसमध्ये 297 रन्स झाल्या आहेत. चौथ्या स्थानी केकेआरचा सुनील नरेन आहे. नरेनने 6 सामन्यात 276 धावा केल्या आहेत. तर पाचव्या क्रमांकावर राजस्थानचा कॅप्टन संजू सॅमसन आहे. संजूने 7 सामन्यात 276 धावा केल्या आहेत.

पंजाब किंग्स प्लेइंग ईलेव्हन : सॅम करन (कॅप्टन), रिली रोसो, प्रभसिमरन सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), लियाम लिव्हिंगस्टोन, शशांक सिंग, आशुतोष शर्मा, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कागिसो रबाडा आणि अर्शदीप सिंग.

मुंबई इंडियन्स प्लेईंग ईलेव्हन : हार्दिक पांड्या (कॅप्टन), रोहित शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टिम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, मोहम्मद नबी, जेराल्ड कोएत्झी, श्रेयस गोपाल आणि जसप्रीत बुमराह.

दादांनंतर शिंदे आमदारामागे कोर्ट कचेरी, कोकाटेंनंतर कुडाळकर गोत्यात!
दादांनंतर शिंदे आमदारामागे कोर्ट कचेरी, कोकाटेंनंतर कुडाळकर गोत्यात!.
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.