AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026 Orange Cap Holder: ऑरेंज कॅपसाठी जोरदार चुरस, टॉप 5 मध्ये 4 भारतीय, वैभव सूर्यवंशी कितव्या स्थानी?

IPL 2026 Orange Cap Holder: ऑरेंज कॅपसाठी भारतीय फंलदाजांमध्ये जोरदार चुरस आहे. मात्र विदेशी फलंदाज ऑरेंज कॅपच्या यादीत नंबर 1 आहे. तर पर्पल कॅप कुणाच्या डोक्यावर आहे? जाणून घ्या.

IPL 2026 Orange Cap Holder: ऑरेंज कॅपसाठी जोरदार चुरस, टॉप 5 मध्ये 4 भारतीय, वैभव सूर्यवंशी कितव्या स्थानी?
Vaibhav Sooryavanshi RR IPL 2026Image Credit source: PTI
| Updated on: May 12, 2026 | 7:27 PM
Share

आयपीएल 2026 स्पर्धेत प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी जोरदार चढाओढ आहे. प्लेऑफच्या 4 जागांसाठी 8 संघांत थेट सामना आहे. प्रत्येक सामना हा निर्णायक असा ठरणार आहे. त्यामुळे प्रत्येक संघाला इथून एकही चुक महागात पडू शकते. तसेच वैयक्तिक पातळीवर खेळाडूंमध्ये ऑरेंज आणि पर्पल कॅपसाठी चुरस आहे. प्रत्येक सामन्यानंतर ऑरेंज आणि पर्पल कॅपचा दावेदार बदलत आहे. 1-1 धाव आणि 1-1 विकेटनंतर ऑरेंज आणि पर्पल कॅपचां समीकरण बदलतंय. ताज्या आकडेवारीनुसार, सध्या ऑरेंज कॅपच्या शर्यतीत टॉप 5मध्ये 4 भारतीय फलंदाज आहेत. मात्र एकमेव विदेशी फलंदाज हा पहिल्या स्थानी आहे. त्यामुळे 12 मे रोजी होणाऱ्या गुजरात विरुद्ध हैदराबाद सामन्यानंतर भारतीय खेळाडूच्या डोक्यावर ऑरेंज कॅप मिळवणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

हेन्रिक क्लासेन नंबर 1

ऑरेंज कॅपच्या शर्यतीतील हेन्रिक क्लासेन याचा अपवाद वगळता इतर 4 फलंदाज हे ओपनर आहेत. सनरायझर्स हैदराबादचा हेन्रिक क्लासेन पहिल्या स्थानी आहे. क्लासेन मिडल ऑर्डरमध्ये खेळूनही त्याने पहिलं स्थान मिळवलं आहे. क्लासेनने 11 सामन्यांत 494 धावा केल्या आहेत. त्यामुळे क्लासेन गुजरात विरुद्ध 12 मे रोजी होणाऱ्या सामन्यात सहज 500 धावांचा टप्पा पार करु शकतो. क्लासेन याच्यानंतर दुसर्‍या स्थानी दिल्ली कॅपिट्ल्सचा विकेटकीपर बॅट्समन केएल राहुल दुसऱ्या स्थानी आहे. केएलने 12 सामन्यांत 477 धावा केल्या आहेत.

अभिषेक शर्मा

ऑरेंज कॅपच्या शर्यतीत टॉप 5 मध्ये हेन्रिक क्लासेन व्यतिरिक्त सनरायझर्स हैदराबादच्या अभिषेक शर्मा याचा समावेश आहे. अभिषेक तिसऱ्या स्थानी आहे. अभिषेकने 11 सामन्यांत 475 धावा केल्या आहेत.

शुबमन गिल चौथ्या स्थानी, पाचव्या क्रमांकावर कोण?

तसेच चौथ्या स्थानी गुजरात टायटन्सचा कॅप्टन शुबमन गिल चौथ्या स्थानी विराजमान आहे. शुबमनने 10 सामन्यांत 462 धावा केल्या आहेत. तर राजस्थान रॉयल्सचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी पाचव्या क्रमांकावर आहे. वैभवने 11 सामन्यांत 440 धावा केल्या आहेत.

भुवनेश्वर कुमार पर्पल कॅपचा किंग,  पहिल्या स्थानी विराजमान

दरम्यान पर्पल कॅपच्या शर्यतीत आरसीबीचा भुवनेश्वर कुमार पहिल्या स्थानी आहे. भुवीने 11 सामन्यांत 21 विकेट्स मिळवल्या आहेत. भुवीनंतर चेन्नई सुपर किंग्सचा अंशुल कंबोज दुसऱ्या क्रमांकावर आहे. अंशुलने 11 सामन्यांत 19 विकेट्स घेतल्या आहेत.

Follow Us
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोप
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोपांनी खळबळ!
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटा
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटांच्या चर्चेत... पहिली प्रतिक्रिया समोर
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी धर्मांतरण प्रकरणी मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?
लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
Mayank Lohar | लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
धक्कादायक! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट
Shirdi | साईबाबांच्या नगरीत धक्कादायक खुलासा! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट पेढे...
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णय
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाची चर्चा
स्वार्थासाठी गेले, जनता हिशोब चुकता करणार! नाईकांचा खासदारांना इशारा
Vaibhav Naik | स्वार्थासाठी गेले, आता जनता हिशोब चुकता करणार! वैभव नाईकांचा फुटीर खासदारांना इशारा
विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट
Beed | विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट निर्णय घेतला; लवकरच...
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं!
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं! त्या वादाला आता नवं वळण!
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता बड्या नेत्याचं विधान चर्चेत