AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL Playoff: आरसीबी प्लेऑफच्या जागेपासून फक्त दोन विजय दूर, रनरेटमध्ये घेतली मोठी सरशी

आयपीएल 2026 स्पर्धेतील 39व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने दिल्ली कॅपिटल्सचा दारूण पराभव केला. या विजयासह आरसीबीने प्लेऑफच्या दिशेने कूच केली आहे. आता फक्त 2 विजय मिळवताच आरसीबीची प्लेऑफमधील जागा पक्की होणार आहे.

IPL Playoff: आरसीबी प्लेऑफच्या जागेपासून फक्त दोन विजय दूर, रनरेटमध्ये घेतली मोठी सरशी
IPL Playoff: आरसीबी प्लेऑफच्या जागेपासून फक्त दोन विजय दूर, रनरेटमध्ये घेतली मोठी सरशीImage Credit source: IPL/BCCI
| Updated on: Apr 27, 2026 | 10:22 PM
Share

आयपीएल 2026 स्पर्धेतील 39 सामन्यांचा खेळ संपला आहे. आता प्लेऑफमध्ये स्थान मिळण्यासाठी जोरदार चुरस निर्माण झाली आहे. पण पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे संघ सहज प्लेऑफमध्ये जागा मिळवतील असं चित्र दिसत आहे. मागच्या पर्वात हे दोन्ही संघ अंतिम फेरीत भिडले होते. तेव्हा आरसीबीने पंजाब किंग्सला पराभूत करून जेतेपदावर नाव कोरलं होतं. आता हे दोन्ही प्लेऑफमध्ये जागा मिळवण्यासाठी आघाडीवर आहे. त्यासाठी त्यांना आता फक्त दोन विजयाची गरज आहे. त्यातल्या त्यात आरसीबीकडे मोठी संधी आहे. कारण आरसीबीने दोन विजय मिळवताच प्लेऑफमधील स्थान पक्कं होणार आहे. आतापर्यंत आरसीबीने आठ सामन्यात जबरदस्त कामगिरी केली आहे. चला जाणून घेऊयात आरसीबीची कामगिरी कशी आहे ती…

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आतापर्यंत स्पर्धेत आठ सामने खेळले आहेत. त्यापैकी सहा सामन्यात विजय मिळवला आहे. तर दोन सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. आरसीबीच्या पारड्यात 12 गुण असून नेट रनरेट हा +9.919 आहे. आरसीबीला आता स्पर्धेत सहा सामने खेळायचे आहे. सहापैकी दोन सामन्यात विजय मिळवताच आरसीबीला प्लेऑफमध्ये स्थान मिळणार आहे. कारण प्लेऑफमध्ये 16 मिळवणारा संघ जागा पक्की करतो. आता आरसीबी पुढच्या सहा सामन्यात कशी कामगिरी करतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. कारण टॉप 2 मध्ये जागा मिळवण्यासाठी प्राधान्य असणार आहे. टॉप 2 मध्ये जागा मिळवली तर प्लेऑफमध्ये एक विजय मिळवताच अंतिम फेरी गाठण्याची संधी मिळते. पण पराभूत झाला तरी स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येत नाही. अजून एक सामना खेळून पुन्हा अंतिम फेरीत जाण्याचा मार्ग खुला असतो.

आरसीबीचे उर्वरित सामने

  • रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध गुजरात टायटन्स, 30 एप्रिल 2026
  • रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स, 7 मे 2026
  • रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध मुंबई इंडियन्स, 10 मे 2026
  • रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स, 13 मे 2026
  • रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध पंजाब किंग्स, 17 मे 2026
  • रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, 22 मे 2026

Follow Us
वडील बंडखोर, पण मुलगी ठाकरेंसोबत! राजुल पाटील थेट मातोश्रीवर....
मोठी बातमी! वडील बंडखोर, पण मुलगी ठाकरेंसोबत! राजुल पाटील थेट मातोश्रीवर, भूमिका स्पष्ट करत म्हणाल्या....
मोठी घडामोड! ओमराजेंचा उद्धव ठाकरेंना निरोप; सोमवारी मातोश्रीवर होणार
मोठी घडामोड! ओमराजेंचा उद्धव ठाकरेंना निरोप; सोमवारी मातोश्रीवर होणार निर्णायक भेट
ओमराजेंच्या निर्णयावर 5 खासदारांचे भविष्य, तर ठाकरे गटाची मनधरणी सुरूच
Omraje Nimbalkar | ओमराजेंच्या एका निर्णयावर 5 खासदारांचे भविष्य, रोखण्यासाठी ठाकरे गटाची मनधरणी सुरूच
घरात बसून पक्ष वाढत नाही तर...; गिरीष महाजनांचा उद्धव ठाकरेंना टोला
घरात बसून पक्ष वाढत नाही तर...; गिरीष महाजनांचा उद्धव ठाकरेंना टोला
शिंदे हे अमित शाहांचे टेस्ट ट्यूब बेबी; संजय राऊतांचा हल्लाबोल
Sanjay Raut UNCUT | शिंदे हे अमित शाहांचे टेस्ट ट्यूब बेबी; संजय राऊतांचा हल्लाबोल
15 कोटी घेतलेत, विकासाच्या गप्पा मारू नका! राऊतांचा मोठा खुलासा
Sanjay Raut | 15 कोटी घेतलेत, विकासाच्या गप्पा मारू नका! राऊतांचा मोठा खुलासा
राष्ट्रवादीला मोठा धक्का! बडा नेता भाजपच्या वाटेवर....
मोठी बातमी! राष्ट्रवादीला मोठा धक्का! बडा नेता भाजपच्या वाटेवर; तेव्हा गेलो असतो तर..म्हणत व्यक्त केली खंत
ठाकरे की शिंदे? आज ठरणार ओमराजेंचा राजकीय मार्ग! काही तासांत....
ठाकरे की शिंदे? आज ठरणार ओमराजेंचा राजकीय मार्ग! काही तासांत मोठा निर्णय
अखेर मुंबईत पावसाची हजेरी! पहाटेपासून रिमझिम सरी, मुंबईकर सुखावले
Mumbai Rain Update | अखेर मुंबईत पावसाने लावली हजेरी! पहाटेपासून रिमझिम सरी, मुंबईकर सुखावले
6 खासदारांच्या बंडखोरीनंतर ठाकरेंचा मोठा निर्णय; आराखडा तयार आता फक्त.
Uddhav Thackeray | विश्वासू खासदारांच्या बंडखोरीनंतर ठाकरेंचा मोठा निर्णय; आराखडा तयार आता फक्त...