IPL 2021 Orange Cap | ‘गब्बर’ शिखर धवनला पछाडलं, चेन्नईच्या फॅफ डु प्लेसिसने पटकावली ऑरेंज कॅप

IPL 2021 Orange Cap List: आयपीएलच्या प्रत्येक सामन्यानंतर ताज्या आकडेवारीनुसार ज्या फलंदाजाच्या नावे सर्वाधिक धावांची नोंद असते, त्या खेळाडूला ऑरेंज कॅप देण्यात येते.

IPL 2021 Orange Cap | 'गब्बर' शिखर धवनला पछाडलं, चेन्नईच्या फॅफ डु प्लेसिसने पटकावली ऑरेंज कॅप
IPL 2021 Orange Cap List: आयपीएलच्या प्रत्येक सामन्यानंतर ताज्या आकडेवारीनुसार ज्या फलंदाजाच्या नावे सर्वाधिक धावांची नोंद असते, त्या खेळाडूला ऑरेंज कॅप देण्यात येते.
Follow us
| Updated on: Apr 29, 2021 | 12:14 AM

दिल्ली | आयपीएलच्या 23 व्या (IPL 2021) सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने (Chennai Super Kings) सनरायजर्स हैदराबादवर (Sunrisers Hyderabad) 7 विकेट्सने दमदार विजय मिळवला. हैदराबादने चेन्नईला विजयासाठी 172 धावांचे आव्हान दिले होते. हे विजयी आव्हान चेन्नईने 3 विकेट्स गमावून पूर्ण केलं. सलामीवीर ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) आणि फॅफ डु प्लेसिस (Faf du Plesis) चेन्नईच्या विजयाचे शिल्पकार ठरले. गायकवाडने 75 तर फॅफने 56 धावांची खेळी केली. या खेळीसह फॅफने (Orange Cap) ऑरेंज कॅप पटकावली आहे. (ipl points table 2021 standings ranking orange cap after chennai super kings vs sunrisers hyederabad in marathi 28 april 2021)

गब्बरला पछाडत मिळवली कॅप

फॅफने या सामन्यात शानदार अर्धशतक लगावलं. यासह फॅफने दिल्लीचा सलामीवीर ‘गब्बर’ शिखर धवनला पछाडत ऑरेंज कॅप पटकावली आहे. या सामन्याआधी ही कॅप धवनकडे होती. मात्र फॅफने या खेळीसह ऑरेंज कॅप मिळवली. आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूला ऑरेंज कॅप देण्यात येते.

ऑरेंज कॅपच्या शर्यतीतले टॉप 5 बॅट्समन

फॅफ डु प्लेसीस, चेन्नई सुपर किंग्स : 6 मॅच, 270 धावा

शिखर धवन, दिल्ली कॅपिटल्स : 6 मॅच, 265 धावा

के एल राहुल, पंजाब किंग्स : 6 मॅच, 240 धावा

ग्लेन मॅक्सवेल, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, 6 मॅच, 223 रन्स

जॉनी बेयरस्टो, सनरायजर्स हैदराबाद, 6 मॅच, 218 धावा

ऋतुराज गायकवाड आणि फॅफ डु प्लेसिसची शानदार भागीदारी

विजयी धावांचे पाठलाग करताना चेन्नईची धमाकेदार सुरुवात झाली. चेन्नईच्या ऋतुराज गायकवाड आणि फॅफ डु प्लेसिस या सलामी जोडीने चेन्नईला दमदार सुरुवात मिळवून दिली. यो दोघांनी 129 धावांची भागीदारी केली. ऋतुराजने 75 तसेच फॅफने 56 धावांची खेळी केली.

चेन्नईचा विजयी पंच

चेन्नईने हैदराबादवर मात केली. यासह चेन्नईने या मोसमातील सलग 5 वा विजय साकारला. चेन्नईची या मोसमाची सुरुवात पराभवाने झाली. मात्र त्यानंतरच्या सर्व सामन्यात चेन्नईने विजयी घोडदौड सुरु ठेवली आहे. या विजयासह चेन्नईने पॉइंट्स टेबलमध्ये बंगळुरुला पछाडत पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे.

संबंधित बातम्या :

CSK vs SRH, IPL 2021 Match 23 Result | ऋतुराज गायकवाड आणि फॅफ डु प्लेसिसचे अर्धशतक, चेन्नईचा विजयी पंच, हैदराबादवर 7 विकेट्सने शानदार विजय

IPL 2021, David Warner | डेव्हिड वॉर्नरचा पराक्रम, आयपीएलमध्ये अशी कामगिरी करणारा पहिलाच फलंदाज

IPL 2021 | आयपीएलच्या 14 व्या मोसमातून 10 स्टार खेळाडूंची तडकाफडकी माघार, एका भारतीयाचाही समावेश, काय आहे कारण?

(ipl points table 2021 standings ranking orange cap after chennai super kings vs sunrisers hyederabad in marathi 28 april 2021)

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.